• Post author:

चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखामधून भाग २ …..

प्रजा वत्सल सम्राट  
मनुष्य आणि पशु यांच्या आरोग्याची काळजी घेणारा विश्वातील पहिला राज्यकर्ता 
चक्रवर्ती सम्राट  अशोक 

जगाच्या इतिहासात नोंद करावी असा सम्राट असताना जगाच्या इतिहासात असा राजा झालेला नाही ज्याने जनतेसाठी केलेली काम आज आपल्याला वाचायला मिळतात. काळाच्या ओघात त्यांनी निर्माण केलेले रस्ते विश्रामगृह पाणपोई हॉस्पिटल  मेडिकल आपल्याला पाहायला मिळत नसले तरी त्यांच्या शिलालेखातून त्यांचे कार्य आपणास आज वाचायला मिळते आहे . 
आजवर आपण माणसासाठी दवाखाने असतात हे अभ्यासले होते. अगदी अद्यावत दवाखाने असतात अशी कोणत्याच राजाच्या काळात नोंद सापडत नाही. बौद्ध कालीन राजांचे वैभव च हे आहे कि त्यांनी मनुष्य हा केंद्र बिंदू मानून राज्य केले.  चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या राज्यात आणि राज्याच्या सीमेजवळ असलेल्या राज्यात हि सर्वत्र लोकांच्या हितासाठी केलेल्या कामांची पोचपावती म्हणजेच आपण असे म्हणू कि आपल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जनतेला देणारा जगातील पहिला रिपब्लिकन सम्राट होता. ज्याने आपल्या राज्यात जे काम केले आहे त्याच्या बद्दल लिखित नोंद ती हि जनतेला वाचायला मिळाली पाहिजे या हेतूने तयार केले आहे. अश्या पद्धतीने तर लोकशाही मध्ये हि कोणी करत नाही परंतु स्वतः एक चक्रवर्ती सम्राट  आहे असे असून देखील त्याने  आपली प्रजा हि आपली लेकरे आहेत  म्हणजेच काय तर पालकत्व स्वीकारून काम केले. सम्राट अशोक यांच्या कामांचा दाखला शिलालेख अगदी सविस्तर  सांगतात गिरनार येथील दुसरा शिलालेख वाचन करून या .

सवत विजितेम्हा देवानंप्रियस प्रियदसिनो राञो
एवमपि प्रांचतेसु यथा चोडा पाडा सतिय पुतो केतलपुता अ तांब
पणी अतियको योनराज ये वा पि तस अतियकस सामिनो
राजानो सवत देवानंप्रियस प्रियदसिनो राञो द्वे चिकीछा कता
मनुस चिकीछा च पसू चिकीछा च ओसूढानि च यानि मनुसोपागानिच
पसोपागानिच यत यत नास्ति सवता हरापितानि च रोपापितानि
मुलानि च फलानि च यत यत नास्ति सवात हारापितानि च रोपापितानि च
पंथेसु कुपा च खानापिता वछा च रोपिपिता परिभोगाय पसूमनुसानं

 

भाषांतर : देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा त्याच्या राज्यात सर्वत्र आणि सिमे जवळच्या राज्यात चोल पांड्या सत्यपुत्र केरळपुत्र ताम्रपर्णी यवन राजा अन्तियोक आणि अन्तियोक याच्या जवळच्या राज्यात सर्वत्र देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा याने दोन चिकित्सालय अर्थात हॉस्पिटल ची स्थापना केली आहे. मनुष्य चिकित्सालय आणि पशु चिकित्सालय . मनुष्याच्या उपयोगी आणि पशूंच्या उपयोगी औषधे जेथे जेथे नाहीत तिथे सर्वत्र आणून त्याची लागवड केली आहे. कंदमुळे आणि फळे जिथे जिथे नाहीत अश्या ठिकाणी सर्वत्र त्याची लागवड केली आहे. वाटसरू साठी विहारी निर्माण केल्या आहेत पशु आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वृक्ष लावले आहेत.

वरील शिलालेख वाचल्यावर  सम्राट अशोक हे किती प्रजावत्सल  आणि कर्तव्यदक्ष होते याची प्रचीती होते. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात म्हणजे साधी गोष्ट नाही हजारो वर्षापूर्वी ह्या सम्राटाने आपले कार्य काय असायला पाहिजे हे येणाऱ्या प्रत्येक शासन करणाऱ्या राज्यकर्त्यांना संदेश दिला आहे. माणसासोबत प्राण्यासाठी देखील दवाखाना निर्माण करणारा चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगात निराळे च ठरतात. आणि हे दवाखाने प्रत्येक राज्यात तयार केले आहे. माणसाला आजार होतात च पण प्राण्यांना आजार देखील झाले तर त्यांच्यावर उपाय योजना करणारा एक राज्यकर्ता असू शकतो हे स्वप्नात हि कुणी पाहू शकत नाही. पण इथे सत्यात घडून गेलेले हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. आज आपण प्रत्येक विभागानुसार दवाखाने पाहतो आज खाजगी दवाखाने वाढले आहेत. पण सरकारी दवाखाने प्रत्येक विभागात निर्माण करून सर्व सामान्य माणसाला आणि प्राण्यांना देखील कोणत्या हि आजारांचा सामना करता यावा आजारात कोणी दगावू नये म्हणून मायेने काळजी घेणारा मायाळू सम्राट म्हणून अशोकाकडे पाहिले पाहिजे. आता यावरून आपण एक निश्चित करू शकतो कि, जगात दवाखान्यांचा निर्माता जर कोण असेल तर चक्रवर्ती सम्राट अशोक आहे. म्हणून आपण चक्रवर्ती  सम्राट अशोक यांना Father OF Hospital  असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण जगात मनुष्य आणि प्राणी यांच्यासाठी हॉस्पिटल निर्माण करणारा जगात दुसरा कोणीच राजा झालेला नाही अगदी आतापर्यंत हि कोणी झालेला नाही. आणि त्यामुळेच  बाबासाहेब यांनी हा इतिहास जाणून च संविधानाची निर्मिती करताना सरकार कडे काय असायला हवे ह्याचे कायदे केले होते. उभ्या संविधानात बाबासाहेब यांनी सम्राट अशोक यांची शासन प्रणाली लागू केली आहे म्हणून च भारत आधुनिक लोकशाही म्हणतो आहे ती लोकशाही इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात च सम्राट अशोक यांनी लागू केली होती.  हॉस्पिटल ची व्यवस्था केल्यावर इथेच सम्राट अशोक  थांबलेले नाहीत तर एखाद्या मनुष्य किंवा प्राण्याला आजार झाल्यावर योग्य ती औषधे निर्माण झाली पाहिजेत म्हणून अद्यावत मेडिकल निर्माण केली. त्यावेळी नैसर्गिक औषधे होती  त्यामुळे त्या नैसर्गिक औषधी वनस्पस्तींची सुविधा निर्माण करून दिली यालाच आज आपण मेडिकल म्हणतो, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांची औषधे मिळतात असे ठिकाण. सम्राट अशोक यांनी स्पष्ट म्हटले आहे कि सरकारी यंत्रणेतून औषधांची व्यवस्था करण्यात आली  आहे. जिथे उपलब्ध नाहीत तिथे ती उपलब्ध करून दिली आहेत. म्हणजे हॉस्पिटल चे काम केले सोबत मेडिकल व्यवस्था देखील निर्माण करून दिली. त्यामुळे या मेडिकल चा निर्माता देखील सम्राट अशोक च आहे. आजवर च्या कोणत्याच राजाला हे शक्य झालेले नाही. या देशात अनेक राजे होवून गेले पण  त्यांना त्यांचा राज्य कुणी तरी हल्ला करून काबीज करेल याचीच भीती होती सम्राट अशोकाने मात्र तसे परराष्ट्रीय सबंध  तयार केले होते. सम्राट अशोक यांची विदेश नीती हे आज भारतातील राज्यकर्त्यांना अभ्यासण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यात व्यवस्था केली आहेच पण इतर राज्यात हि हि व्यवस्था करण्यासाठी ज्यांनी काम केले ते कदाचित एकमेव सम्राट आहेत. आपल्या राज्यातील जनतेसाठी अद्यावत मेडिकल म्हणजेच औषधालय निर्माण करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा सम्राट क्वचित होवू शकतो आणि आम्ही हे एवढी  वर्षे विसरून होतो. दवाखाने झाले औषधालय झाले त्यानंतर रुग्णांना फळे कंदमुळे मिळाली पाहिजे म्हणून प्रत्येक ठिकाणी फळझाडांची लागवड केली. आपल्या जनतेची एवढी काळजी घेणारा असा दुसरा कोणताच सम्राट झालेला नाही  हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सामान्य जनता रस्त्याने प्रवास  करत असेल तर प्रत्येक रस्त्यावर विहारी म्हणजेच पाणपोई निर्माण केल्या झाडे लावली पशु आणि माणसासाठी उपयुक्त अशी झाडे लावली जनतेच्या भल्याची कामे काय असतात हे सांगणारा शासन कर्ता म्हणून आदर्श शासनकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. 
सम्राट अशोक यांचा गिरनार येथील दुसरा शिलालेख हा सम्राट अशोक यांनी केलेल्या कामांचा महत्वाचा दाखला आहे. आजवर कोणत्याच शासनकर्त्याना ते जमलेले नाही. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे व्यक्तिमत्व या  शिलालेखातून आपणास पाहायला मिळते. 
आज आपणास सम्राट अशोक यांचे असेच व्यक्तिमत्व शिलालेखांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळते. यातून एक व्यवस्थापन कौशल्य आपणास पाहायला मिळते.सम्राट अशोक यांचे आवाढव्य साम्राज्य असताना देखील सीमेलगतच्या राज्यात हि तेथील जनतेची काळजी घेणे हे खरे कौशल्य आहे. इतिहासात अश्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात.  जागतिक व्यवस्थापनाच्या तुलनेत सम्राट अशोक यांचे व्यवस्थापन वाखनाण्याजोगे आहे. एवढ्या विशाल साम्राज्यात आपल्या जनतेची एवढी काळजी घेणारा प्रजावत्सल सम्राट इतिहासात अजरामर झाला परंतु  इथल्या देशाला तो आज हि समजलेला नाही. आजपर्यंत सम्राट अशोक  किती क्रूर होता  हेच सांगण्यात आले. परंतु जनतेची एवढी काळजी घेणारा  सम्राट अशोक आम्हाला कधीच सांगितला नाही. इतिहासकार आणि अभ्यासक या लोकांनी हि कधी सांगितले नाही एवढेच काय ज्यांना हि लिपी येत होती त्यांनी देखील कधीच सम्राट अशोक यांचे विश्लेषण केले नाही. सम्राट अशोक यांना शिलालेखात शोधण्याचे काम करण्याची संधी मिळाली आणि यातून मिळालेले सम्राट अशोक यांचे दुर्लभ असे व्यक्तिमत्व  पाहायला मिळते. 

चला असेच शिलालेखातून सम्राट अशोक जाऊन  घेण्याची प्रयत्न करू  या. 

ABCPR लेणी संवर्धक टीम

Leave a Reply