महाराष्ट्र्राचे लेणी वैभव
महाराष्ट्रातील लेण्यांची अभ्यास पद्धती द्वारे लेण्यांचे एकमेकांशी असलेले सांस्कृतिक अनुबंध पाहून लेण्यांचे केलेले हे वर्गीकरण आणि त्यानुसार लेण्यांची माहिती
लेणी हि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे साहित्य आहे. ज्यामध्ये प्राचीन काळातील हजारो वर्षाचा प्रगत इतिहास कोरलेला आहे. तो पाहताना त्यातील इतिहास समजला तरच त्या लेण्यांचे महत्व आपणास लक्षात येईल. अगदी प्राचीन काळापासून इथे राहणारे लोक आणि त्याचा इतिहास ह्या लेण्यातील भिंती मधून बोलका होतो म्हणून हे वैभव जपले पाहिजे
या लेण्यांचा सविस्तर माहिती पाहण्यासाठी आवर्जून प्रत्येक लेणी ची माहिती घ्या
ABCPR लेणी संवर्धक युनिट समता सैनिक दल यांनी महाराष्ट्रातील लेण्यांचे सचित्र माहिती पट आपनासासाठी उपलब्ध केलेले आहेत आवर्जून पहा

कण्हसेले ( कान्हेरी ) बौद्ध लेणी , बोरीवली
कोकण येथील कन्हसेले पर्वतावर २२५ लेण्यांचा समूह महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश सातवाहन यांच्या काळात निर्माण करण्यात आला. कान्हेरी हे प्राचिन काळातील विश्व विद्यालय म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्रातील पहिले ज्ञात विद्यालय होते. कान्हेरी बौद्ध लेणी हि जागतिक व्यापारी केंद्र व आर्थिक व्यवहाराचे केंद्र देखील होते. कान्हेरी लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात करण्यात आली होती. इसवी सणाच्या १२ व्या शतकापर्यंत कान्हेरी लेणी मध्ये विद्यादानाचे कार्य चालत होते.
संशोधन : कान्हेरी लेणीचा सर्वात प्रथम उल्लेख इसवी सन ३९९ -४११ मध्ये आलेला चीनी यात्री फाहीयान याने आपल्या प्रवास वर्णनात ज केला आहे. त त्यानंतर या लेणीचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या मध्ये गार्सिया दा ऑर्टा (१५३४), जाओ दे कॅस्ट्रो (१५३९), डायगो दा कौटो (१६०३) यांचा उल्लेख येतो तर फ्रायर (१६७५), जेम्स बर्ड (१८३९ ), जे. स्टिव्हन्सन (१८५२ व १८५३), वेस्ट (१८६०), भाऊ दाजी लाड (१८६४-६६), जेम्स बर्जेस व भगवानलाल इंद्रजी (१८८१), ब्यूलर (१८८३), ल्युडर्स (१९११), एम. जी. दीक्षित (१९४२), व्ही. व्ही. मिराशी (१९५५), शोभना गोखले (१९७६), एस. नागराजू (१९८१), या अभ्यासकांनी या लेणी वर संशोधन कार्य केले आहे.लेणी ची माहिती : कान्हेरी लेणी दक्षिणेकडील डोंगरावर उतारावर वेगवेगळ्या स्तरावर कोरलेली आहे. येथील बहुतांश लेणी मध्ये शिलालेख कोरलेले आहेत. या लेणी चे तीन कालखंड पडतात. १) हीनयान लेणी (इ. स. सु. २५०–२००), २) प्रारंभिक महायान लेणी (इ. स. २००–३५०) व ३) नंतरच्या महायान लेणी (इ. स. सु. ४५०–७००). कान्हेरी लेणींचा आराखडा पाहता, या प्रामुख्याने सहा समूहांत टेकड्यांच्या संरचनेचा विचार करून खोदण्यात आलेल्या दिसतात. यात समूह क्र. १ ते ६ मध्ये क्रमशः लेणी क्र. २ ते ७, १४ ते ३०, ४९ ते ७०, ३१ ते ४०, ८८ ते ९३ व ८ ते १२ यांचा समावेश होतो. येथील बहुतेक लेणींची रचना खोल्यांसह मंडप, बाक व समोर व्हरांडा अशी आहे. लेणी मधील बहुतेक शिल्पे मूळतः प्रारंभिक काळात खोदलेल्या लेणींमध्ये मागावून ४-५ व्या शतकात नव्याने कोरलेली आढळून येतात. लेणी मधील शिल्प हे प्रत्येक लेणी मध्ये पाहायला मिळते.
शिलालेख : कान्हेरी लेणी मधील शिलालेखात सातवाहन सम्राट यांच्या कालावधी मध्ये सुवर्णकार , हिऱ्यांचे व्यापारी , मनिकार , शेतकरी, व्यापारी, अधिकारी, सम्राट, भिक्खू , अश्या अनेक लोकांचे धम्म दानाचे शिलालेख कान्हेरी मध्ये पाहायला मिळतात. शिलालेखांमुळे लेणी मध्ये दान देणाऱ्या दान दात्यांचा इतिहास समोर आला. कल्याण चौल मागठाणे सोपारा औरंगाबाद अश्या अनेक ठिकाणांची नावे कान्हेरी लेणी मधून पाहायला मिळतात. कान्हेरी लेणी मध्ये लेणी क्रमांक ९० मध्ये तीन पहलवी शिलालेख व जापनीज शिलालेख पाहायला मिळतात.
शिल्प व चित्र : कान्हेरी लेणी मध्ये सर्व प्रथम हीनयान काळात बुद्ध स्तूप व अनेक उपासकांचे स्तूप पूजा करतानाचे शिल्प लेणी क्रमांक ३ मध्ये पाहायला मिळतात. महायान काळात बुद्धांची भव्य मूर्ती, त्याच प्रमाणे बोधीसात्वांची अनेक रूपे पाहायला मिळतात लेणी क्रमांक ४१ मध्ये ११ डोक्याचा अवलोकितेश्वर शिल्प आहे तर लेणी क्रमांक ९० मध्ये सर्वदद अवलोकितेश्वर शिल्प आहे. बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा वरद मुद्रेत असंख्य शिल्प कोरलेली आपणास पाहायला मिळतात. वज्रयान काळात निर्माण केलेली शिल्प कला देखील आपण पाहायला मिळते. लेणे क्र. ३४ मध्ये सु. सहाव्या शतकातील अर्धवट भित्तिचित्रे आहेत. लेणे क्र. ४१ मध्ये व्याख्यान मुद्रेतील बुद्ध प्रतिमेसह इतर प्रतिमा पाहायला मिळतात. लेणे क्र. १ अर्धवट असून कान्हेरीतील सर्वांत शेवटी खोदण्यात आलेले लेणे आहे. लेणे क्र. ९३ मध्ये बुद्धांची ‘मुचलिंद’ नागासह एक सुंदर मूर्ती दिसते. लेणी क्रमांक ८७ हि निर्वाण भूमी असून अर्हंत भिक्खुंच्या शरीर धातूवर निर्माण केलेले स्तुपांची रचना इथे पाहायला मिळते.
सातव्या शतकात चिनी बौद्ध भिक्षू ह्यूएनत्संग याने या लेणींना भेट दिली होती. कान्हेरी एक शिक्षा केंद्र होते, जेथे प्रसिद्ध आचार्य निवास करीत असत. श्रेष्ठ बौद्ध तत्त्वज्ञ आचार्य ‘दीपांकर’,‘अचल’ आणि ‘दिन्नाग’यांचे वास्तव्य काही काळ येथे होते.

सोपारगा (सोपारा ) बुद्ध स्तूप , नालासोपारा
इतिहास : प्राचीन भारतातील एक समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, बंदर व बौद्ध स्थळ. सोपारा म्हणजेच आजच्या मुंबई उपनगरातील ‘नाला सोपारा’. हे ठिकाण अरबी समुद्राला मिळणाऱ्या ‘वैतरणा’ व ‘उल्हास’ नद्यांच्या मधोमध वसलेले आहे. प्राचीन काळी सोपारा ‘अपरांत’ प्रांताच्या राजधानीचे ठिकाण समजले जात असे. विविध ग्रंथांमध्ये या ठिकाणाला ‘शूर्पारक’ (संस्कृत), ‘सोपारा’ (प्राकृत), ‘सुप्पारा’ (ग्रीक), ‘ऑफिर’ (हिब्रू), ‘सुबारा’ (अरबी) इ. नावांनी संबोधले आहे. गौतम बुद्धांच्या काळातच बौद्ध धर्माचे आगमन सोपाऱ्यात झाले होते. थेरीगाथा या ग्रंथात येथील रहिवाशी ‘पुन्न’ (पूर्ण) चा उल्लेख आलेला आहे, जो श्रावस्तीमध्ये बुद्धांकडून दीक्षित होऊन बौद्ध भिक्षू बनला होता. पूर्णावदान या ग्रंथानुसार त्याने श्रावस्तीहून परतल्यानंतर सोपाऱ्यात ‘चंदनमाला प्रासाद’ (गंध कुटी) ची स्थापना केली होती. सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथील तिसऱ्या धर्मपरिषदेनंतर (इ. स. पू. २५६) ‘यवन धर्मरक्षित’ (यवन धम्मरक्खित) या बौद्ध भिक्षूला अपरांतात (कोकणात) बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ पाठविले होते. सातवाहन काळात सोपारा हे भारत आणि रोम दरम्यानच्या समृद्ध व्यापाराचे एक केंद्र होते. सातवाहनांच्या आर्थिक उलाढालीत सोपाऱ्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सातव्या शतकात प्रसिद्ध चिनी यात्री व बौद्ध भिक्षू ह्यूएन त्संग याने या स्थानाला भेट दिली होती.
टॉलेमी (इ. स. ५०), तसेच मसुदी (दहावे शतक), अल्-बीरूनी (अकरावे शतक), अल्-इद्रिसी (बारावे शतक) या यात्रींनी सुबाराचा (सोपारा) उल्लेख एक उत्कृष्ट व्यापारी केंद्र म्हणून केलेला आहे. कॉझ्मास इंडिकोप्लूस्ट्स (Cosmas Indicopleuestes) या ग्रंथाप्रमाणे पाचव्या शतकात हे ठिकाण कल्याण व मलबार दरम्यान एक अग्रगण्य व्यापारी केंद्र होते. सोपारा येथून वेगवेगळ्या काळात हस्तीदंत, शंख-शिंपले, रेशीम व हत्ती-घोडे इत्यादींचा व्यापार चालत असे. सम्राट अशोकाचे शिलालेख व येथील बौद्धस्तूपामुळे बौद्ध धर्म व सोपाऱ्याचे संबंध अधिक मजबूत झालेले आहेत.
संशोधन : सोपारा येथे अनेक पुरातत्त्वीय अवशेष आढळले आहेत. यांपैकी सम्राट अशोकाच्या राजाज्ञेपैकी ८ व ९ क्रमांकाचे भग्न शिलालेख येथे सापडले आहेत. या दोन शिलालेखांपैकी आठव्याचा शोध भगवानलाल इंद्रजी (१८८२) व नवव्याचा शोध एन. ए. गोरे यांनी लावला. १८८२ साली भगवानलाल इंद्रजी यांनी उत्खनन केले. त्यांना येथे एका विशाल स्तूपाचे अवशेष तसेच अनेक महत्त्वाच्या पुरातन वस्तू आढळल्या. त्यामध्ये कास्याच्या सात बुद्ध तसेच मैत्रेय यांच्या मूर्ती, बुद्ध पात्र, रक्षा करंडक इ. पुरातन वस्तूंचा समावेश होता. यावेळी त्यांना यज्ञश्री सातकर्णीची (इ. स. १७०-९९) काही नाणीही मिळाली. यावरून भगवानलाल इंद्रजी यांनी या स्तूपाचा काळ इ. स. दुसऱ्या शतकाचा उत्तरार्ध ठरविला. यानंतर हेन्री कझिन्स यांनी याच ठिकाणी सखोल उत्खनन केले, त्यात इंद्रजींनी शोधलेल्या स्तूपापेक्षाही प्राचीन अशा एका अन्य स्तूपाचे अवशेष आढळून आले. सोबत आहत नाणी, मौर्य काळातील वृत्तचितीच्या आकाराचा अस्थी करंडक (ज्यावर मौर्यकालीन ब्राह्मी अक्षरे कोरण्यात आलेली होती) व सातवाहनकालीन नाणी प्राप्त झाली. विद्वानांच्या मते असे सांगितले जाते की, आठव्या-नवव्या शतकात हा स्तूप पुन्हा एकदा खोलला गेला असावा आणि त्यामध्ये मागाहून अस्थी व बौद्ध पात्र क्रमशः तांबे, अश्म, स्फटिक, चांदी व सोन्याच्या एकातएक असलेल्या करंडकासह कास्याचे मानुषी व मैत्रेय बुद्ध एका विटांच्या पोकळीत ठेवले गेले असावेत. के. एन. दीक्षित व डग्लस बॅरेट यांच्या मते, बुद्धाच्या मूर्ती या नंतरच्या काळातील असून सातव्या-आठव्या शतकाशी संबंधित आहेत. सदाशिव गोरक्षकर यांच्या मते, कास्य मूर्ती इ. स. नवव्या शतकामधील आहेत.
कसे जाल : मुंबई उपनगराकडे जाणाऱ्या पश्चिम रेल्वे स्थानक नालासोपारा या ठिकाणी उतरून पश्चिमेला विरार कडे जाणाऱ्या ब्रिज जवळून स्तुपाकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होतात.

शिवनेरी बौद्ध लेणी , जुन्नर
इतिहास : प्राचीन काळात कल्याण बंदरातून नाणेघाट या व्यापारी मार्गाने जुन्नर मधील ऐतिहासक कल्याण बाजारपेठ मध्ये व्यापारी माल येत असे व येथून मालाची खरेदी विक्री करून हा माल पुढे पैठण व तेर कडे जात असे.जुन्नर चे प्राचीन नाव हे ओमन नगर ते मीन नगर पुढे ते जिन्नेह , जुनिर व जीर्ण नगर असा प्रवास होत शेवटी आजचे जुन्नर असा त्याचा उल्लेख होतो. कल्याण बाजारपेठ हि जुन्नर येथील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे इतिहासात पाहायला मिळते. सातवाहन काळात या जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ल्याच्या तिन्ही बाजूला बौद्ध लेण्यांची निर्मिती करण्यात आली होती. बौद्ध भिक्खू व भिक्क्खुनीचे संघ या ठिकाणी वास्तव्यास होते. शिवनेरी लेणी या लेणी समूहात सर्वाधित लेणी कोरण्यात आली. शिवनेरी लेणी समूहात पूर्ण-अपूर्ण मिळून ८४ लेणी, ६० पोढी (पाण्याची टाकी) व ९ धम्मलिपी मधील शिलालेख आहेत. यांपैकी शिवनेरी पूर्व समूहात ५५ लेणी (२ चैत्यगृहे), ४० पाण्याची टाकी व ६ शिलालेख आहेत. शिवनेरी दक्षिण समूहात २३ लेणी (१ चैत्यगृह), १४ पाण्याची टाकी व ३ शिलालेख आहेत, तर शिवनेरी पश्चिम समूहात ६ लेणी व ६ पाण्याची टाकी आहेत.
शिवनेरी पूर्व भागात असलेली लेणी मध्ये एकूण ५५ लेणी आल्याची नोंद आहे. लेणी क्रमांक १६ मध्ये असलेला शिलालेखात मधुकीय मल्ल व गोलकीय आनंद यांनी यांनी स्वागत कक्षाचे धम्मदान दिल्याचे शिलालेख आहे. लेणीक्र. ३६ ला छोटीशी ओसरी असून डाव्या बाजूस उठावदार स्तूप कोरला आहे. त्याचा काही भाग तुटलेला असून खालच्या बाजूस पाण्याचे टाके आहे. ओसरीत दरवाजाच्या डाव्या बाजूस भिंतीवर पाच ओळीत कोरलेला शिलाखे आहे. यानुसार अपगुरिय सवगिरिय याचा पुत्र ‘पतिबधक गिरिभूति’ याने हे लेणे व बाजूचे टाके दान दिले. तसेच या लेण्यास व टाक्यास आणि गावातील धर्मोत्तरीयांच्या भिक्षुणी-संघास कार्षापणांची एक कायम ठेव दिली. या लेखात तत्कालीन जुन्नर नगरीतील भिक्षुणी-संघाचा आलेला उल्लेख महत्त्वाचा आहे. लेणे क्र. ४२ हे या समूहातील मोठे लेणे असून आतमध्ये असलेल्या बारा खोल्यांमुळे यास स्थानिक लोक ‘बारा गडद’ किंवा ‘बारा कोठडी’ असे म्हणतात. लेणे क्र. ४७ हे एक लहानसे विहार असून चौरस मंडप व पाच खोल्या आहेत. मागील दोन खोल्यांच्या मधील भिंतीवर कोनाड्यात उठावात एक स्तूप कोरलेला असून त्यावर हर्मिका (स्तूपाच्या अंडावरील चौकोनी कठडा) व छत आहेत. बाजूच्या भिंती व छतावर मातीचा गिलावा लावून त्यावर चित्रे काढली होती. लेणे क्र. ४८ हे एक चैत्यगृह आहे. त्याचे छत दर्शनी भागाच्या बरेच पुढे असून त्यावर मातीचा गिलावा व रंगकाम केल्याचे दिसते. प्रवेशद्वार प्रशस्त असून त्याच्या दोन्ही बाजूंस खिडक्या आहेत. आतील भागात काटकोनात भव्य मंडप असून समोर दोन कलश, अष्टकोन, उपडा कलश अशा रचनेचे स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ दिसतात. मंडपाच्या मागे मागील भिंतीपासून वेगळा असलेला स्तूप अत्यंत सुंदरपणे कोरला आहे. त्यास वेदिकापट्टी व हर्मिका असून त्याची सुबक छत्री दगडी छतात कोरली आहे. सपाट छत, काटकोनात मंडप व स्तूपाची छत्री छतात कोरणे, तसेच याचे स्तंभ आत आडव्या ओळीत कोरणे, हे या चैत्यगृहाचे खास वैशिष्ट्य आहे. या लेण्यातील लेखात गृहपतिप्रमुख व व्यापारी असणाऱ्या ‘वीरसेननाक’ याने या चैत्यगृहासाठी दान दिले आणि ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी व सुखासाठी अर्पण केले, असा उल्लेख आहे.
शिवनेरीच्या दक्षिणेकडील समूहातील तीन लेणी महत्त्वाची असून इतर सामान्य आहेत. लेणे क्र. ५५ लेण्यातील लेखानुसार उपासक उगाहचा पुत्र ‘इसिपालित’ (ऋषिपालित) व त्याच्या मुलांनी धम्मदान दिले आहे. लेणे क्र. ५७ मधील लेखात ग्रीक देशाचा यवन ‘चित’ (चैत्र) याने संघास हा ‘भोजनमंडप’ दान दिल्याचे म्हटले आहे. लेणे क्र. ५९ हे चैत्यगृह व उजवीकडे भिक्षुगृह आहे. या लेण्यातील लेखातून उगाहचा पुत्र इसिपालित (ऋषिपालित) आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे चैत्यगृह दान दिल्याचे समजते.

कोंढाणे बौद्ध लेणी , कर्जत
पश्चिमाभिमुख लेणीसमूहात एक चैत्यगृह, सात विहार, एक पाण्याचे कुंड आणि तीन शिलालेख आहेत. लेणे क्र. १ मधील चैत्यगृह हे भव्य, रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. चैत्यगृहात असलेले ३२ स्तंभ अष्टकोनी आहेत. चैत्यगृहात स्तूप आहे. स्तूपाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे . चैत्यगृहाच्या दर्शनी भागात दगडाची आणि लाकडाची पटल असावी, असे तेथे असलेल्या अवशेषांवरून वाटते. लाकडी कमान अंदाजे २,००० वर्ष जुनी असावी. दर्शनी भागात गवाक्षे व वेदिकापट्टी यांचे कोरीवकाम केलेले आहे. चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस सात शिल्पपट कोरलेले असून त्यामध्ये स्त्री व पुरुष शिल्प कोरलेली आहे. चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील डावीकडच्या भिंतीवर भग्नावस्थेतील यक्षाचे शिल्प कोरलेले आहे. आज फक्त या यक्षाचा चेहराच आपल्याला दिसतो. याच्या फेट्यावर रेशमी वस्त्रातील बुट्टीसारखे सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे. या यक्षशिल्पाजवळ ‘कन्हाचा शिष्य बलक याने तयार केलेʼ या अर्थाचा धम्म लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. लेणे क्र. २ : चैत्यगृहाखालोखाल दुसरे महत्त्वाचे लेणे. हा विहार चैत्यकमानीच्या पातळीवर कोरलेला आहे. व्हरांडा, सभागृह आणि त्याच्या तिन्ही भिंतींमध्ये खोल्या अशी या विहाराची रचना आहे. दीर्घिकेच्या मागील भिंतीत सभागृहाचे प्रवेशद्वार आणि खिडक्या आहेत. सभागृहात तिन्ही भिंतीत प्रत्येकी सहा याप्रमाणे एकूण १८ खोल्या आहेत. दीर्घिकेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर चार अर्धस्तंभ आणि त्याच्यावर वेदिकापट्टी कोरलेली असून त्यांच्यावर अर्धउठावातील प्रमाणबद्ध स्तूप कोरलेला आहे. स्तूपाच्या भोवती पिंपळपानाकर चैत्यकमान कोरलेली आहे. स्तूपाच्या वर हर्मिका आणि यष्टी कोरलेली आहे. विहाराच्या दर्शनी भागात दोन टप्प्यांत कोरीवकाम केले आहे. एका पट्टीवर दोन ओळींचा ‘बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र हधमयक्ष याने पार्श्वभागातील लेणीचे दान दिलेʼ या अर्थाचा धम्मलिपीतील शिलालेख कोरलेला आहे. याच पट्टीवर वरच्या भागात अजून एक शिलालेख कोरण्यात आला आहे. त्याचा अर्थ देखील वरील शिलालेखासाराखाच आहे.
लेणे क्र. ८ : हे लेणे डाव्या बाजूच्या कोपऱ्यात आहे. या लेण्याच्या सभागृहात डाव्या आणि उजव्या भिंतींलगत कमी उंचीचा बाक आहे. या लेण्यातील सभागृहाचा उपयोग भोजनमंडप म्हणून, तर छोट्या खोलीचा उपयोग धान्यकोठार म्हणून होत असावा. या लेण्याच्या जवळ लेणीसमूहातील एकमेव विस्तीर्ण पाण्याचे कुंड आहे. बोरघाटातून होणारी व्यापाऱ्यांची वाहतूक यामुळे या लेणीचे महत्व देखील वाढले होते. प्राचीन इतिहासातील व्यापारी राजमार्गावरील हि लेणी म्हणजे इतिहासातील महत्वाचा दस्त ऐवज होय.

पन्हाळेकाजी बौद्ध लेणी, दापोली
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे. पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर-माथ्यावर ‘पन्हाळे’ नावाचा एक दुर्ग आहे. शिलाहारांच्या बाराव्या शतकातील दोन ताम्रपटांत या ठिकाणाला ‘प्रणालक’ म्हणून संबोधित केल्याचे दिसते. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काजीमुळे पन्हाळे नावाबरोबर ‘काजी’ हा शब्द जोडला गेला. अत्यंत निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोऱ्यात हे स्थळ असून साधारणतः इ. स. तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण २९ लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. यांपैकी २८ लेणी कोटजाईच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तराभिमुख असून २९ वे लेणे बागवाडीजवळ ‘गौर लेणे’ या नावाने प्रसिद्ध आहे. हीनयान (थेरवाद), वज्रयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो.
पन्हाळे-काजी येथील लेण्या सर्वप्रथम अण्णासाहेब शिरगावकर यांनी १९७० साली प्रकाशात आणल्या. परंतु त्यापूर्वी जेम्स बर्जेस यांनी या ठिकाणाचा उल्लेख करून येथे काही कोरीव बाक असल्याचे एका वृतांतात नमूद करून ठेवले होते (१८७०). मुळात हा लेणीसमूह काही पूर्ण व काही अर्धी अधिक नदीच्या गाळाने व डोंगरावरून पडलेल्या मलब्यामुळे भरून गेला होता.त्यानंतर म. न. देशपांडे यांनी या लेण्यांचे सखोल संशोधन केले. इ. स. सु. तिसऱ्या शतकात हीनयान पंथाच्या भिक्षूंसाठी पन्हाळे-काजी येथे लेणी तयार केली गेली. या लेणी-समूहातील लेणी क्र. ४, ५, ६, ७, ८ व ९ मूलतः सु. तिसऱ्या शतकात खोदल्या गेल्या. लेणी क्र. २, १०, ११, १२, १३ व १८ या साधारणतः चौथ्या-पाचव्या शतकात खोदल्या गेल्या. त्यानंतर साधारणतः दहाव्या शतकात वरील सर्व लेण्यांमध्ये वज्रयानी पंथीयांनी बरेचसे फेरफार केले. वज्रयानी पंथीयांनी दहाव्या शतकात लेणी क्र. १, ३, १४, १५, १६, १७, १९, २१ व २७ या नव्याने खोदल्या असल्याचे दिसते. पुढे तेराव्या शतकात यातील लेणी क्र. १४, १५, १७, १९ व २१ ब्राह्मण (हिंदू) धर्माच्या प्रभावाखाली आल्या. यातील लेणे क्र. १४ नाथ संप्रदायाच्या ताब्यात आले. ब्राह्मण धर्मीयांसाठी बाराव्या-तेराव्या शतकात लेणी क्र. २०, २२, २३, २४, २५, २६ व २८ या नव्याने खोदल्याचे दिसून येते. यांपैकी लेणे क्र. २२ नंतर चौदाव्या शतकात नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली आले, तर लेणे क्र. २९ नाथ-संप्रदायासाठी चौदाव्या शतकात खोदण्यात आले. लेणी क्र. ४, ५ व ६ मध्ये स्तूप स्थापन केल्याचे आढळून येते. लेणे क्र. ५ मधील पाठीमागच्या भिंतीत अर्धोत्कीर्ण स्तूप आहे. लेणी क्र. ७, ८ व ९ ही मुळात भिक्षुगृहे (विहार) होती. यांतील काही लेण्यांसमोर नंतर वृत्तचितीच्या आकारातील स्तूपही स्थापिले गेले. महायान पंथीयांसाठी काही बदल केलेले दिसत नाहीत. परंतु आठव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत वज्रयान पंथीयांचे वास्तव्य येथे असावे, असे दिसते. याच काळात विशेषतः दहाव्या शतकात येथील लेण्यांत गुप्त तांत्रिक पुजाविधीस उपयुक्त असे फेरफार करून नवीन तांत्रिक देवतांच्या मूर्तींची स्थापना केल्याचे दिसून येते. मुळातील भिक्षुगृहांच्या पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तींची स्थापना केली होती. लेणीत दिसणाऱ्या अष्टकोनी स्तंभात बदल करण्यात आले व दर्शनी स्तंभांच्या स्तंभशीर्षात नागबंध जोडले गेले. मंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या द्वारांवर अलंकृत ललाटबिंब कोरण्यात आली. काही वाढीव खोल्याही नव्याने खोदण्यात आल्या. ईशान्य भारतात लोकप्रिय असणाऱ्या अक्षोभ्य, सिद्धैकवीर या तांत्रिक देवतांची पूजा पन्हाळे-काजी येथे केली जाऊ लागली. लेणे क्र. १० वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आहे. येथून मिळालेल्या ‘महाचंडरोषण’ या वज्रयानी देवतेच्या दुर्मीळ मूर्तीमुळे येथील भिक्षूंचा संबंध बंगाल व ओडिशा येथील तांत्रिक केंद्रांशी आला असावा, असे दिसते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेही याचे अत्यंत महत्त्व आहे. येथील लेणी कला व स्थापत्य या व्यतिरिक्त धार्मिक परंपरेत झालेल्या बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. पन्हाळे-काजी येथील लेण्यांच्या अभ्यासातून हीनयान बौद्ध पंथाचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतरण झाले व पुढे हे ठिकाण शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले, हेही समजते.

तुळजा बौद्ध लेणी , जुन्नर
जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यांत एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. यांशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली आहेत. या लेण्यांत अद्यापि एकही शिलालेख आढळलेला नाही. लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. आतील डावीकडील व मागील भिंतीत प्रत्येकी दोन व उजवीत एक अशा एकूण पाच खोल्या बौद्धभिक्षूंच्या निवासासाठी खोदलेल्या आहेत. लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह असून हे या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. त्याचा व्यास ८.२३ मी. असून जमिनीपासून छतापर्यंतची उंची ७.६२. मी. आहे. या लेण्याच्या मध्यभागी २.५९ मी. व्यास व ३ मी. उंची असलेला साधा स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग (१.३२ मी. उंच) गोलाकार असून त्यावर ‘अंड’ (१.६७ मी. उंच) आहे. अंडावर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ (प्रत्येकी उंची ३.३५ मी.) असून त्यांचा खालचा भाग रुंद व वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे. त्यामुळे हे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात. विशेष म्हणजे या स्तंभांना स्तंभपाद व स्तंभशीर्ष नाहीत. स्तंभांच्या भोवती वर्तुळाकार प्रदक्षिणापथ (१.०७ मी. रुंद) आहे. स्तूपाच्या वर घुमटाकार छत असून, त्यावर प्रदक्षिणेच्या छतावर लेणे कोरले त्यावेळी लाकडी फासळ्या (तुळया) बसविल्या होत्या. तसेच छतावर व बाजूच्या भिंतींवर मातीचा गिलावा लावून त्यावर रंगीत चित्रे काढली होती. येथील एका उभ्या स्त्रीचे चित्र आणि अस्पष्टपणे दिसून येणारी पुष्पनक्षी अजिंठा येथील लेणे क्र. १० मधील चित्रांच्या समकालीन असावी, असे दिसून येते. अष्टकोनी स्तंभांवरही चित्रे काढण्यात आली होती. लेण्याचा दर्शनी भाग अस्तित्वात नसल्याने त्याचे संपूर्ण विधान ओळखणे कठीण आहे. या चैत्यगृहाच्या स्तूपासमोर इतर चैत्यगृहांत आढळतो तसा आयताकार सभामंडप नसावा, असे दिसते; परंतु चैत्यगृहाला दरवाजा असल्याच्या खुणा येथे आढळतात.चैत्याचा गोल आकार व वर्तुळात मांडणी केलेले स्तंभ, असे हे पश्चिम भारतातील एकमेव चैत्यगृह आहे. तुळजा लेणे क्र. तीनचा काळ इ. स. पू. सुमारे ६५-५३ इतका आहे. तसेच स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून हे चैत्यगृह दख्खनमधील प्रारंभीच्या लेण्यांपैकी एक असावे, असे दिसते. एस. नागराजू यांच्या मते, तुळजा लेणी-समूहातील लेणे क्र. १, ६, ७ व १३ विहारांच्या स्थापत्यविकासाच्या पहिल्या टप्प्यातील उदाहरणे असून ती इ. स. पू. ३०० ते २५० या दरम्यान खोदली गेली असावीत.लेणे क्र. ४ लहानसे विहार असून त्याचा दर्शनी भाग तुटला आहे. डावीकडील मागील बाजूस दोन खोल्या असून एकीस आधुनिक लाकडी चौकट बसविली आहे .लेणे क्र. ५ ते १२ यांचा दर्शनी भाग संपूर्णपणे तुटलेला आहे. लेणे क्र. ८ ते १२ पर्यंत कड्याच्या वरच्या बाजूस काही कलाकुसर व थोडीबहुत शिल्पे शिल्लक राहिली आहेत. त्यांत वेलबुट्टी, वेदिका, चैत्यकमानी इ. सुबकपणे कोरलेल्या दिसतात. शिल्पांत स्तूपाची पूजा करणारे भक्त, युगूल व उडता किन्नर किंवा गंधर्व दिसतात. किन्नराचा कमरेवरील भाग मानवी असून त्याने तुरेदार फेटा परिधान केला आहे. त्याचे पाय पक्ष्याचे असून त्याला मोरपिसारा आहे. या कलाकुसरीचे व शिल्पांचे साम्य मानमोडी टेकडीवरील भूतलेणी समूहातील शिल्पांशी मिळते-जुळते आहे.लेणे क्र. १३ हे या गटातील शेवटचे लेणे असून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर लागते. याचाही दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपात बाजूच्या व मागील भिंतींत खालच्या बाजूस दगडी बाक कोरलेले आहेत. याचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असावा. अलीकडेच तुळजा लेणींच्या पश्चिमेस साफ-सफाईचे काम चालू असताना अजून काही खोल्या आढळून आल्या आहेत.

ठाणाळे बौद्ध लेणी , सुधागड पाली
रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. ही लेणी पाली-सुधागडपासून वायव्येस सुमारे २७ किमी. अंतरावर आहेत. डोंगरात सुमारे ५ किमी. वर घनदाट जंगलात ही लेणी खोदली आहेत. येथे पोहोचण्यासाठी खोपोली-पाली हा मार्गही सोईस्कर आहे. ठाणाळे लेणी सर्वप्रथम जे. ॲबट यांनी १८९० साली पाहिली. त्यानंतर कझिन्स यांनी या लेणींना भेट देऊन १८९१ मध्ये द केव्स ॲट नाडसूर अँड खडसांबला ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यानंतर ग. ह. खरे (१९४५), ल्यूडर (१९१२), मो. ग. दीक्षित (१९४२), विद्या दहेजिया (१९७२), म. न. देशपांडे (१९८१), म. के. ढवळीकर (१९८४) इ. संशोधकांनी या लेणींवर कमी-अधिक प्रकाश टाकला. ठाणाळे येथे एकूण २३ लेणी पश्चिमाभिमुख असून त्यांत एक चैत्यगृह व एक स्मारक स्तूप-समूह (Memorial stupa complex) आहे. उर्वरित २१ लेणी भिक्षूंच्या निवासासाठी होती. ठाणाळे लेणी क्र. ३ मध्ये एकानंतर एक कोरलेले सहा एकाश्म स्मारक-स्तूप, कोनाड्यातील दोन व पाच दगड-मातीचे बांधीव असे एकूण तेरा स्तूप नोंदविले गेले आहेत. या लेण्यात सम्राट अशोक यांची चांदीची सात आहत नाणी, मातीचे भांडे व मातीचा प्रतीकात्मक स्तूपही आढळून आला होता. या स्मारकस्तूपांचा काळ सुमारे इ. स. पू. दुसरे-तिसरे शतक ते इ. स. पहिले-दुसरे शतक असा सर्वसाधारणपणे ठरविला आहे.लेणे क्र. ७ हे लेणी-समूहाच्या साधारण मध्यभागी खोदले असून चैत्यगृहास जोडून आहे. हा एक विहार असून समूहातील सर्वांत विस्तीर्ण असा आहे. याच्या रचनेवरून मूळचा लहान विहार नंतरच्या काळात मोठा केल्याचे दिसून येते. मुळात या लेण्यात स्तंभविरहित मंडप होता व त्याच्या दोन्ही बाजूंस दोन भिक्षुगृहे होती. त्यानंतर या मंडपात ७ नवी भिक्षुगृहे खोदण्यात आली. उत्तरेकडील भिंतीत चैत्यकमान (Chaitya arch) असलेल्या कोनाड्याच्या वर एका बाजूला इ. स. पू. पहिल्या शतकातील धम्मलिपी मधील लेख आहे. जवळच भिक्षुगृहाच्या दरवाजाच्या वर चैत्यगवाक्षामध्ये एक शिल्पपट आहे. त्यात मध्यभागी वेदिकापट्ट, हर्मिकायुक्त अर्धोत्कीर्ण स्तूप असून त्यास एका बाजूस पुरुष व दुसऱ्या बाजूस स्त्री हातात फुले घेऊन पूजा करीत असल्याचे दाखविले आहे. या लेण्यातील शिल्पांमध्ये पंचफणायुक्त नागाची दोन शिल्पे, समोरासमोर उभे दोन बैल, सोंडेत कमळ पकडलेला हत्ती, समोरा-समोरील वशिंड व शिंगयुक्त बैल, कमळ उचलणारा हत्ती, महामायाचे दोन शिल्पे, सिंहीण व तिचा छावा इ. शिल्पे कोरली आहेत. लेणे क्र. ८ हा चैत्यगृह (७.३३ x ४.८१ मी. व ४.५८ मी. उंच) स्तंभ-विरहित व गजपृष्ठा कार आहे. चैत्यगृहातील दक्षिणेकडील भिंतीच्या वरच्याभागी एक दानलेख कोरला आहे. या चैत्यगृहातील अर्धगोलाकृती अंतर्भागात मध्यभागी वेदिका-अलंकरण विरहित स्तूप असून अधिष्ठानावर एक खाच आहे. ज्या खाचेवर अंड कोरले आहे. अंडाच्या वर हर्मिकेसाठी खाच असून त्याच्या खाली धातू ठेवण्यासाठी खड्डा आहे. हा स्तूप इ. स. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात कोरला असावा. ठाणाळे लेणी-समूहातील इतर सर्व भिक्षुगृहे सामान्यतः ‘द्विगर्भ’ किंवा ‘त्रिगर्भ’ म्हणजेच दोन किंवा तीन भिक्षूंसाठी कोरली होती आणि हीच भिक्षुगृहे पाचव्या शतकात महायान भिक्षूंनी वापरली असता त्यांनी तेथे बुद्ध-बोधिसत्त्व शिल्पे न कोरता भिंतीवर गिलावा लाऊन त्यावर चित्रे रंगविली. लेणे क्र. १५ लेणी च्या पाठीमागील भिंतीत दोन भिक्षुगृहे आहेत व दर्शनी भागी भिंतीवर दोन्ही भिक्षुद्वारांच्या मध्ये एक उत्कीर्ण स्तूप कोरला आहे. येथे माशावर आरूढ दांपत्याचे शिल्पही कोरलेले आहे ते शुद्धोधन व महामाया शिल्प असावे. ठाणाळे लेणी भाजा लेणीच्याही पूर्वी खोदली गेली असावीत. तसेच या लेण्यांत कमीतकमी पाच वेळा परिवर्धन, बदल, उत्खनन व रंगलेपन केले असावे. ‘चौल’ बंदराचे महत्त्व काहीसे कमी झाले असावे व मावळात जाणारा मार्ग बदलला गेल्याने ही लेणी विस्मृतीत गेली असावीत.

त्रिरश्मी बौद्ध लेणी, नाशिक
पश्चिम भारतातील एक महत्त्वाचा हीनयान (थेरवाद) व महायान लेणी-समूह. या लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ८ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’ टेकडीवर लेणी खोदल्या आहेत. लेणींतील शिलालेखांमध्येही ‘त्रिरश्मी’ या नावाची प्राकृत रूपे ‘तिरन्हु’ अशी आली आहेत.
त्रिरश्मी लेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांच्या कालखंडात खोदण्यात आली. येथे एकूण २७ धम्मलिपी मध्ये शिलालेख कोरले असून त्यातून सातवाहन व पश्चिमी क्षत्रप (क्षहरात) यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते. या लेणी-समूहात एक चैत्यगृह असून बाकीचे सर्व विहार आहेत. साधारणपणे येथील विहारांची ओसरी, मंडप व सभोवताली खोल्या अशी स्थापत्य-रचना आढळून येते. येथील स्तंभांचा घटकक्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, आमलकयुक्त चौरसाकृती घटक, त्यावर स्वारशिल्प आणि कठडा असा आहे. साधारणपणे इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते इ. स. सातव्या शतकापर्यंत येथे लेणी संबंधित कार्य सुरू होते. मूळच्या हीनयान लेण्यांत नंतर सुमारे सहाव्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक असे बदल करण्यात आले. बऱ्याचशा लेण्यांत बौद्ध शिल्पे कोरण्यात आली आहेत. यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे स्थानक, प्रलंबपादासन, पद्मासन, सिंहासन तसेच ध्यानमुद्रा, धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा, वरदमुद्रा व महापरिनिर्वाणमुद्रेत कोरण्यात आली आहेत. सोबत बोधिसत्त्वांची शिल्पेही पाहावयास मिळतात. लेणे क्र. ३ हा एक सुंदर विहार असून त्यात दोन खोल्या असलेली ओसरी व १८ खोल्या असणारा मंडप आहे. हे लेणे गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री व मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुमावी यांनी खोदवले. ओसरीत ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील चार शिलालेख असून सातवाहन व पश्चिमी क्षत्रपांच्या ऐतिहासिक साधनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. लेणे क्र. १० हा एक मोठा विहार असून लेणे क्र. ३ सारखा आहे. हा विहार जुन्नर येथील लेण्याद्री विहारानंतर सर्वांत मोठा विहार समजला जातो. या लेण्यात स्तंभ व दोन खोल्या असलेली ओसरी, तसेच तिन्ही बाजूंनी १६ खोल्या असलेला मंडप आहे. मागच्या भिंतीत एक मोठा स्तूप होता. तो यादव काळात भैरवमूर्तीत रूपांतरित केल्याचे दिसून येते. या लेण्यात एकूण सहा शिलालेख असून त्यातील एक लेख आभीर राजाचा आहे. हे लेणे नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने खोदवले असल्याचे याच लेण्यातील शिलालेखांवरून समजते. या लेण्यातील शिलालेख प्राचीन भारतीय इतिहासाच्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. लेणे क्र. १८ हे या टेकडीवरील एकमेव चैत्यगृह असून ते १२ मी. लांब व ६.५ मी. रुंद आहे. याचा तलविन्यास चापाकृती असून छत गजपृष्ठाकार आहे. लेण्यातील स्तूप १७ स्तंभांनी वेढलेला आहे. या चैत्यगृहाचे मुख दगडी असल्याने लेणी विकासक्रमामध्ये ते दुसरी अवस्था सूचित करते. या लेण्यातील तीन शिलालेखांपैकी एकात सदर लेणे भटपालिकेने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. चैत्यगृहाच्या दरवाजावरील कमानीवर घोडे, हत्ती, बैल, वाघ, श्रीवत्स व एक लेख इत्यादी कोरले आहेत. लेणे क्र. १९ हे कण्ह सातवाहनाच्या काळात खोदले असून आकाराने लहान आहे. यात सातवाहनकालीन प्राचीनतम शिलालेख आहे (इ. स. पू. सुमारे ३०-१२). या लेखात नासिकचा उल्लेखही आढळून येतो. लेणे क्र. २३ हे एक विशाल लेणे असून सहा ते सात लहान खोल्यांपासून बनले आहे. या लहान खोल्या काही प्रमाणात तोडून एक भव्य आवार तयार केले आहे. लेणे क्र. २४ हे दोन खोल्या असलेले एक लहान लेणे आहे. या लेण्यात वाघ, बैल, दोन कुबडे असलेला उंट, मेंढी, डुकरे, हरीण, स्त्रीचे मुख असलेला घोडा, घुबड, उंदीर आणि लहान मुले इ. शिल्पे व दोन शिलालेख आहेत. लेणीत सांस्कृतिक विकासाचे तीन टप्पे दिसून येतात. पहिला टप्पा इ. स. पू. सु. पहिले शतक ते इ. स. तिसरे शतक असा आहे. दुसरा टप्पा सु. पाचव्या-सहाव्या शतकानंतर सुरू होतो. सातव्या शतकानंतर हळूहळू ही लेणी जैन व हिंदू धर्मांच्या प्रभावाखाली आली असावीत, असे येथील काही शिल्पांवरून दिसून येते.

कपिचीत बौद्ध लेणी , जुन्नर
जुन्नर परिसरातील कपिचीत ( लेण्याद्री ) व त्याच्या शेजारील टेकडीवरील प्रसिद्ध थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी-समूह आहे. जुन्नरपासून ५ किमी. उत्तरेस कुकडी नदी ओलांडून या समूहास जाता येते. या लेणी-समूहात एकूण ३० लेणी असून, त्यांत दोन चैत्यगृहे व बाकीचे विहार व साध्या खोल्या आहेत. या लेण्यांत एकूण सहा धम्मलिपी मधील शिलालेख ही कोरण्यात आले आहेत. सातवाहनकाळात या लेण्यांत ‘कपिचित’ नावाचा संघ राहत होता. लेण्यांचा क्रम साधारणतः ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे आहे.या लेणी मधील लेणे क्र. ६ हे चैत्यगृह दक्षिणाभिमुख असून याचा चैत्यगवाक्ष पूर्णपणे बंद आहे. हा लयननिर्माण तंत्रातील बदल निश्चितपणे चैत्यगृहस्थापत्यातील नवा टप्पा सूचित करतो. या लेण्याला ६.३० मी. रुंद, २.०३ मी. खोल आणि ३.७६ मी. उंच असा ओळीने स्तंभ असलेला (Pillar fronted) मुखमंडप (ओसरी) आहे. पायऱ्यांच्या चौकोनी शंक्वाकृती घटकावर कुंभाकार तळखडा, अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, आमलकयुक्त पेटीसारखा घटक, पायऱ्यांचा उलटा चौकोनी शंक्वाकृती घटक आणि त्यावर पशुशीर्ष असा या स्तंभांचा घटकक्रम आहे. यात पाठीला पाठ टेकून बसलेले हत्ती (आतील बाजूस सिंह) आहेत. या मुखमंडपातून आपण सभामंडपात जातो. आत याचे विधान चापाकार आहे. सभागृहाचे छत गजपृष्ठाकार असून त्यावर दगडी तुळया (फासळ्या) कोरल्या आहेत. मागच्या बाजूस अखंड दगडात स्तूप कोरला असून खालच्या गोलाकारावर वेदिकापट्टी, त्यावर अंड व हर्मिका कोरलेली आहे. हर्मिकेचा वरील भाग सपाट असून मध्ये लाकडी छतासाठी खोबण कोरलेली आहे. लयन स्थापत्यानुसार हे चैत्यगृह इ. स. दुसऱ्या शतकाच्या पहिल्या दशकात खोदल्याचे सांगितले जाते. या लेण्याच्या आतील बाजूस अर्धस्तंभ व त्याच्या मागे, डावीकडे व उजवीकडे एकूण सोळा स्तंभ आहेत. स्तूपाच्या मागील सहा स्तंभ साधे अष्टकोनी आहेत; तर बाकीचे मुखमंडपातील स्तंभांसारखेच अलंकृत असून वरती पशुशीर्ष आहेत. या लेण्यातील शिलालेखात कल्याणच्या हेरणिकचा पुत्र ‘सुलसदत्त’ याने हे चैत्यगृह अर्पण केल्याचे म्हटले आहे. लेणे क्र. ७ हे जुन्नरमधील लेण्यांत आकाराने सर्वांत मोठा विहार असून यात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जिना आहे. विहाराच्या प्रांगणात व डावीकडे पाण्याची टाकी खोदली आहेत, तर दर्शनी भागावर दगडी बाकांवर आधारित सहा स्तंभ आणि दोन्ही बाजूंच्या कडेस अर्धस्तंभ कोरले आहेत. दगडी बाकांस कक्षासने व त्याच्या बाहेरील बाजूस वेदिकापट्टीचे नक्षीकाम केलेले दिसते. स्तंभांवर वरील बाजूस पाठीला पाठ टेकून बसलेले सिंह, हत्ती व बैल कोरले आहेत. विहाराचा सभामंडप १७.३९ मी. खोल, १५.५५ मी. रुंद व ३.३८ मी. उंच असून मंडपात कोठेही खांबांचा आधार नाही. याच्या तिन्ही बाजूंस दगडात कोरलेला अखंड बाक असून बाजूंच्या भिंतींत एकूण २० खोल्या भिक्षूंच्या निवासासाठी कोरल्या आहेत. लेणे क्र. १४ हे या गटातील दुसरे चैत्यगृह आहे. परंतु याचा आकार गजपृष्ठाकृती नसून काटकोनी आहे. पूर्वी दर्शनी भागावर कलश व अष्टकोनी स्तंभ होते; त्यांचे काही अवशेष छतावर शिल्लक आहेत. घराच्या छतास लाकडी तुळया लावतात, तसेच येथेही बाहेरील छतावर तुळयांची प्रतिकृती दगडात दिसते. या चैत्यगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतील मंडपाचे छत सपाट असून, मागील बाजूस भिंतीपासून अलग असलेला स्तूप कोरलेला आहे. त्यावर वेदिकापट्टी, हर्मिका व छतात कोरलेली छत्री आहे. स्तूप, भिंती व छतावर मातीचा गिलावा व रंगकाम केल्याचे काही अवशेष दिसतात. या चैत्यगृहाच्या दरवाजावरील शिलालेखात उपासक तापसचा पुत्र व उपासक कपिलचा नातू ‘आनंद’ याने हे चैत्यगृह पुण्यकर्मार्थ दान दिल्याचे म्हटले आहे. लेणे क्र. २५ ते २८ यांचे विधान थोड्याफार फरकाने लेणे क्र. ८ प्रमाणेच आहे. लेणे क्र. २६ मधील शिलालेखात, कपिचितच्या संघास उ

कपिचीत बौद्ध पूर्व लेणी समूह , जुन्नर
या समूहाकडे जाण्यासाठी लेण्याद्री डोंगराच्या पायथ्यापासून पूर्वेकडे, सुमारे १.०६ किमी. अंतरावर, बल्लाळवाडीच्या साधारण वायव्येस असलेल्या दोन डोंगरांच्या घळीत जावे लागते. उजव्या डोंगरावर पाच व त्याच्या विरुद्ध बाजूच्या डोंगरावर तीन अशी एकूण आठ लेणी येथे आहेत. येथे उजव्या बाजूस एक सुंदर चैत्यगृह आहे. चैत्याचा दर्शनी भाग सरळ उभ्या असलेल्या (किंवा जमिनीशी काटकोनात) उंच कपारीत कोरला असून दर्शनी भागाची उंची ७.६२ मी. व रुंदी ६.१० मी. तर चैत्यगृहाची खोली सुमारे ७.८० मी. आहे. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर अप्रतिम नक्षीकाम केले आहे. प्रवेशद्वार १.०६ मी. रुंद असून त्यावर व त्याच्याशी समांतर दोन्ही बाजूंस अशा एकूण ३ चैत्यकमानी कोरल्या आहेत. त्याच्या वरच्या बाजूस लहानसा अरुंद सज्जा (Gallery) आहे. त्यावर पिंपळाच्या पानाच्या आकारासारखे एक देखणे चैत्यगवाक्ष असून ते आरपार कोरलेले आहे. संपूर्ण गवाक्षाच्या अर्धवर्तुळाकार पट्टीवर एकात-एक गुंफलेली सहा पाकळ्यांची फुले कोरली आहेत. एका पाकळीची दुसऱ्या पाकळीशी गुंफण फारच प्रमाणबद्ध कोरली आहे. वरील टोकास त्रिरत्नांचे चिन्ह आहे. पश्चिम भारतातील कोणत्याही चैत्यगवाक्षाच्या पट्टीवर याच्यासारखी नक्षी कोरलेली नाही. चैत्यकमानीच्या वरील बाजूस दोन लहान चैत्यकमानी असून त्यांत स्तूप कोरलेले आहेत. गवाक्षाच्या उजव्या बाजूस एकात-एक गुंफलेल्या त्रिदलाची नक्षी (Triskelion) व त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर स्वस्तिकांचा पट्टा चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस कोरला आहे. तसेच उजव्या भिंतीवर चैत्यकमानीत पीठावर धर्मचक्र कोरले आहे. याच्यावर पुन्हा लहान चैत्यकमानी व वेदिकापट्टीची नक्षी दिसते. डाव्या बाजूस भिंतीवर असेच कोरीव काम असून मोठ्या कमानीत बोधिवृक्ष कोरला आहे. यातील त्रिदल नक्षीचे खास वैशिष्ट्य आहे. नाशिकच्या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर ही नक्षी कोरली असून महाराष्ट्रातील इतर कोणत्याही लेण्यांत ती दिसत नाही. प्राचीन ग्रीक नाण्यांवर हे चिन्ह दाखविले आहे. येथून जवळच असलेल्या बल्लाळवाडीनजीक ‘इरॉस’ या ग्रीक देवतेचे लहानसे शिल्प सापडले होते. या सर्व निरीक्षणांवरून देणगी देणारा किंवा कारागीर यवन म्हणजे ग्रीक असावा, असे सुरेश जाधव यांचे मत आहे. चैत्याच्या आत, मागील भिंतीपासून अलग असलेला, हर्मिकेसह स्तूप दिसतो. चैत्यगृहाचे विधान चापाकार आहे. तसेच छत गजपृष्ठाकृती आहे. परंतु एकंदरीत ही लेणी अपूर्ण राहिली आहे. याचे विधान व सर्वसाधारण कलाकुसर नाशिक लेणे क्र. १८ व अजिंठा लेणे क्र. ९ च्या चैत्याशी जुळणारी आहे. सुरेश जाधव यांनी या चैत्यगृहाचा काळ इ. स. पू. पहिल्या शतकाच्या अखेरीस किंवा इ. स. पहिल्या शतकातील पहिली दोन दशके ठरविला आहे. या समूहातील इतर लेणी साधी आहेत. त्यांतील एक बऱ्यापैकी विहार आहे. त्यास ओसरी, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस खिडक्या, आत मंडप व काही खोल्या आहेत.

अजंठा बौद्ध लेणी , औरंगाबाद
महाराष्ट्रातील प्राचीन शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. अजिंठा हा गाव लेण्यांजवळ ६ किमी. च्या आत डोंगरमाथ्यावर असल्यामुळे इंग्रज लेखकांच्या लेखांत यांचा उल्लेख ‘अजिंठ्याची लेणी’ असा असला, तरी तेथील स्थानिक लोक त्यांचा उल्लेख ‘फर्दापूरची लेणी’ असाच करतात. औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०८ किमी. वर व फर्दापूर या गावापासून दक्षिणेस सु. पाच किमी. वर सह्याद्री पर्वताच्या सातमाळ रांगेतील इंध्याद्री शाखेत ही लेणी खोदलेली आहेत. ह्यांचा शोध १८१८ मध्ये आकस्मिकपणे लागला असला, तरी निश्चितपणे १८१९ च्या एप्रिल महिन्यात स्मिथ ह्या अधिकाऱ्याला ठाऊक झाली असे दहाव्या लेण्यातील लेखावरून आता स्पष्ट झाले आहे. येथील चित्रशैलीचा प्रभाव नंतरच्या भारतातील व भारताबाहेरील चित्रकलेवरही पडलेला दिसून येतो. यावरून येथील कला प्रेरणाशील होती व अद्यापही आहे हे निर्विवाद आहे.
येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) आहेत. त्यांतील ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे असून बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० चैत्य आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हे हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ.स.पू. २ रे शतक ते इ.स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते, की ती ⇨वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकीर्दीत (सु. ४७५-५००) कोरली गेली असावीत. हीनयान पंथाच्या लेण्यांची स्थापत्यशैली आधीची वाटते. यांपैकी ९ व्या व १० व्या चैत्यगृहांच आलेख गजपृष्ठाकृती आहेत आणि मंडपाच्या चापाकार बाजूंत स्तूप कोरलेला आहे. या कालखंडातील विहारांत खांब नाहीत. फक्त यांत तिन्ही बाजूंना भिक्षूंना राहण्यासाठी खोल्या खोदलेल्या आहेत. या समूहातील लेण्यांत दहावे लेणे सर्वांत प्राचीन आहे. त्यात बुद्धप्रतिमा नाही. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी यूआन-च्वांग अजिंठ्यास जरी येऊन गेला नाही, तरी त्याने या लेण्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. एका विहारातील कोरलेल्या भव्य हत्तीचा उल्लेख करून तो अचल ह्या पश्चिम भारतातील भिक्षूने बांधला, असे त्याने नमूद करून ठेवले आहे. २६ व्या लेण्यांतील शिलालेख, हे शैलगृह आचार्य अचल ह्याचे आहे, असे सांगतो.
इतर शैलगृहांप्रमाणे अजिंठ्याची शैलगृहे त्यांतील वास्तुकलेसाठी आणि मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असली, तरी येथील लेणी मुख्यत्वे चित्रकलेकरिता प्रख्यात आहेत. चित्रे काढण्यासाठी भिंतींवर प्रथम माती, शेण, भाताचा भुस्सा किंवा ताग आणि तूस ह्यांच्या वस्त्रगाळ मिश्रणाचा गिलावा चढवीत आणि त्यावर चुन्याचा एक हलका हात मारून किंवा संदलाचा चकचकीत पातळ थर चढवून त्यावर गेरूने प्रथम चित्रांची बाह्यरेषा रेखाटून त्यात क्रमाक्रमाने रंग भरीत. अजिंठ्याच्या चित्रकारांनी मुख्यतः पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा आणि निळा हे रंग आपल्या चित्रकलेत वापरले आहेत. यांपैकी पुष्कळसे रंग नैसर्गिक पदार्थांपासून केलेले आहेत व अशी मूलरंगद्रव्ये अजिंठ्याजवळच सापडतात. लाखेपासून केलेल्या कार्बनी तांबड्या रंगासारखे काही उडणारे रंगही वापरले असावेत कारण काही चित्रांतील मानवी आकृतींच्या ओठांवरील लाल रंग नाहीसा झालेला दिसतो. फक्त निळा रंग (लाजवर्दी) तेवढा आयात केलेला असावा. सरसाचा रंगबंधक म्हणून बहुधा वापर केलेला असावा. भित्तिचित्रांशिवाय मूर्तिकामही रंगविलेले असावे. कारण अशा कामाचे अवशेष आजही आढळतात.
चित्रप्रसंग बव्हंशी जातकादी ग्रंथांतील बुद्धाच्या कथांतून निवडलेले आहेत. याशिवाय बौद्ध धर्मग्रंथांतून वर्णिलेल्या काही देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा आणि निरनिराळे प्राणी यांचीही चित्रे आहेत. छतांवर आणि स्तंभांवर वेलबुट्टीचे अप्रतिम नमुने चितारलेले आढळून येतात. अजिंठ्याच्या स्त्रियांच्या चित्राकृती अगदी अपूर्व आहेत. गौरवर्णा आणि श्यामा, मुग्धा, अर्धस्फुटिता, प्रौढा आणि कुमारिका, सुस्तनी आणि पृथुल नितंबिनी अशा, आभूषणे धारण करणाऱ्या, विविध स्त्रिया चित्रकारांनी इथे मूर्त केल्या आहेत. काही लेणी अपूर्ण आहेत व काही पडझड झाल्यामुळे खराब झाली आहेत.

वेरूळ बौद्ध लेणी , औरंगाबाद
लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ. ते महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस सु. २९ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान यांतून वेरूळच्या लेण्यांतील व्यामिश्र कला आणि प्रादेशिक परंपरांचा उलगडा होतो. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर’ असा केलेला असून त्यात येथील उत्कीर्ण लेण्यांचाही संदर्भ दिला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे. वेरूळ शिल्पाचा शैलीदृष्ट्या विचार करता हे मत थोड्याफार फरकाने ग्राह्य वाटते. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुधा कलचुरींच्या आश्रयाखाली हे काम सुरू झाले असावे. रामेश्वर लेण्याच्या समोर सापडलेली कलचुरी नाणी या कयासाला दुजोरा देतात
सध्याच्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या टेकड्यांत, औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच दक्षिणेकडून उत्तरेकडे लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या चौतीस आहे. पुरातत्त्वखात्याने क्रमांक न दिलेली अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात बारा लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर सतरा लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील पाच लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत-तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा, ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात, तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण झालेला दिसून येतो. यादवकाळातही काही तुरळक काम येथे झाले असावे. आठव्या शतकात येथील स्थापत्यकलेला बहर आला आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या काळात झाली.
वेरूळच्या लेण्यांमधील १ ते १२ क्रमांकांची लेणी बौद्ध, १३ ते २९ हिंदू आणि ३० ते ३४ जैन, अशी आहेत.

पितळखोरा बौद्ध लेणी , औरंगाबाद
पितळखोरा हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येते या गावाचे प्राचीन नाव हे पितंगल्य आहे या गावातील डोंगरात दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन गुंफा मानल्या जातात इथे बौद्ध धम्माच्या तेरा लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांपैकी दरीच्या निमुळत्या भागात नऊ लेण्या तर दुसऱ्या बाजूला चार अश्या तेरा लेण्यांचा समूह आहे हि लेणी दक्षिण भारताच्या सातमाळा पर्वत रांगेत कोरलेल्या आहेत व औरंगाबाद दक्षिण बाजूला ७८ किमी वर तर कन्नड पासून १७ किमी अजिंठा पासून एकरेषीय अंतरावर ८० किमी वर आहेत तर वेरुळच्या वायव्य दिशेला ३७ किमी आहेत चाळीसगाव पासून दक्षिण बाजूस हि लेणी ३२ किमी अंतरावर आपणास पाहायला मिळतात
या लेण्यांची निर्मिती सातवाहन काळात करण्यात आली आहेत इ स पूर्व दुसऱ्या शतकात हि लेणी कोरलेली आहेत यात दोन भागात लेण्यांची विभागणी केली जाते एक ते नऊ लेण्यांचा समूह व दहा ते तेरा लेण्यांचा समूह यामध्ये आपणास तीन , दहा, १२, व तर हे चैत्य आहेत लेणी १,२,४,५,६,७,८,९ हे विहार आहेत तर लेणी ११ हि स्तुपांची गॅलरी आहे व चार न्माबर हे मुख्य विहार आहे तर ३ नंबर ची लेणी हि मुख्य चैत्य आहे. येथील सर्व लेणी एकाच काळातील नाहीत लेणी १ हे इसवी सन दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेली आहेत तर २, ३ व पाच हि लेणी दुसऱ्या शतकाच्या काळातच कोरलेली आहेत बाकीच्या लेण्यांचा काळ हा इसवी सन पूर्व पहिले शतक आहे हि दक्षिण भारताची आद्य लेणी ठरतात याची माहिती व यांचा शोध १८५३ मध्ये लागला असून पाश्चात्य संशोधक जेम्स विल्सन यांनी जर्नल ऑफरॉयल एशियाटिक सोसायटी च्या क्रमांक ४ मध्ये यांचा प्रथम उल्लेख केलेला आपणास सापडतो पुढे जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्जेस यांनी इ स १८८० मध्ये प्रकाशित केलेला त्यांचा केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया या ग्रंथात १ ते ९ लेण्यांची माहिती दिलेली आहे लेणी १० व ११ चा शोध १९४१ मध्ये म गो दीक्षित यांनी लावला तर लेणी १२ व तेरा चा शोध १९५३ ते ५५ च्या आसपास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लावला व या लेण्यांना याच काळात राष्ट्राइय संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले

औरंगाबाद राजतडाक बौद्ध लेणी , औरंगाबाद
इतिहास : प्राचीन भारतात औरंगाबाद चे नाव हे राजतलाक असून याचे समकालीन पुरावा कान्हेरी येथील विश्वविद्यालयात सापडतो. कान्हेरी येथील लेणी क्रमांक ३ च्या चैत्य गृहाच्या सुरुवातीच्या स्तंभावर डाव्या बाजूंला च हा शिलालेख कोरलेला आहे. पैठण मार्गावर जाताना राजतलाक अर्थात औरंगाबाद या ठिकाणी पाण्याचे टाके व विहार दान दिल्याचा उल्लेख सापडतो.औरंगाबाद या ठिकाणावर वाकाटक राज वंशाने या लेण्या कोरण्यासाठी सहकार्य केलेलं आहे अशी माहिती अजिंठा या बौद्ध लेणी च्या समकालीन या लेण्या असल्यामुळे आपणास माहिती मिळते. औरंगाबाद बौद्ध लेणी हि ऐतिहासिक बौद्ध लेणी असून अजिंठा लेण्यापेक्षा या लेणी मध्ये सुंदर शिल्पांची कलाकुसर आपणास पाहायला मिळते प्राचीन व्यापारी मार्गावर असणारी हि बौद्ध लेणी तीन गटात विभागली आहे १ ते ५ हा पहिला गट हा बेगमपुरा पहाडसिंग पुरा या उपनगराच्या उत्तरेला दीड किलोमीटर आहेत तर दुसरा गट हा ६ ते ९ लेण्यांचा असून हा गट पहिल्या गटापासून पूर्वेस काही अंतरावर आहे तर तिसरा गट १० ते १२ ह्या लेण्या दुसऱ्या गटाच्या पूर्वेस हर्सूल तलावाच्या व गावाच्या पश्चिम भागात आहेत. एकूण १२ लेण्यांचा हा समूह इतिहासाच्या सर्वोच्च स्थरावरील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेवाकाटक हे राजे बौद्ध धम्माचे उपासक असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते वाकाटक नरेश वराह देव हा बौद्ध धम्माचा उपासक असून त्याने अनेक लेण्यांचे धम्म दान दिलेले आहे. याचे शिलालेख उपलब्ध आहेत .घटोत्कच बौद्ध लेण्यात वराह देवाचा शिलालेख आहे. शिवाय औरंगाबाद लेणी मधील काही लेण्यांचे काम हे बदामीचे चालुक्य यांनी देखील केलेलं आहे.वाकाटक यांचे राज्य इसवी सन २५० ते ५५० आणि चालुक्यांचा कालखंड हा इसवी सन ५४३ ते ७५३ असा आहे एकून बौद्ध लेण्यांच्या निर्मिती साठी या राजवंशा ने भरभरून दिलेले योगदान आज लेण्यात आपणास पाहायला मिळते. प्राचीन काळातील राजतलाक या ऐतिहासक नावाचा उल्लेख हा मराठवाडा म्हणून ओळखला जातो तर प्राचीन औरंगाबाद चे जुने नाव म्हणून या ठिकाणाला पाहिले जाते. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतेवेळी या ठिकाणी वज्रयान पंथाचा खूप मोठा प्रभाव होता याचे उल्लेख आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळात स्तुपला परीक्रमना करण्यासाठी प्रदक्षिणा पथ होते तसेच विहारांना हि प्रदक्षिणा पथ पाहायला मिळतात. औरंगाबाद हि लेणी हीनयान महायान वज्रयान या तिन्ही पंथाचा सहवास लाभेलेली लेणी असावी असे म्हटले तर वावगे ठरू नये असे आहे.
या लेणी वर १८४७ साली जेम्स बर्ड याने historical researches मधून माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये माहिती कमी आणि चुकीची होती पुढे १८५८ ला जोन्स विल्सन ने या तिन्ही गटांची माहिती दिली . त्यानंतर जेम्स बर्जेस यांनी त्यांच्या Antiquities of Bidar and Aurangabad report, या मध्ये या लेण्याचा सविस्तर तपशील दिला आहे. बर्जेस व फर्गुसन यांनी औरंगाबाद बौद्ध लेण्यांचा कालखंड हा इसवी सन सातव्या शतकाच्या शेवटी असा केलेला आहे. परन्तु यातील काही लेणी हि इसवी सन २५० च्या काळातील देखील आहेत हीनयान काळातील असून काही लेणी हि नंतर ची आहेत या लेणीतील स्तंभाची सजावट मूर्त्याची ओळख आणि शिवाय लेण्यांचा भूगोल लोकेशन इत्यादी त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. १९५७ मध्ये डग्लस बॅरेट यांनी औरंगाबाद लेण्यातील शिल्पकलेच्या स्थापत्यशास्त्राचे कौतुक करणारे ते पहिले विद्वान आहेत कि त्यांनी अजिंठा आणि एलोरा यांच्या पेक्षा इथली शिल्प उत्तम असून महत्वाची आहेत असे जाहीर सांगितले. दुलारी कुरेशी यांनी १९९८ मध्ये सविस्तर पणे लेण्यांची माहिती दिलेली आहे त्यांचा Art and Vision of Aurangabad Caves या पुस्तकात त्यांनी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

भीमाशंकर बौद्ध लेणी जुन्नर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानमोडी टेकडी समूहात भीमाशंकर बौद्ध लेणी समूह आहे. हि लेणी क्षत्रप नहपान यांच्या काळात बांधण्यात आल्याचे शिलाखातून समजते. हि लेणी इसवी सन पहिल्या शतकापासून बांधण्यात आली आहेत. या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणे क्र. २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणे क्र. १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत.लेणे क्र. २. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२० मी., रुंदी ६.१० मी. असून, हे दोन भागांत विभागले आहे. लेण्याच्या ओसरीत पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूंस दोन स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. स्तंभांस खाली कलश नसून ते दगडी बाकावर आधारित आहेत. बाकांस आतील बाजूने पाठ टेकण्यास कक्षासने व बाहेरील बाजूस वेदिकापट्टी कोरल्या आहेत.चैत्याच्या वरील भागात अर्धगोलाकार असलेला अपूर्ण चैत्यगवाक्ष असून त्यास बाहेरील बाजूने पिंपळाच्या पानासारखा आकार दिलेला नाही. तसेच हा भाग नेहमीप्रमाणे आरपारही खोदला गेला नाही, त्यामुळे या संपूर्ण भागास ‘आभासी चैत्यगवाक्ष’ संबोधले जाते. याच्यापुढे लहानसा सज्जा आहे.चैत्यगृहाच्या आतील मंडप काटकोनात असून त्यास सपाट छत आहे. या छतावर व ओसरीतील छतावर मातीच्या गिलाव्यांचे अवशेष दिसतात. मागील भिंतीत उभ्या काटकोनात मागील भिंतीपासून वेगळा असलेला दगड आहे. त्यात स्तूप कोरावयाचा असावा; परंतु यावर कालांतराने एक बसलेली ओबडधोबड स्त्री-मूर्ती कोरली गेली. या स्तूपाच्या बाजूस दोन लहान टाकी दिसतात. त्यांच्या मागील भिंतीत असलेल्या भेगांतून पाणी झिरपते व या टाक्यांत साठले जाते. बहुधा पाणी झिरपत असल्याने हे चैत्यगृह अपूर्ण राहिले असावे.
चैत्याच्या प्रांगणात उजव्या भिंतीवर व लेणे क्र. ३ च्या दरवाजावर एक शिलालेख असून त्यात लेण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. वरील चैत्यानंतरची बरीच लेणी साधी असून ती डोंगराच्या चढ-उतारावर जिथे जागा सोयीची वाटली अशा ठिकाणी खोदली आहेत. यांतील एका पोढीस लेणे क्र. ५ दिला असून त्यावर पोढी दान दिल्याचा उल्लेख असणारा लेख आहे. पोढीपासून थोड्या अंतरावरील लेणे क्र. ७ हे अत्यंत सामान्य असले तरी त्याच्या डाव्या भिंतीवर कोरलेला लेख ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. त्यात महाक्षत्रप ‘नहपान’ याचा मंत्री ‘अयम’, जो वत्स गोत्रातील होता, त्याने या मंडप (मटप) व पोढीस, वर्ष ४६ (इ. स. ७८) मध्ये पुण्यकर्मार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण जुन्नरच्या लेण्यांत तत्कालीन राजवंशाचे नाव दर्शविणारा हा एकमेव शिलालेख आहे. क्र. ८ पासून १७ पर्यंतची लेणी ही सामान्य खोल्या आहेत.

अंबा अंबिका बौद्ध लेणी , जुन्नर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानमोडी टेकडी समूहात भीमाशंकर बौद्ध लेणी समूह आहे. हि लेणी क्षत्रप नहपान यांच्या काळात बांधण्यात आल्याचे शिलाखातून समजते. हि लेणी इसवी सन पहिल्या शतकापासून बांधण्यात आली आहेत. या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणे क्र. २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणे क्र. १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत.लेणे क्र. २. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२० मी., रुंदी ६.१० मी. असून, हे दोन भागांत विभागले आहे. लेण्याच्या ओसरीत पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूंस दोन स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. स्तंभांस खाली कलश नसून ते दगडी बाकावर आधारित आहेत. बाकांस आतील बाजूने पाठ टेकण्यास कक्षासने व बाहेरील बाजूस वेदिकापट्टी कोरल्या आहेत.चैत्याच्या वरील भागात अर्धगोलाकार असलेला अपूर्ण चैत्यगवाक्ष असून त्यास बाहेरील बाजूने पिंपळाच्या पानासारखा आकार दिलेला नाही. तसेच हा भाग नेहमीप्रमाणे आरपारही खोदला गेला नाही, त्यामुळे या संपूर्ण भागास ‘आभासी चैत्यगवाक्ष’ संबोधले जाते. याच्यापुढे लहानसा सज्जा आहे.चैत्यगृहाच्या आतील मंडप काटकोनात असून त्यास सपाट छत आहे. या छतावर व ओसरीतील छतावर मातीच्या गिलाव्यांचे अवशेष दिसतात. मागील भिंतीत उभ्या काटकोनात मागील भिंतीपासून वेगळा असलेला दगड आहे. त्यात स्तूप कोरावयाचा असावा; परंतु यावर कालांतराने एक बसलेली ओबडधोबड स्त्री-मूर्ती कोरली गेली. या स्तूपाच्या बाजूस दोन लहान टाकी दिसतात. त्यांच्या मागील भिंतीत असलेल्या भेगांतून पाणी झिरपते व या टाक्यांत साठले जाते. बहुधा पाणी झिरपत असल्याने हे चैत्यगृह अपूर्ण राहिले असावे.
चैत्याच्या प्रांगणात उजव्या भिंतीवर व लेणे क्र. ३ च्या दरवाजावर एक शिलालेख असून त्यात लेण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. वरील चैत्यानंतरची बरीच लेणी साधी असून ती डोंगराच्या चढ-उतारावर जिथे जागा सोयीची वाटली अशा ठिकाणी खोदली आहेत. यांतील एका पोढीस लेणे क्र. ५ दिला असून त्यावर पोढी दान दिल्याचा उल्लेख असणारा लेख आहे. पोढीपासून थोड्या अंतरावरील लेणे क्र. ७ हे अत्यंत सामान्य असले तरी त्याच्या डाव्या भिंतीवर कोरलेला लेख ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. त्यात महाक्षत्रप ‘नहपान’ याचा मंत्री ‘अयम’, जो वत्स गोत्रातील होता, त्याने या मंडप (मटप) व पोढीस, वर्ष ४६ (इ. स. ७८) मध्ये पुण्यकर्मार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण जुन्नरच्या लेण्यांत तत्कालीन राजवंशाचे नाव दर्शविणारा हा एकमेव शिलालेख आहे. क्र. ८ पासून १७ पर्यंतची लेणी ही सामान्य खोल्या आहेत.

भूतलिंगा बौद्ध लेणी , जुन्नर
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानमोडी लेणी समूहात भूतलिंगा लेणी समूह आहे. हि लेणी अंबा-अंबिका समूहातील शेवटच्या लेण्यापासून पुढे काही अंतरावर आहेत. . यात एकूण २१ लेणी व १४ पोढी असून महत्त्वाच्या लेणींना ३५ ते ४९ असे क्रमांक दिले आहेत. यातील चार-पाच वगळता बाकीच्या लेणी अगदी सामान्य आहेत.
लेणी क्र. ३५ ते ३७ या साधारणपणे एक खोलीवजा अर्धवट खोदलेल्या आहेत. या परिसरातील एका पोढीवर दानलेख कोरला आहे. लेणे क्र. ३८ मध्ये चौरस मंडप असून त्याच्या डाव्या व मागील भिंतीत प्रत्येकी दोन खोल्या आहेत. लेणे क्र. ३९ हे सुद्धा अपूर्ण असले तरी याचा आकार थोडा मोठा असून याच्या प्रांगणात पोढी, मंडप व काही खोल्या आहेत. लेणे क्र. ४० हे चैत्यगृह असून जुन्नरमधील सर्वांत देखणे दर्शनी भाग असलेले आहे. हे ३.७ मी. रुंद व ९.१० मी. खोल आहे. चैत्याच्या दर्शनी भागाची उंची सुमारे ११ मी. असून तो दोन भागात विभागला आहे. पैकी खालील भागात रुंद दरवाजा, त्यावर खंडित सज्जाचा शिल्लक भाग, पायऱ्या, प्रांगणात बाक व दोन पोढी आहेत. वरील दर्शनी भागात शिल्पांनी सजविलेले व इतर नक्षीकाम असलेले पिंपळाच्या पानाच्या आकाराचे सुंदर चैत्यगवाक्ष आहे. अगदी वरच्या पट्टीत सात मोठ्या व त्याच्या वरील अंगास लहान चैत्यकमानी असून तशाच त्या दर्शनी भागाच्या दोन्ही बाजूंच्या उभ्या पट्ट्यात कोरल्या आहेत. हा सर्व भाग मधल्या गवाक्षाच्या थोडासा पुढे घेतला आहे. कमानीच्या उजव्या कोपऱ्यात बोधिवृक्ष असून उपासकांनी आणलेल्या माळा त्यास अर्पण केल्याचा प्रसंग आहे. तसेच डावीकडे एक मनुष्याकृती अपूर्ण राहिलेली दिसते. तुळजा लेणी-समूहातही अशा प्रकारची शिल्पे आहेत.चैत्यकमानीच्या वरील निमुळत्या टोकाच्या उजव्या बाजूस पंचफणाधारी नागराज, तर विरुद्ध बाजूला मनुष्यरूपातील गरुड शिल्प कोरले आहे. हे शिल्प सातवाहन आणि क्षत्रप राजांच्या इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात. या शिल्पांना स्थानिक लोक भुते, तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत. यावरून या लेण्यास ‘भूत’ किंवा ‘भूतलिंग’ असे नाव पडले असे म्हटले जाते.कमानीच्या आतील अर्धगोलास मण्यांच्या झालरी असून त्यात कमळाच्या आकृती आहेत. यांतील एकाच्या मधल्या पाकळीत समभंगस्थानात महामायेचे शिल्प आहे. महामायेच्या दोन्ही बाजूंवर दोन हत्ती असून त्यांच्या सोंडेत लक्ष्मीवर जलवृष्टी करण्यासाठी कुंभ आहेत. दोन्ही हत्तींच्या पाठीमागील दोन-दोन पाकळ्यांत एक पुरुष व एक स्त्री अशी उभी असलेली युगुले अतिभंगमुद्रेत दिसतात. याच भागात चंद्रकोराच्या आकाराच्या सपाट पट्टीवर यवन (ग्रीक) चंद्र याने गर्भद्वार दान दिल्यासंबंधीचा लेख कोरला आहे. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावरील शिल्पांचे कार्ले व बेडसे येथील शिल्पांशी लक्षणीय साम्य आहे. चैत्यगृहाच्या आतील भाग अपूर्ण असून याचे विधान गजपृष्ठाकृती किंवा चापाकार आहे. तसेच छत अर्धगोलाकार आहे. उजव्या बाजूस चार अष्टकोनी खांब असून ते लेण्याच्या आकाराशी थोडेशे असंगत वाटतात. डाव्या बाजूच्या भिंतीत खांबांची फक्त सुरुवात केलेली दिसते. पाठीमागे अर्धगोल भिंतीपासून अलग असा स्तूप कोरला आहे. त्यावर हर्मिका नाही. परंतु यष्टीसहित छत्र बसविण्यासाठी चौरस खोबणी मात्र आहे.
लेणे क्र. ४१ ते ४७ वरच्या मजल्यावर (क्र. ३९ च्या वर) एकास एक लागून अशा खोल्या आहेत. यांतील काही खोल्यांच्या प्रवेशद्वारांवर चैत्यकमानी कोरल्या आहेत. तसेच स्तूप, वेदिकापट्टी व लहान चैत्य-कमानींच्या आत नक्षीकाम केले असून त्यांत एकातएक गुंफलेली फुले, नंदीपद, त्रिरत्न, श्रीवत्स आणि धर्मचक्र कोरल्याचे थोडेशे अवशेष दिसतात. लेणे क्र. ४८ व ४९ चैत्याच्या वरील डोंगरात असून ती अपूर्ण आहेत.

कुडा बौद्ध लेणी , तळा , रायगड
संशोधन – रायगड जिल्यातील तळा तालुक्यातील कुडे हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेला महोबा चा डोंगर आहे. या डोंगरात ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेणी आहे. ह्या लेण्यांचा प्रथम शोध १८४८ साली लागला. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी लिहलेल्या Cave and temple of india या पुस्तकात त्यांनी नोंद केली आहे, कि हि लेणी पहिल्यांदा १८४८ साली उजेडात आली. Gazetteer of the Bombay Presidency Vol XI मध्ये कुडा लेणी ची माहिती आपणास मिळते. आता पर्यंत ब्रिटिश संशोधकांनी ३१ शिलालेखांचे संशोधन केले होते ABCPR लेणी संवर्धक युनिट समता सैनिक दल या लेणी संवर्धक टीम ने २३ डिसेंबर २०१८ रोजी लेणी क्रमांक ३ च्या उजव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्यावर असलेला शिलालेखाचे संशोधन केले. या लेणी समूहात २७ पूर्ण अपूर्ण लेणी आहेत तर ११ पाण्याची टाकी आहेत व ३२ शिलालेख आहेत. हि लेणी दोन विभागात विभागलेली आहे. १ ते १५ हे खालच्या स्तरावर आहेत तर लेणी क्रमांक १६ ते २७ हे वरच्या स्तरावर आहेत. लेणी चा कालखंड साधारण पणे इसवि सन पूर्व पहिल्या शतकातील आहे. तर इसवी चौथ्या शतका पर्यंत इथे लेणी ची निर्मिती होताना आपणास पाहायला मिळते. लेणी क्रमांक ६ मधील शिल्प हि इसवी सन चवथे ते पाचव्या शतकातील आहेत. तर हे चैत्य गृह गौतमीपुत्र यज्ञ सिरि सातकर्णी यांच्या काळातील आहे. कान्हेरी लेणी च्या लेणी क्रमांक ३ शी समकालीन आहे.
कुडा बौद्ध लेणी सातवाहन यांचे मांदाड बंदरावरील अधिकारी महाभोज यांच्या अधिपत्याखाली बांधण्यात आलेली लेणी आहे. कुडा बौद्ध लेणी राजपुरी खाडी च्या पूर्वेला असलेल्या महोबाच्या डोंगरात कोरलेली आहे. या लेणी संकुलात एकूण २७ पूर्ण आणि अर्धवट राहिलेल्या लेण्या आहेत. इथे एकूण पाच चैत्यगृह, २२ विहार ११ पाण्याची टाकी आणि ३२ शिलालेख आहेत. लेणी क्रमांक १,६,९,१५ आणि २१ हि चैत्यगृह आहेत. लेणी क्रमांक ६ हे सर्वात मोठे चैत्यगृह असून इथे बुद्धांची शिल्प कोरलेली आपणास पाहायला मिळतील. धम्म चक्र प्रवर्तन मुद्रेतील भगवान बुद्धांच्या मुर्त्या दर्शनी भागात हि आणि आतील विहारातील भागात हि आहेत. लेणी ला समोर हत्तीच्या जोडीचे शिल्प असलेले आपणस पाहायला मिळेल. विविध प्राण्यांची शिल्प देखील लेणी मध्ये आढळून येतात.
शिलालेख – लेणी क्रमांक १ व ६ येथील शिलालेखांच्या अनुसार कुडा लेणी साठी मांदाड बंदरातून मांदव वंशाकडून मोठे योगदान मिळत होते एकूण च कुडा लेणी ला मांदव वंशाचा राजाश्रय असल्याचे निदर्शनास येते. लेणी क्र. सहा मध्ये शाक्य वंशातील भिक्खु यांनी बुद्ध मूर्ती धम्म दान देवून दीप लावण्यासाठी चेंडीन शेती दिल्याची नोंद आहे. लेणी क्र. सात मध्ये वैद्याच्या परिवाराने लेणीचे दान दिले आहे. लेणी क्र.९ एका ब्राह्मण उपसाकाच्या पत्नीने चैत्य गृहाचे धम्म दान दिले आहे. लेणी क्र.१० व १६ मध्ये सिवपिरीत आणि मृगद माळी यांनी लेणी व पाण्याचे टाके दान दिले आहे.. लेणी कर. १४ मध्ये कराड येथील लोहार समाजाचा उल्लेख आहे. लेणी क्र.१५ मध्ये महाभोज वेलीदत्त याच्या काळात रामदत्त आणि त्याच्या पत्नीने चैत्यगृह दान दिली आहे. लेणी क्र.१६ मध्ये स्थविर विजय याची शिष्या सपिला हिने तिच्या शिष्यासोबत लेणी धम्म दान दिली आहे. लेणी क्र. १७ मध्ये सार्थ वाहक स्वामिपुत्र नाग याने लेणी दान दिली आहे. लेणी क्र. १८ मध्ये श्रेष्ठी वसूलनाक याने लेणी दान दिली आहे. लेणी क्र. लेणी क्र. २३ मध्ये सार्थवाहक वेहमित्र याची पत्नी आणि पुसनाक याची आई सिवदत्ता हिने लेणी दान दिली आहेत. लेणी क्र. २४ मध्ये सार्थ वाहक अचलदास याचा मुलगा असालमित्र याने लेण्याचे आणि रस्त्याचे धम्मदान दिले आहे.

नेणवली बौद्ध लेणी , सुधागड पाली
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये स्थित असणारे नेणवली गाव या गावाचा इतिहास असा आहे कि या गावात एक प्राचीन वैभव संपन्न अशी लेणी आहेत . इसवी सन पूर्वी दुसऱ्या शतकात कोरलेली लेणी या लेण्या कोणी कोरल्या याचा नेमका अंदाज सांगणे कठीण तरी हि आपण याचा इतिहास पाहू या
इतिहास : नेणवली लेण्यांना खडसांबळे लेणी असे हि म्हटले जाते हे दोन्ही गावाच्या जवळ असणारी लेणी असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेत कोरलेली लेणी आहेत . हि लेणी प्राचीन बौद्ध व्यापारी मार्गावर आहेत चौल बंदरावरून नागोठणे खाडी मार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर हि लेणी कोरलेली आहे यांचा शोध रेव्हरंट ऍबटने १८८९ साली या लेण्यांचा शोध लावला . त्याआधी लेणिवर लिहिणाऱ्या फर्ग्युसन व बर्जेस याना याची माहिती नव्हती असे दिसते त्यानंतर हेन्री कझेन्स याने यावर लिहले आहे. हि लेणी इसवी सणाच्या पूर्वी २ च्या पूर्वी दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत या लेण्यांचे निर्माता राजवंश सापडत नसला तरी महाराष्ट्रात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन राज्यांचे साम्राज्य होते त्यामुळे साहजिक च ह्या लेण्यांची निर्मिती मध्ये सातवाहन राजांचा सहभाग असणार आपण असे म्हणू शकतो कि हि लेणी सातवाहन राजांच्या काळात कोरलेली आहेत शिवाय हा व्यापारी मार्ग असल्याने लेण्या ना सातवाहन राजांचे सहकार्य आहे असे वाटते व्यापारी मार्गावर असणारी हि लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणून स्वीकारले तरी चुकीचे वाटत नाही या लेण्याची निर्मिती इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापासून झाली असून ती इसवी सण पाचव्या शतकापर्यंत तिचे काम चालू होते त्यामुळे हा काळ सातवाहन राजांच्या साम्राज्यात होता विशेष कोकणवर सातवाहन राजांचे साम्राज्य होते आणि त्यामध्ये ह्या लेण्याची निर्मिती हि बरेच काही सांगून जाते. या लेण्यांच्या इतिहासात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे स्वातंत्र्य सेनानी ह्याच लेण्यात इंग्रजांपासून लपून राहिले होते. यांचा अर्थ हि लेणी या काळात इंग्रजांना सापडली नाहीच इतक्या आतमध्ये आहेत या लेण्यांच्या बाबतीत सांगायला अजून एक महत्वाची गोष्ट हि लेणी एकाच दगडात कोरलेली आहेत. लेण्याच्या शिल्पकलेची नोंद घ्यावी अशी काही लेणी आहेत तश्या पद्धतीची माहिती ऍबट याने दिलेली आहे शिवाय हेन्री कझेन्स यांनी दिलेली आहे.
या ठिकाणी जवळपास ३० ते ४८ लेणी समूह असल्याचे लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे काही जण २१ च लेण्यांचा उल्लेख करतात कारण प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे कारण बरीच लेणी हि गाडली गेली आहेत डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेली आहेत लेण्यांचा दर्शनी भाग पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे या लेण्यांवर शिलालेख असू शकतात हे नाकारता येत नाही जवळपास सर्वच लेण्याचे प्रवेश द्वार नष्ट झालेलं आहेत लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत आज ती भग्न असली तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते आजच्या घडी ला असणारा स्तूप डोंगरातून पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी टेक्निक अश्या बऱ्याच गोष्टी आपणास सांगता येतील
या लेण्यातील बरीच लेणी हि नष्ट झालेली आहेत भग्न अवस्थेत आहेत बऱ्याच लेण्यांच्या पुढील दर्शनी भाग नष्ट झालेले असून छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे लेण्याच्या एका ठिकाणी दोन स्तूपांचे अवशेष सापडतात अर्ध्या अवस्थेत ते स्तूप हि आहेत अर्हत भिक्खुंच्या अस्थी ठेवून त्यावर ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते आणि या ठिकाणी स्तूपणाची रांग असावी असे वाटते कारण अश्याच पद्धतीचे भाजे लेण्यांवर स्तूपांची मांडणी आहे कदाचित या लेण्यांच्या नंतर च भाजे लेण्यांची न निर्मिती केली गेली असावी असे वाटते .

गांधारपाले बौद्ध लेणी , महाड. रायगड
गांधारपाले बौद्ध लेणी इतिहास :महाड मध्ये पाले हे गाव महाड पासून अगदी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर हि लेणी असून मुंबई गोवा महामार्गावर च आहेत या लेण्यांना पाले लेणी किंवा गांधारपाले लेणी म्हणतात किंवा महाड बौद्ध लेणी म्हणून हि म्हटली जातात. हे एक नैसर्गिक बदंर असून जलवाहतुकीस सोयीस्कर अशी जागा होती टॉलमेंनी नुसार इसवी सन १५० च्या काळात पाले ला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लस च्या काळात इसवी सन २४७ च्या काळात पालैपट मई म्हटले जायचे वा तसे नाव असावे त्या नंतर पाले चा उल्लेख चौदावा नृपती अनंतदेव इसवी सन १०९४ याच्या ताम्रपट मध्ये बलीवपन किंवा पालीपट्टण असा उल्लेख आहे त्यांनतर पाले चा उल्लेख इसवी सन १७७४ ला फोर्बस च्या नोंदीत सापडतो त्याने आपल्या नोंद वहीत लिहून ठेवले आहे कि चढण्यास कठीण असलेले ठिकाण या ठिकाणी एलिफंटा व साष्टी सारखी विहार चैत्यगृह कोरलेली आहेत हि लेणी चौल व राजपुरी खाडीतील बंदरे व महाड वरध घाट तेर या प्राचीन मार्गावर आहेत इथे बहुमुल्य अशी ऐतिहासिक २८ ते ३० लेण्यांचा समूह आहे हि लेणी तीन स्थरावर आपल्याला पाहायला मिळतात दुरून पाहिल्यावर हि लेणी तीन मजली इमारती सारखी भासतात
गांधारपाले लेणी गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनीटे लागतात. ही लेणी पूर्वाभिमुखी आहेत. सकाळी सकाळी सूर्याची किरणे थेट लेण्यावर पडून एक सौदर्य देखावा आपल्याला पाहायला मिळतो लेण्या कोरण्याचा कालावधी सातवाहन काळातील आहे या लेण्यांना दान देणारे कानभोज नावाचे शासन कर्ते असावेत असा त्या शिलालेखातून अर्थ घेता येतो कारण कुडा या ठिकाणी महाभोज यांचा उल्लेख येतो तर महाड इथे मात्र कानभोज असा उल्लेख आहे लेणी क्रमांक ८ इथे असणारा शिलालेख हा कानभोज याचा उल्लेख सापडतो त्याअर्थी इथे महाभोज राजवंश असावा असे म्हणणे वावगे ठरणार नाही
सातवाहन राजे यांच्या काळात हि पदे पाहायला मिळतात मुळात कोकण म्हणजे कोलिय लोकांची वस्ती असणारा भूभाग आहे समुद्र चे किनारे व सह्याद्रीचे कडे अश्या भूभागात इथे कोलिय गणाचे लोक राहत होते तसे काही संदर्भ आपणास सापडतातबौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी केल्व राजांनी च धम्मदान दिलेलं नाही तर अगदी सामान्य लोकांनी हि भरभरून धम्मदान दिलेले आहे महाड हे प्राचीन शहर असून ते मुळात महाड इतिहासाची प्राचीन नोंद आपणास इसवी सन पूर्व २२५ मध्ये सापडते कोकण किनाऱ्यावर असणार हे सर्वात महत्वपूर्ण व प्राचीन बंदर होते आणि महत्वाचे म्हणजे इथे व्यापाराचे सर्वात महत्वाचे साधन होते इसवी सणाच्या तिसऱ्या शतकात इथे भोज वंशीय राजा विष्णूपालीत राज्य करीत असल्याचे पुरावे याच लेण्यात सापडतात. हि लेणी याच काळात कोरली गेली असल्याचे म्हटले जाते तश्या पद्धतीचे शिलालेख उपलब्ध असल्याने ठोस म्हणता येते कि हि लेणी भोज वंशीय राजे यांच्या काळात बांधली गेली आहेत सातवाहन राजांच्या साम्राज्यात हि लेणी कोरली आहेत त्यांना भरभरून धम्म दान करण्याचे काम इथल्या राजांनी केले आहे लेण्यावर व्यापारी लोकांनी हि धम्म दान दिल्याच्या नोंदी आपणास पाहायला मिळतात.

कार्ला बौद्ध लेणी , लोणावळा
हा लेणी सोळा लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक याच्या दातृत्वाचा भाषेतील लेख दिसतो.चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोडय़ा, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आदि गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पांतील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतो. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषाने धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातले आहे. स्त्रियांच्या हातात बांगडय़ा आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोडे, कमरेवरच्या मेखला, गळ्यातील मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. इथे असलेल्या या मिथुन जोडय़ा तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा या लेण्यास दान देणाऱ्यांच्या असाव्यात असाही एक तर्क आहे.यातील एक जोडी अग्नीमित्र आणि विरावती ( इरावती ) यांची आहे . सोबत एकलविरा या दासीचे शिल्प आहे. सज्ज्याच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तींवर पुढे गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत.चैत्यगृहाच्या सज्ज्यात या लेण्याच्या करवित्याचा लेख आहे. ‘वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’ वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे, असा याचा अर्थ होतो.
कार्ल्यांच्या या लेण्यांमध्ये धम्मलिपीतले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्म विषयक आहेत. या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे डहाणू, सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या काठेवाड भागातील प्रभासतीर्थ वैजयंती म्हणजे आजचे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठरावीक गावांच्या प्रदेशास – प्रशासकीय भागास ‘आहार’ असे म्हणत. तर ‘मामल’ म्हणजे आजचे मावळ! मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.

भाजे बौद्ध लेणी , लोणावळा

शेलारवाडी बौद्ध लेणी , तळेगाव

बेडसे बौद्ध लेणी , कामशेत
कार्ला, भाजे अशा लेणीसमुहामधील बेडसे ही एक लेणी. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतातील हे बौध्दकालीन लेणं. आडवाटेवरील हे लेणी असल्याने सर्व सामान्यांपासून ती आजवर तुटलेली व अपरिचित अशी राहिली. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने अर्थातच येथे खूप शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. साधारण २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी. हीनयान पंथाची ही लेणी आहेत. पायथ्यापासून ते वरपर्यंत २० ते २५ मिनिटातच आपण शैलगृहाच्या प्रांगणात येतो. दक्षिणोत्तर शंभर-दोनशे मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेल्या या लेण्या असून, एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप, पाण्याची कुंडे असा बेडसे लेणीचा अमूल्य खजिना आहे. पायऱ्या चढून वर आल्यावर प्रथम दिसते एक लहानसा स्तूप. याच्या डावीकडे २-३ पाण्याची टाकी. टाकीवरच धम्मलिपी मधील एक शिलालेखही कोरलेला आहे. प्रवेशाद्वारातून आत गेल्यावर समोरच व्हरांडा असलेले भले मोठे चैत्यगृह दिसते. हा व्हरांडा चार अष्टकोनी स्तंभावर उभारलेला आहे. मध्यभागी दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धे अशा या स्तंभांनी जणू काही हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा सारा व्हरांडा आपल्या खांद्यावर तोलून धरला आहे. हे खांब पायापासून थेट छताला भिडलेले. अंदाजे २५ फूट उंचीचे स्तंभ आहे. हे स्तंभ म्हणजे बेडसे लेणीचे वेगळेपण ठरतात. अशा प्रकारचे स्तंभ इतरत्र आढळत नाहीत. दोन खांबाच्या बरोबरमध्ये चैत्यगृहाचे पिंपळ पानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार असून त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली आहे. बाजूच्या दोन्ही भिंतींवर अनेक मजली प्रासादांचे देखावे. त्यामध्येच गवाक्ष, एकावर एक चढत जाणारे सुंदर असे कोरीवकामाने सजलेले. याच्या खालील बाजूस विश्रांतीसाठी दोन भिक्खू निवास आहेत.आखीव, रेखीव प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे, गवाक्षे, वेदिकापट्टी सारं काही प्रमाणबद्ध आहे. व्हरांडाच्या अन्य भागावरही चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले. उजवीकडच्या एका भिक्खू निवासावर एक लेख कोरलेला आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या आनंद श्रेष्ठीचा पूत्र पुष्पणाक याचे धम्म दान .
चैत्यगृहाच्या दरवाजापाशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. त्या खाली पुन्हा खाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. उजवीकडच्या कमानीखाली छोट्या-छोट्या छिद्रांच्या नक्षीतून एक सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. प्रत्येक चैत्यकमानीमध्ये पुन्हा फुला-पानांची सुंदर नक्षी गुंफलेली दिसून येते. या गवाक्षांचा उपयोग सूर्यप्रकाश येण्यासाठी केला जात असे. पिंपळाकृती कमानीतून आत एका ओळीत दिसणारे स्तंभ दिसत होते. व मध्यभागी चैत्य दिसत होता.येथील सुरुवातीचे दोन खांब सोडले तर बाकी सर्व स्तंभ अष्टकोनी आहेत. यातील उजवीकडच्या काही खांबांवर त्रिरत्न, कमळ, चक्र आदी बौद्ध शुभचिन्हे कोरली आहेत. चैत्याची हर्मिका अजूनही चांगल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे हर्मिकेवरचे लाकडी छत्र सुमारे २२०० वर्षांपूवीर्चे असूनही चांगल्या स्थितीत आहे. कमलपुष्पांसारखी रचना असलेले. चैत्यगृहातील स्तंभावर काही बौद्ध प्रतिकंही कोरलेली आहेत. चक्र, कमळ व कोरीवकाम आहे. बेडसेच्या चैत्यगृहाप्रमाणे विहारही आगळा-वेगळा आहे. चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना आणि बाजूने भिक्षुकांसाठी राहण्यासाठी खोल्या. वेदिकापट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या. प्रत्येक विहारात झोपण्यासाठी दगडी ओटा. या विहाराचे बाहेरील काही भाग काळाच्या ओघात पडल्याचे स्पष्ट दिसून येते. लेणीच्या बाहेर ओळीने थंडगार पाण्याची कुंडे आहेत

कोंडीवते बौद्ध लेणी , अंधेरी

खेड बौद्ध लेणी . रत्नागिरी

कोल बौद्ध लेणी , महाड, रायगड
दुसऱ्या गटात भिक्खू निवास असलेले एक लेणे असून एक अर्धवट लेणी आहे व एक पाण्याचे टाके आहे.

आगाशिव( जखिणवाडी) बौद्ध लेणी , कराड
लेणी पुणे-बंगळूर महामार्गाच्या पश्चिमेस आहेत. त्या लेणींचा विस्तार जखिणवाडी, आगाशिव व चचेगाव या तीन गावांमध्ये आहे. ती तीन ओळींमध्ये आहेत. एकूण पाच चैत्यगृहे व उर्वरित विहार अशी रचना आहे. जखिणवाडीतील पहिल्या ओळीत तेवीस लेणी, दुसऱ्या ओळीत एकोणीस लेणी तर तिसऱ्या ओळीत बावीस लेणी आहेत. ती ओळ कोयना दरीसमोर येते. लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, काही लेण्यांमध्ये बुद्धमूर्ती नसून ‘दागोबा’ म्हणजेच दंडगोलाकार स्तूप आहे. त्यास बुद्धप्रतीक मानले जाते. तसे स्तूप सहाव्या व सोळाव्या लेण्यांमध्येही पाहण्यास मिळतात.लेणी क्रमांक पाचमधील चैत्य मंदिराचे अर्धवर्तुळाकृती छत अद्वितीय आहे. लेणी क्रमांक सोळामध्ये स्तूपयुक्त उपासना मंदिर आहे. बासष्टाव्या विहार गुंफेच्या तीन अंगांना सतरा छोट्या खोल्या आहेत. ” गोपाल याचा मुलगा संघमित्र याने लेण्यांचे धम्म दान दिले ” त्यासंबंधीचा शिलालेख सत्तेचाळीसाव्या लेण्यामध्ये आढळतो.
लेणी हीनयान पंथीयांची आहेत. ती बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी खोदलेली असावीत. ती हीनयान पंथीयांची असल्यामुळे त्यामध्ये अलंकरण व मूर्तिशिल्पे यांचा जवळजवळ अभाव आहे. आगाशिवजवळ जखिणवाडी समूहातील क्रमांक सहाचे चैत्य लेणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते लेणे 10.5 मीटर फूट खोदलेले व चार मीटर रुंद आहे. मुख्य दालनात जाण्यासाठी दरवाज्यावर खिडकी असून ते अर्धवर्तुळाकार व गजपृष्ठाकार आहेत. त्यात स्तंभांचा अभाव दिसतो.दरवाज्याच्या भिंतीलगत अर्धस्तंभ आहेत. त्यांच्या शीर्षावर उलटा घट व अमलकाची चौकट दिसून येते. त्यावर एका बाजूला सिंह व दुसऱ्या बाजूला धर्मचक्र आहे. जुन्नर येथील स्तूपाप्रमाणे येथील स्तूपाचे छत्र छताला भिडवण्यात आलेले आहे. तेथील एका चैत्य लेण्यात कुडा व कार्ले येथील चैत्यगृहाप्रमाणे दानी युगुलाचे शिल्प दिसून येते. ते बरेचसे झिजलेले आहे. ते शिल्प यक्ष दांपत्याचे असावे. पुरुषाने धोतरवजा अधोवस्त्र परिधान केलेले असून गळ्यात माळा व कानांत अलंकार आहेत. त्याच्या मस्तकावरील पागोटे कार्ले येथील दानी पुरुषाप्रमाणे आहे. स्त्रीमूर्तीच्या हातात करंडकासारखी वस्तू असून ती पुरुषाला अर्पण करताना दाखवण्यात आलेली आहे.
आगाशिव डोंगरावर तीन गटातील हि लेणी कराड चे वैभव आहे. प्राचीन करहाडक ते आजचे कराड हा प्रवास पाहणारी आगाशिव बौद्ध लेणी .

लयणगिरी (शिरवळ ) बौद्ध लेणी , शिरवळ, ता. खंडाला जि. सातारा

घटोत्कच बौद्ध लेणी , ता. सोयगाव जि. औरंगाबाद

जयभीम नमो बुद्धाय
ABCPR लेणी संवर्धक टीम गेली अनेक वर्षे लेणी संवर्धनासाठी काम करत आहे. यासाठी लेणी संवर्धन टीम च्या प्रत्येक सदस्यान आपले योगदान देत आलेले आहेत. परंतु काही अशी साधने आहेत कि, त्याचा आर्थिक खर्च टीम च्या सदस्यांना करणे शक्य नसते. यासाठी ABCPR टीम आपणास आवाहन करत आहे कि या धम्म कार्यासाठी आपण आपले आर्थिक योगदान देवून सहकार्य करावे.
ABCPR TEAM A/C DETAILS
Name: ABCPR TEAM
A/C Number: 38977234812
Bank: State Bank of India
IFSC CODE: SBIN0007452
Branch: Industrial Estate , Badlapur
Google pay, phone pay no : 8623979798