प्राचीन भारताचा इतिहास पाहता तथागत बुद्धांच्या शिकवणीने अखंड भारताचा इतिहास बौद्धमय झालेला आपणास पाहायला मिळतो. याच भारताच्या कानाकोपऱ्यात बौद्ध स्मारकांची भली मोठी शृंखला आपणास पाहायला मिळते. चक्रवर्ती सम्राट अशोक व त्यांचे १० वंशज , सातवाहनांचे ३० सम्राट सम्राट शुंग यांचे १० सम्राट वाकाटक सम्राट, सम्राट कनिष्क , सम्राट मिलिंद , सम्राट हर्षवर्धन पर्यंत अनेक महान सम्राट यांनी या देशात नव्हे तर भारताच्या बाहेर हि बौद्ध धम्माची मोठी विरासत निर्माण केली अश्या इतिहासाचे जतन करून भावी पिढीला एक समृद्ध इतिहास पाहायला मिळावा आणि त्यातून प्रगतीचा राजमार्ग दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन हि आधुनिक काळात प्राचीन चळवळ जिवंत करून विश्वरत्न महामानव दो बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा समतेचा बुद्धाचा मार्ग प्रत्येक दुःखी माणसाच्या आयुष्यात नेवून माणसाचे दुःख दूर करून मैत्री करुणेचा झरा जिवंत करण्याचे काम करण्यासाठी व बौद्ध शिक्षण प्रणाली या देशत सुरु करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या समता रथाला पुढे नेण्याचे काम करू या
अश्या या महान कार्यात नक्कीच सहभागी व्हा आणि धम्म संवर्धनास पुढे या.