


चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखातून.......
या भारताच्या इतिहासात सम्राट अशोक हा या देशाला अज्ञात राहिला. या देशात जर सम्राट अशोक यांनी शिलालेख लिहिले गेले नसते तर कदाचित एक महान व्यक्तिमत्व आपण समजू शकलो नसलो. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या हयातीत लिहिले गेलेले शिलालेख हेच सम्राट अशोक यांच्या इतिहासाचे प्रमुख स्त्रोत आहेत.
चक्रवर्ती सम्राट हे विश्वातील पहिले सम्राट आहेत ज्यांनी प्राणीहत्या कायदा केला आहे. आपल्या राज्यात कोणत्याची प्राण्याची हत्या करणे हे दंडनीय अपराध आहे. प्राचीन काळात यज्ञामध्ये प्राण्यांची हत्या केली जात असे. बुद्धाने हि यज्ञामध्ये प्राणीहत्या करू नये म्हणून विरोध दर्शवला होता आणि यज्ञ कसे केले पाहिजे याचे ज्ञान लोकांना दिले होते. सर्वसामान्य लोकांमध्ये यज्ञ याग मध्ये पशुहत्या करण्याची परंपरा पाहायला मिळते. केवळ दुसऱ्यांना प्राणी बंदी करून चालणार नव्हते तर आधी सुरुवात स्वतःपासून झाली पाहोजे म्हणून सम्राट अशोक यांनी प्रथम आपल्यापासून सुरुवात केली. स्वतःच्या पाकशाळेत मारले जाणारे प्राणी आणि पशु प्रथम बंद केले. सम्राट अशोक यांच्या पाकशाळेत मोठ्या संख्येने प्राणी पशु यांची हत्या होत होती. भोजनासाठी मोठ्या संख्येने पशु प्राणी मारले जात होते. यावर प्रथम बंदी घातली. जनतेला हि सांगितले कि हे दोषयुक्त काम आहे. कोणी हि कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये म्हणून दंडक घातला. आता याचा अर्थ असा नाही कि प्राणी हत्या करू नये यामध्ये गरज आणि इच्छा या दोन गोष्टींची सांगड घालून हा आदेश दिलेला होता. त्यामुळेच सर्व जनतेचे सम्राट अशोक यांचा हा आदेश स्वीकारला. जनतेने सम्राट अशोक यांच्या प्रत्येक आदेशाचे अनुसरण केले. त्यामुळे प्राचीन काळात प्राण्यांना अभय मिळाले. प्राण्यासाठी अभयारण्य निर्माण झाली. त्यामुळे जंगलांची संख्या वाढली मोठी मोठी जंगले निर्माण झाली. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. शेतीसाठी पुरक वातावरण निर्माण झाले जमिनीची झांडाच्या लागवडीमुळे धूप थांबली. त्यामुळे सम्राट अशोक यांच्या राज्यात धरती सुजलाम सुफलाम असलेली पाहायला मिळाली.
आदेश कश्या पद्धतीने द्यायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट अशोक आहेत. सर्वात महत्वाचे तत्व आहे हे , जोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होत नाही आणि आपण इतरांना सांगत सुटलो तर त्या देशाचे पालन होत नाही. सम्राट अशोक यांनी आधी स्वतःमध्ये सुधारणा केली आणि मग जनतेत सुधारणा केली. म्हणून स्वतःपासून सुरुवात करा नक्कीच बदल होतो.
सम्राट अशोक यांचा प्राणी हत्या बंदी कायदा अभ्यासण्यासाठी खालील शिलालेख पहा
गिरनार शिलालेख भाग १

सम्राट अशोक यांच्याविषयी प्रत्येक शिलालेखातून त्यांच्या साम्राज्याविषयी त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेवू या.
क्रमश…
