प्राचीन जल स्थापत्य

प्राचीन काळापासून भारत हा पाण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून असलेला प्रदेश आहे. अगदी प्राचीन मानवाचा इतिहास अभ्यासाला तरी त्याच्या वस्त्या ह्या नदीच्या खोऱ्यात वसलेल्या आपणास पाहायला मिळतात. पावसामुळे जे पाणी मिळते ते पाणी जमिनीत मुरून पुन्हा झर्या च्या रूपाने पुन्हा मिळवले जाते आणि त्याचा वापर रोजच्या जीवनात केला जातो हे पावसाचे पाणी बारा हि महिने वापरायला मिळाले पाहिजे म्हणून जे बांधकाम केले गेले त्यालाच जल स्थापत्य म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने जलाशय घाट कुंड बारव विहीर बंधारे अश्या अनेक जल स्थापत्य आपणास अभ्यासायला मिळते. जलाशय निर्माण होण्याचीप्रमुख कारणे आहेत नगर रचना आणि त्याला सुलभतेने जल व्यवस्थापन व्हावे या हेतून कायम स्वरूपी पाणी पुरवठा होईल म्हणून जलाशय निर्माण करण्यात आले. प्राचीन काळात मौर्य कालखंड मध्ये आपणास जलाशय निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न शिलालेखांच्या माध्यमातून अभ्यासायला मिळतात. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात गिरनार नदीवर बांध घालून सुदर्शन तलाव निर्माण करण्यात आले होते. सम्राट अशोक यांचा सुभेदार तुत्तास्प याने तलावाच्या बांधकामात सुधारणा केली होती अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झालेल्या या जलाशयाला शक राजा महाक्षत्रप याने या जलाशयाची दुरुस्ती केल्याचे शिलालेखात पाहायला मिळते सातवाहन सम्राट वेदश्री याने देखील तला बांधून उद्यान निर्माण केल्याचे शिलालेखात उल्लेख आहेत. उत्तर दक्षिण भारतात प्रत्येक राजवंश यांनी  जलाशय निर्माण करण्यावर मोठा भर दिलेला अभ्यासायला मिळतो यामध्ये बौद्ध स्थापत्यकला फारच महत्वाची ठरते कारण पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचे चांगले उदाहरण म्हणून त्याकड  पाहिले जाते. वाकाटक पासून चालुक्य राष्ट्रकुट आणि यादव यांच्यापासून ते अगदी  १८ व्या शतकापर्यंत अनेकांचे जलाशय निर्माण करण्याचे प्रयत्न अभ्यासायला मिळतात.

  यांनतर घाट हा प्रकार अभ्यासायला घेतला तर यामध्ये नद्यांच्या पात्रात नैसर्गिक पद्धतीने पडलेले मोठे खड्डे पाण्याचे साठे तयार करतात त्याला आपण डोह म्हणतो आणि हे पाणी आपण बारा हि महिने वापरू शकतो. या डोहापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले  जाते यालाच घाट म्हणतात. नागार्जुन कोंडा या ठिकाणी इसवी सन पूर्व पहिल्या  शतकात बांधलेला घाट सर्वात प्राचीन म्हणून ओळखला जातो. 
   बंधारे हा प्रकार नद्यांचे पाणी अडवण्यासाठी केले जातो यामुळे पाण्याचा साठा होवून जलाशय निर्माण करण्यासाठी मदत होते सुदर्शन तलाव बंधाऱ्या च्या सहाय्याने च निर्माण करण्यात आला आहे.  आता याचे स्वरूप वाढलेले आहे याला आपण धरण म्हणून पाहतो भारतात प्राचीन बंधारा कोणता असेल हे पाहण्यासाठी मुंबई उपनगर बोरीवली इथे असलेल्या कान्हेरी बुद्ध लेणी वर प्राचीन बंधारा बांधल्याचा उल्लेख व अवशेष तिथल्या ठिकाणी असेल्या शिलालेखात व बंधाऱ्याच्या  भिंती मध्ये  आपणास पाहायला मिळतात. 

कुंड हा प्रकार अनेक प्रकारे तयार केला जातो नदीच्या पात्रात क चारी बाजूला भिंती  घालून केला जातो  तो केवळ स्नान करण्यासाठी  परंतु प्राचीन काळात पाषाणात मोठे कुंड तयार  करण्याची संकल्पना बुद्ध लेण्यात पाहायला मिळते पावसाचे पाणी छोटे तोंड असलेल्या कुंडामध्ये साठवले जाते ज्यामुळे दगडात वाहणारा पाण्याचा प्रवाश साठलेल्या जलाशयाकडे आकर्षित होतो. आणि त्यामुळे पाणी बाराही महिने सहज वापरता येतो यामुळे पाण्याचे  बाष्पीभवन थांबते आणि पाणी मुबलक प्रमाणावर साठवले जाते. यामुळे निसर्गनिर्मित पाणी सहज साठवता येते आणि त्याचा फायदा वर्षभर लेण्यात राहणाऱ्या भिक्खुणा होतो. शिवाय यामुळे अजून एक गोष्टी घडते कि पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचे चांगले उदाहरण पाहायला  मिळते. पाण्यामुळे जमिनीतील जलसाठे वाढीस मदत होते. पाण्याची पातळी वाढण्यास  मदत होते. लेण्यात निर्माण केलेल्या कुंड म्हणजे पाण्याचे टाके याला प्राकृत भाषेत पोढी असे म्हणतात. 
जलस्थापत्य हे भारतातील एक प्राचीन असे स्थापत्य आहे. जल स्थापत्य अभ्यासण्याची आमोठी गरज आहे. पाण्याचा अपव्यय आणि पाण्याचे होणारे प्रदूषण पाहता पाणी साठवण्यासाठी काय केले पाहिजे याचे उदाहरण म्हणून प्राचीन बौद्ध  जल व्यवस्थापन अभ्यासावे लागेल. 

Maha Ravindasa

Maha Ravindasa

Ancient Script Dhammalipi teacher ,Pali language Teacher , Ancient Buddhist Architecture and Young Buddhist independed researcher

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat