चक्रवर्ती सम्राट अशोकाचे अस्तित्व लपवण्यासाठी उभा केला बळीराजा..

बळीराजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळीराजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत. पण त्याच्याबाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे. शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल. बळीबाबत  संदर्भ सापडतात ते फक्त आणि फक्त पुराणकथेत च बाकी कोणतेही पुरावे नाहीत. बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो . या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सनाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही किंवा  कुणाच्या मुखात नाही.  बळीराजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन   हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात. दुसरीकडे बळीराजा हा शेतकरी राजा आहे पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही. बुद्ध इतिहासात नाही कि बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळीबाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासातील असेल तर तो बळीराजा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकच असू शकतो.  कसे काय ते पाहण्यासाठी बळीच्या कथेचा सारांश घेऊ या.
प्राचीन काळातील राज्यव्यवस्था  पाहिली तर आपल्या लक्षात येते कि सार्वभौम असे कुणाचेच साम्राज्य प्राचीन काळात नव्हते.  जर का प्राचीन काळात सार्वभौम असे कुणाचेच राज्य नव्हते तर बळी चे  साम्राज्य कुठून आले हा प्रश्न निर्माण होतो. बळी हा प्रल्हादाचा नातू आहे. प्रल्हाद हा विष्णू पुराणातील नरसिंह अवतारात विष्णूचा शत्रू दाखवलेला असुर राजा हिरण्यकश्यपू चा मुलगा  आहे. कथेनुसार हिरण्यकश्यपू चा मुलगा प्रल्हाद हा विष्णूभक्त आहे. त्याचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी आहे. विष्णू पुराणातील विष्णूचा वामन अवतारात बळी चा उल्लेख येतो. पुराणकथा म्हणजे गोष्टीरूप इतिहास म्हटले जाते. ते किती सत्य आहे हे  पुराव्यानिशी सिद्ध होत नाही. प्राचीन काळी ह्या कथा मौखिक असल्याने अनेकांनी आपल्या कथांची भर घालून पुराणकथा निर्माण केल्या आहेत. बळी राजाचा इतिहास  आणि भूगोल याचा ताळमेळ बसत नाही. बळीराजा नेमका कोणत्या काळात झाला याचे ऐतिहासिक दाखले नाहीत. त्यामुळे बळी हा भारताचा शेतकऱ्यांचा राजा होता हे धांदात खोटे आहे. बळी राजाच्या कारकिर्दी बाबत एक नजर टाकली तर लक्षात येईल बळी णे जनतेच्या हिताचे एक हि काम केलेले पाहायला मिळत नाही. ९९ अश्वमेध यज्ञ करणारा बळी प्रजाहितदक्ष राजा होता असे कुठेच दिसत नाही .केवळ सत्तेची लालसा यापलीकडे कोणतेही चांगले कर्तुत्व आपणास पाहायला मिळत नाही. वामन अवतारात विष्णू ने बळीला पाताळात गाडले इतकेच पुरोगामी विचारांचे लोक सांगतात पण विष्णू  ने त्याला सप्तस्वर्गाचे राज्य दिले होते हे हि पुराणात दिलेले आहे. याचे अनेक ठिकाणी संदर्भ पाहायला मिळतात. रामायणात रावणाचे बळी राजाशी सवांद आहे. विष्णूने प्रल्हादाला  वचन दिलेले आहे कि तुच्या वंशजाना मी मारणार नाही म्हणून मग बळीला मारले असे जे म्हटले जाते हे धांदात अजून एक खोटे समोर येते. बळीला पाताळाचे राज्य देणारा वामन हा कश्यप आणि अदितीचा मुलगा दाखवला आहे. अर्थात विष्णूने तो अवतार धारण केला आहे. आता विष्णू च्या अवतारांचा क्रम पहिला तर वामन परशुराम राम कृष्ण यात राम अवतारापर्यंत बळीचे अस्तित्व पाहायला मिळते. एकूण च कथेचा सार हा काल्पनिक कथेचा भाग स्पष्ट जाणवतो. बळी हा जर का  बहुजन सम्राट असता तर साहित्याट बळी ब्राह्मणांनी  जिवंत ठेवलाच नसता. बळी हे पात्र का निर्माण केले गेले याची सविस्तर उत्तरे आपणास चक्रवर्ती सम्राट  अशोक यांच्या इतिहासात सापडतात. वामन अवतारात बळी हा दुसरा तिसरा कुणी नसून सम्राट अशोक असून सम्राट अशोकाला इतिहासातून हद्दपार करण्यासाठी इथल्या बहुजनांना त्यांच्या सम्राटाचा विसर पडावा म्हणून निर्माण केलेले काल्पनिक पात्र आहे.  या घटनेचे ऐतिहासिक पुरावे चालुक्यांच्या राजधानी मध्ये कोरून ठेवलेले आहे.

वामन अवतार शिल्प बदामी लेणी कर्नाटक

कर्नाटक राज्यातील बदामी या लेणी मध्ये चालुक्यांनी विष्णूच्या वामन अवताराचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प पाहताना आपल्या लक्षात  येईल हि वामनाने विष्णूचे भव्य रूप दाखवलेले होते विष्णू हातातील शस्त्राने अनेक राजांची हत्या करत आहे. काही राजे त्याला अडवत आहेत. तर विष्णूच्या पायाजवळ एक शिल्प आहे वामनाचे  यामध्ये वामन शिल्प तुटलेले आहे  पण समोर बुद्धाचे शिल्प असून त्याच्या बाजूला एका सम्राटाचे शिल्प आहे. हे शिल्प पाहिल्यावर कोणत्याच पुराव्याची गरज भासत नाही कि हे बळी नावाचे  पात्र कोण आहे. बौद्ध धम्माला राजाश्रय देणारे सर्व सम्राट हे बौद्ध धम्माचे उपासक होते वैदिकांनी त्यांना लपवण्यासाठी अनेक काल्पनिक पात्रांची निर्मिती  केलेली आहे.
बदामी लेण्यातील हे शिल्प पाहिल्यावर चक्रवर्ती सम्राट अशोक यांना लपवण्यासाठी निर्माण केलेले हे पात्र आहे यावर आपले मत ठाम होते. कारण ज्या बळीराजाची कथा सांगितली जाते ती केवळ चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याशी जुळणारी आहे. महाबली महापराक्रमी प्रजाहितदक्ष सद्गुणी सामर्थ्यशाली ह्या साऱ्या उपाध्यांनी केवळ एकच सम्राट जगात विख्यात आहे. तो म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक. सम्राट अशोक यांच्या शिलालेखातून आपल्याला सम्राट अशोक यांच्या कर्तुत्वाची ओळख मिळते.
भारताच्या इतिहासातील अनमोल रत्न म्हणून सम्राट अशोकाच्या राज्याकडे पहिले जाते सम्राट अशोकाने आपले राज्य बुद्ध धम्माच्या अनुशासन चालवण्यास सुरुवात केल्यापासून जे काही बदल झालेले आहेत ते अशोक यांनी स्वतः लिखित लिहून स्वतः त्याची उदाहरणे दिलेली आहेत. जेव्हा जेव्हा हे वाचले जातील तेव्हा तेव्हा सम्राट अशोकाच्या या कार्याचा गौरव होणे स्वाभाविक च आहे आणि हे निरंतर राहावे यासाठी देखील आम्ही प्रयत्न केले पाहिजेत सम्राट अशोकाने जे धम्मानुसार चालवलेले शासन होते आणि त्यात जो काही बदल झाला ह्याचा शिलालेख गिरनार येथील शिलालेखात चौथ्या भागात मांडलेला आहे. भारताच्या इतिहासातील हि एक महत्वाची घटना म्हणून याकडे पहिले जाते जगामध्ये असंख्य सम्राट होऊन गेले आणि किती तरी राजे होऊन गेले पण जे सम्राट अशोकाने साध्य केले ते मात्र इतरांना करता आले नाही हे सर्वात महत्वाचे
नेमके काय घडले होते सम्राट अशोकाच्या राज्यात धम्म अनुशासनाने त्याचा सविस्तर आढावा घेऊ या शिलालेखाच्या माध्यमातून
शिलालेख सविस्तरपणे


“अतिकात अंतर बहुनि वास सतानि वढितो एव प्राणारंभो विहिंसा च भूतान ञातीसु
असंपतिपति ब्राह्मणा सामणा न असपतिपति त अज देवानं पियस पियदसीनो राञो
धम चरणेन भेरी घोसो अहो धाम घोसो विमान दसणा च हस्ति दसणा च
अगिखंधानी च अञानि च दिव्यांनी रूपानी दसयित्पा जनं यारिसे बहूहिवसस ते हि
न भूत पुवे तारिसे अज देवानं पियेस पियदसीनो राञो धमानूसस्टिया अनारं
भो प्राणान अविहीसा भूतान ञातीन सपटिपती ब्रह्मण समणान संपटिपति मातरी पितरी
सुस्तूसा थैर सुस्तूसा एस अञे च बहुविधे धम चरणे वढीते
पियदसी राजा धम चरण इदं पूताच पोता च पपोता च देवानं पियस पियदसीनो राञो
पवधयीसंती इदं धम चरण आव सवट कपा धमम्ही सीलम्ही तीस्टतो धम अनुसापिसति
एस हि सेस्टे कंमे य धंमानु सासनं धंमाचरणे पि न भवति असीलस व त इमम्ही अथम्ही
वधी च अहिनी च साधू एताय अथाय इदं लेखापितं इमस अथस विधी युजंतू हीनि च
लोचेता व्य द्वादस वासाभिसीतेनं देवानं पियेन पियदसीना राञो इदं लेखापितं”
प्राकृत शब्दांचे अर्थ
अतिकांत : होवून गेलेले आहे , वढितो: वाढले आहेत , ञातीसु : प्रति , असंपतिपति : अनादराचा भाव , धमचरणेन : धम्म आचरनाने , भेरी घोसो : भेरी चा आवाज , अहो : झाला आहे
विमानदसणा : राजमहाल दाखवणे , हस्ति दसणा : हत्ती दाखवणे
अगीखंधानी : आगीच्या मशाली , रुपानी : दृश्य , दसयित्पा: दाखवून , जनं : लोकांना , यारिसे : जसे
भूतपूवे : यापूर्वी , तारिसे : तसे अविहिंसा : अहिंसा , थेरसुस्तूसा : वृद्धांची सेवा करणे ,
पूता : मुलगा , पोता : नातू , पपोता : परतुंड , पवधयिसंति : वाढवणे , आव सवटकपा : पृथ्वीच्या विनाशापर्यंत , तिस्टतो: प्रतिष्टीत झाले , अनुसासीसंती : जीवनात कश्या पद्धतीने उतरवायचे हे शिकणे , असिलस : शील नसलेले , वधी : वाढणे ,अहिनी : कमी न होणे , युजंतू : लागणे
लोचेतव्या : रस घेणे
पूर्वी शेकडो वर्षापूर्वी असंख्य पशूंचा बळी दिला जात असे जीव प्राण्याच्या बाबतीत निदर्यता तसेच श्रमण आणि ब्राह्मणाप्रती सन्मानाची असणारी वागणुक वाढत च होती
परंत्तू आता देवाण प्रियदर्शी राजाने जेंव्हापासुन धम्म च्या प्रसार सुरु केला आहे त्यामुळे युद्धाच्या रणांगणावर आता धम्म घोष ऐकण्यास येत आहे. जनतेला आता मराजमहाल रथ हत्ती अग्नी ज्योती च्या दिव्य रूपात दाखवले जात आहेत. देवाण प्रियदर्शी राजा यांनी जेव्हापासून धम्म प्रचार सुरु केला त्यामुळे शेकडो वर्षांपासून जे दिसत नव्हते ते आता दिसू लागले आहे. लोकांनी आता पशु हत्याच निषेध करतात जीवांच्या प्रति आता निर्दयता चा अभाव होऊ लागलाय तसेच ब्राह्मण श्रमण यांच्याप्रती आता आदर सन्मान आहे मातापित्या सेवा केली जात आहे.
अश्या पद्धतीने आता धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. देवाण प्रियदर्शी राजा नेहमी धम्माची शिकवन विकसित करण्यासाठी तसेच देवाण प्रियदर्शी राजा चे मुले नातवे परनातवे धम्माच्या विकासात नेहमी आपले योगदान देतील. आणि ते पृथ्वीच्या अंतापर्यंत चालेल ते स्वतः धम्माचे अनुसरण करतील आचरणाचे पालन करतील तसेच लोकांना धम्माचे उपदेश देतील आणि सदाचार हि सांगतील
धम्माचा उपदेश देणे हे कार्य अंत्यंत गौरवास्पद आहे. ज्यांना आपले चारित्र्य रहित आहेत तसेच ज्यांना धम्म आचरण करता येत नाही त्यांनी देखील धम्माच्या विकासात मागे राहता कामा नये आणि याच उद्देशाने हा शिलालेख लिहलेला आहे. लोकांनी या धम्म च्या आचरणात स्वतःला समर्पित करावे हा लेख देवाण प्रियदर्शी राजा च्या राज्याभिषेकाच्या बाराव्या वर्षात नंतर कोरलेला आहे .
वरील शिलालेखाचा अर्थ पाहता आपणास एक गोष्ट लक्षात येईल कि सम्राट अशोकाने केवळ जनतेलाच आदेश दिलेला नाही तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला तो आदेश दिलेला आहे शिवाय ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करतील ते हि पृथ्वीच्या अंतापर्यंत कदाचित हा एकमेकव असा सम्राट आहे कि ज्याने आपल्या घरातील कुटुंबांनी देखील या धम्म कार्यात काम केले पाहिजे म्हणून आदेश लिहून ठेवलेला आहे . त्याशिवाय महत्वाचे म्हणजे हे कार्य अनादी काळ टिकून राहावे म्हणून हे कार्य सातत्याने केले पाहिजे कारण या कामामुळे रणांगणावर वाचणारे युद्धाचे वाद्य आज बंद होऊन त्या ठिकाणी धम्माचा जयघोष होऊ लागला आहे. युद्ध बंद करून मैत्री करुणेचा धम्म लोकांना सांगण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक बदल घडले लोकांमध्ये अनेक बदलावं झालेले पाहायला मिळाले हे सम्राट अशोकाने स्वतः पाहिलेला रिझल्ट होता म्हणून च सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे करण्याचा निश्चय केलेला आहे.
सम्राट अशोक एकमेव सम्राट ज्याचे आपल्या राज्यातील लहान थोरापासून सर्व जनतेवर लक्ष होते. आपल्या राज्यातील जनता कशा पद्धतीने जीवन जगते कोणते आचरण करते. कोणत्या वाईट वृत्तीचा स्वीकार तर करीत नाहीत न एवढ्या अचूक पणे जनतेचे निरक्षण करून त्यांना आचरण सुद्ध करण्यासाठी अशोकाने गावोगावी ” महापात्रा ” ची नियुक्ती केली होती. जगतात एकमेव असा सम्राट आहे एकमेव असा राजा आहे ज्याचे लक्ष सामन्यातील सामान्य माणसाकडे देखील आहे. आणि नुसते नियुक्ती करून थांबलेला नाही . तर अशोकाने महापात्रा म्हणून ज्यांची नियुक्ती केलीय ते व्यवस्थित काम करतात किंवा नाही, शिवाय आज आपण ग्रामसेवक सरपंच ह्या पदे गावी पाहतो ती आताची नसून अशोकाने इसवी सनापुर्वीच आपल्या राज्यात निर्माण केलेली आहेत त्या पदाला अशोकाच्या व्यवस्थापनात ” रज्जूक ” असे म्हटले आहे. अशोकाचे व्यवस्थापन आजच्या घडीला असणाऱ्या देशाच्या व्यवस्थापने सारखे आहे प्रथम राजा , त्याननंतर त्याच्या खाली त्याला सहकार्य करणारी केंद्रीय अधिकारी वर्ग , राज्य अधिकारी वर्ग , जिल्हा अधिकारी वर्ग तालुका अधिकारीवर्ग व ग्राम अधिकारी वर्ग देखील आपणाला पाहायला मिळतो . एकूण भारतीय संविधानातील सारीच पदे हि अशोकाच्या साम्राज्यात या आधीच असल्याची माहिती मिळते. यामध्ये जिल्हाधिकारी यासारख्या पदाला ” समाहर्ता” म्हटले जायचे आणि आज हि बिहार मध्ये आज हि कलेक्टर ला ” समाहर्ता ” म्हणतात. शिवाय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी छोटेमोठे मदतनीस आहेत. व हे सारे अधिकारी काम करतात कि नाही यासाठी अशोकाची असणारी गुप्तचर यंत्रणा कोण होती हे आज हि इतिहासाला माहिती नाही. परंतु अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सम्राट अशोकाने काही विशेष माणसांची यंत्रणा ठेवली होती त्याच्या नुसार प्रत्येक ठिकाणच्या अधिकार्याची व जनतेची इतम्भूत माहिती अशोकला मिळत असे. एवढेच काय अशोकाच्या जनतेमध्ये देखील कोणते वादाचे प्रकार निर्माण होत असतील तर त्याची माहिती देखील अशोकला मिळत असे. एखादी घटना घडण्याआधी तिचे निवारण करणारा राजा म्हणजे सम्राट अशोक म्हणून च पाहावा लागतो इतिहासात. जनतेचे आचरण सुधारावे म्हणून महापात्रो चे काम चोख व्हावे म्हणून देखरेख करणारा राजा म्हणून सम्राट अशोक च आपल्याला दिसतो. सम्राट अशोकाने धम्मचारण लोकांचे होते कि नाही यापासून ते आपल्या राज्यातील जनतेला पोटभर अन्न मिळते कि नाही इतपत नजर ठेवणारा राजा सम्राट अशोक आहे . आपल्या राज्यात बेरोजगार कोणी असू नये म्हणून नवनव्या व्यवसायांची निर्मिती करणारा सम्राट अशोक क्वचितच लोकांना माहिती आहे. सम्राट अशोकाने सामान्य जनतेला आपली संतान म्हणून स्वीकारले . जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे . व समस्त राजेशाही लोकांना संदेश दिला कि तुम्ही जनतेचे पालक व्हावे मालक नाही. अशोकाबाबत अनेक गैरसमज पसरवले गेलेत पण आपण योग्य त्याच मुद्द्यांची चर्चा केलेली चांगली असते. सम्राट अशोकाने व्यवस्थापकीय कौशल्य हे कमालीचे होते हे सांगण्याची गरज नाही. अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला व नुसता स्वीकारला नाही तर आपल्या जनतेला हि तो आचरण्यात आणून लोकांचे आचरण सुधारवले. लोकांना कोणती हि कमतरता येवू दिली नाही अशोक या जगातील पहिला असा सम्राट आहे. ज्याने शेतीमध्ये हि आर्थिक महासत्ता होता येते हे या जगाला दाखवून दिले आहे. अशोकाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून शेतीच्या मालाचे विदेशात व्यापाराच्या सहाय्याने विक्री करून नफा मिळवून देण्याचे काम हे अशोकाने केलेलं आहे. एकूण हा शेतकरी सम्राट लोकांना कळला नाही असेच म्हणावे लागेल. आज हे सांगण्याची वेळ येतेय कारण तुम्हाला ते कळले नाही शेती कशी करायची. कोणती पिके चांगली येवू शकतात यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची पद्धत सम्राट अशोकाने या भारताला घालून दिली आहे . शेतीची बरीच उत्पादने त्या काळात जगात विक्री साठी पाठवली जात असत अशोकाने आपल्या जनतेला उद्योजक बनवले आहे. अगदी सामान्य माणूस देखील स्वतःच्या पावलावर उभा राहत होता. इतकेच अशोकाने सामान्य जनतेची कोणती हि अडचण असली तरी तिची पूर्तता करीत असे. एखादी अधिकारी देखील चुकीचे वागणार नाही यासाठी काळजी घेणारा राजा सम्राट अशोक म्हणून च आपल्याला इतिहासात पहावा लागतो.
आता शेतकऱ्यांचा राजा कोण हे वेगळे सांगायची गरज नाही. सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे त्याशिवाय कामरूप, बंगाल , आसाम, ओरिसा पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भाग अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते  .
जगातील लोकांना भारतीय इतिहासाची खरी ओळख करून देणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला अग्रगण्य स्थान दिले जाते आणि दिलेच पाहिजे . त्याने आपल्या राज्यात बौद्ध धम्माला राजधर्माची मान्यता दिली व मैत्रीचा संदेश घेऊन जगभरात धम्मदूत पाठवले .   तसेच भारताच्या  कानाकोपऱ्यात अशोकाच्या आदेशाचे माहितीचे शिलालेख अभिलेख लघुलेख गुहालेख स्तंभ लेख कोरून ठेवले आहेत  आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासाची खरी ओळख आपणास मिळते हे श्रेय अशोकालाच द्यावे लागते अन्यथा भारताचा इतिहास हा अंधारात च पडला असता. त्याच्या कर्तृत्वाने भारतीय इतिहास हा एकदम प्रकाशमान झालेला आहे आणि हे कोणी नाकारू शकत  नाही .
सम्राट अशोक हा राजा होण्याआधी तो तक्षशिला व उज्जयिनी च राज प्रतिनिधी म्हणून कारभार पाहत होता बिंदूसार याच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी अशोकाचा राज्याभिषेक झालेला आहे.  अशोक हा ही महत्वकांक्षी राजा होता  आणि अशोक   नेहमी प्रजाहितदक्ष म्हणून जनतेच्या मनात कायम राहिला होता . अशोकाला कलिंग राज्य आपल्या राज्यात असावे कारण अशोकाच्या पूर्वजांनी अनेक  प्रयत्न करून हि कलिंग आजवर जिंकता आले नव्हते.  आणि ही सल अशोकाच्या ही मनात कायम राहिली होती. त्याला कलिंग हवे होते त्यावेळी कलिंग च राजा ब्रह्मदत्त आता भारताच्या ओरिसा प्रांतात दक्षिणेस कलिंग राज्य होते. या राजाची बौद्ध धम्मावर खूप आस्था होती. त्याने बौद्ध धम्मास राजश्रय दिला होता. त्याची राजधानी दंत्तपूर आहे या शहराला नाव पडले ते कलिंग च्या लोकांनी बुद्धाच्या महापरिनिर्वाण झाल्यावर बुद्धाचा एक दात मिळवून त्यावर स्तूप बांधला होता. म्हणून त्या ठिकाणाला हे नाव पडले होते. व सारे लोक बुद्धाला मानणारे असल्याने आजवर त्यांच्या एकीमुळे कोणत्याच राजाला कलिंग जिंकता आले नाही. अशोकाने आपल्या पूर्वजांनी अपुरे ठेवलेले भारत दिग्विजयचे कार्य पूर्ण करावे म्हणून इसवी सण पूर्व 261 मध्ये कलिंग वर स्वारी केली . मित्रानो अशोकाच्या आयुष्यातील  रणमैदानातील पहिली लढाई आणि शेवटची लढाई ठरली.
कलिंग राज्याच्या सैन्याचा पाडाव होत असलेले पाहून सामान्य जनतेने ही हातात शस्त्र घेऊन लढाईला उतरले व सामान्य जनतेला रनमैदानात पाहून  अशोकाचे मन युद्ध करण्यापासून दूर झाले. या युद्धात अनेक जीवांचा  बळी गेला होता अशोकाला ते आपल्याच लोकांचा गेलेला बळी पाहून खूप दुःख झाले त्याने विजय मिळवल्यावर तलवार म्यान केली.  परंतु या युद्धाचे परिणाम असे झालो की लाखो लोक मारले गेलं होते त्या परिसरात रोगराई पसरली साम्राज्य विस्ताराच्या आकांक्षेमुळे अनेक जीव मारले  गेले हे पाहून सम्राट व्यथित झाला आहे. आधीच त्याच्या घरी देखील बुद्ध धम्माचा प्रभाव होता त्यात त्याचा चुलतभाऊ उपगुप्त हा  भिक्षु बनला होता.  उपगुप्ताने सम्राटाला बुद्धाच्या शिकवणीची सार समजावून सांगितले अशोक याने तेव्हा विचार केला की माणसे मारण्यापेक्षा माणसे जगवली पाहिजेत आणि  अशोकाने पुढे आपला राज्यकारभार नव्या पद्धतीने सुरू केला. जगाला नवे मॅनेजमेन्ट दाखवले. अशोकाने बुद्धाच्या जन्म स्थळाला भेट दिली सारनाथ इथे भेट दिली व नंतर अशोकाने धम्म प्रसार करण्याचा निश्चय केला एक सुराज्य निर्माण केले गेले.
अशोक हा केवळ धम्म प्रसारक होता इतकेच आजवर लोकांसमोर अशोक घेऊन आले. इतिहासकार सम्राट अशोक याने आपल्या राज्यात रयतेच्या हितासाठी केलेलं कार्य आत्याधुनिक सुविधा निर्माण करून देणारा राजा म्हणून इतिहासात नोंद घ्यावी असा एकमेव सम्राट म्हणून अशोक याला  गणले जाते. जगातील पहिला सम्राट आहे ज्याच्या कालावधी मध्ये निसर्गाला ही दुष्काळ ग्रस्त स्थिती निर्माण करता आली नाही. एवढे सामर्थ्य असणारा राजा म्हणून आम्हाला अशोक कधीच सांगितलं नाही. आज दुष्काळ का पडतो यासाठी सम्राट अशोकाचे मॅनेजमेन्ट पाहावे लागेल. आम्ही म्हणतो पाणी नाही सुखा दुष्काळ पडतो पाऊस जास्त पडला ओला दुष्काळ पडतो. अशोकाच्या राज्यात निसर्गाचे ही मॅनेजमेन्ट करणारा जागतिक पहिला सम्राट आहे . याची आम्हाला माहितीच नाही अशोकाने पाऊस जास्त पडला तर कोणत्या ही भागातील पीक वाहून  जाऊ नये म्हणून शेतीचे मॅनेजमेन्ट केले आहे. शेतीची पिके अश्या  असणाऱ्या  भागात पावसाचे पाणी साठणार नाही किंवा पिके वाहून जाणार नाहीत यासाठी विशिष्ट पाण्याची नहर तयार केले  होत. शहरणाची रचना कशी असावी हे  त्यांचा आराखडा अशोकाने तयार करून घडवलेली शहरे आज आपण पाहू शकतो आज जी शहरे सुशोभित पाहायला मिळतात त्यांची रचनाकार का सम्राट अशोक आहे. आज भारतीय शहर रचनेला सौंदर्य दृष्टी नाही अनेक चिनी प्रवाशांनी अशोकाच्या साम्राज्याचे वर्णन केले आहे त्यात शहरांचे सुशोभीकरण व  त्यांची रचनाकृती मांडली आहे.
अशोकाने आपल्या जनतेला अद्यवत सर्व सोयी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत . घर तिथे पाण्याची सुविधा निर्माण करून देणारा  राजा म्हणून अशोकाला प्रथम स्थान दिले पाहिजे. आज आम्ही नळ योजना राबवतो अशोकाच्या राज्यात घराघरात  पाण्याचे  सोय उपलबध  केली होती. पाण्याचे मॅनेजमेन्ट करणारा राजा म्हणून ही सम्राट अशोकाला स्थान आहे. अशोकाने शेतीला उद्योग जगतात अनन्य महत्वाचे स्थान निर्माण करून दिले . म्हणून भारत हा शेतीप्रधान देश आहे असे आज आम्ही म्हणतो. अशोकाने शेतकऱ्यांच्या बाजारपेठा निर्माण केल्या शेतकऱ्यांना हमीभाव दिला. शेतकरी हाच शेतमालाचा व्यापारी होता. जगातील पहिला सम्राट आहे ज्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक बनवले.  आणि याचे  पुरावे पाहिजे असतील तर  भारतात लेणी कोरण्यासाठी व्यापारी लोकांसोबत शेतकरी लोकांची ही नावे आहेत.
शेतकऱ्याला अशोकाने जागतिक बाजारपेठेत नेऊन ठेवले.  आज आमचे शेतकरी नेते व जनता ही शेतकरी आत्महत्या करतो म्हणून रडत बसली आहे. त्यांनी सम्राट अशोक समजून घेणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी ही सम्राट अशोकाला समजून घेणे आवश्यक आहे.
आज आम्ही भारतीय राजमुद्रेत चारी बाजूने असणारे सिंह पाहतो. सम्राट अशोकाचा हा संदेश आहे की देशाच्या चाहुबाजूच्या सीमा सदैव जागृत असाव्यात. आम्ही मात्र समुद्री भागाकडे दुर्लक्ष केले  आणि आमचा यात च नुकसान झाले आहे.
अशोकाच्या राज्याच्या सत्यमेव जयते म्हणजे सत्याशिवाय राज्यात खोटेपणा कोणी केलेला चालत नव्हता. आणि अशोकाच्या राज्याचा हा नियम इतका कडक होता की राज्यात कधी इ चोरी झाली नाही खून झाले नाहीत बलात्कार झाले नाही याला शासन म्हणतात अशोकाने आदर्श घालून दिला आहे तो हा आहे. लोकांनी आजवर अशोकाला ही मर्यादित करण्याचे काम केले आहे. आज अशोकाला जागतिक लेव्हल ला प्रेझेंट केले पाहिजे. अशोकाने बौद्ध धम्माला राजश्रय दिला म्हणून इतर धर्माचा अनादर केला नाही.   कोणावर धम्माची जबरदस्ती ही केली नाही. जनतेने स्वखुशीने धम्म स्वीकारला अनेक भागातील  राजांनी साम्राटाचे मैत्रीचे संदेश स्वीकारले व त्याच्या  एका छत्राखाली काम करण्यास मान्यता दिली.
लोकांचा गैरसमज आहे की अशोकाने धम्म स्वीकारली आणि तलवार म्यान केली.  तर तसे नाही अशोकाने राज्याची सूत्र कोणाच्या च हाती दिलेली नाहीत. अशोक हा नेहमी तलवार सोबत घेऊन दिसतो करण राजशाही मध्ये ती राजाची महत्वाची निशाणी असते. अशोक हा आधुनिक लेखन कौशल्याचा प्रणेता आहे आज आपण लिपी वापरतो तिचा निर्माता हा अशोक आहे. अशोकाने तिचा वापर करून  आपले लेख कोरले  व भारताच्या इतिहासाला प्रकाशात आणले.
सम्राट अशोकाने जनतेच्या हितासाठी केलेली कामे थोडक्यात पाहू या  जनता रस्त्याने प्रवास  करते त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सामान्य जनतेकडून च घेतली आहे. कारण जनतेला त्याचे महत्व पटावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलीच पण वाटेत कोणत्या हि वाटसरूला पाण्यासाठी वणवण करावे लागू नये म्हणून नियोजित ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण   केले आहे.  प्रवाशी निवास तयार केलेत. अशोकाने  व्यापारी तसेच सामान्य जनता ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याला कोणी चार लुटारू निर्माण  होऊ च नये सामान्य माणसाला रोजगाराची संधी निर्माण करून  दिली. अशोकाच्या राज्यात बेरोजगारी नावाची समस्याच नव्हती. म्हणून सोन्याची असेल व कोणत्या हि पद्धतीची चोरी दरोडे अशोकाच्या राज्यात झालेले इतिहासात पाहायला मिळत नाही. याला मॅनेजमेंट म्हणतात एवढे बलाढ्य साम्राज्य असून एका हि ठिकाणी चोरी नाही दरोडा नाही इतकेच काय अशोकाच्या  चारी बाजुंच्या सीमेवर सैन्य तैनात आहेत. आज आपण मिलिटरी व पोलीस यंत्रणा पाहतो तर याचा प्रणेता अशोक आहे. अशोकाचे दोन दल आहेत एक सीमेवर  पहारा करणारे व एक दल अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी.  अशोकाचे सैन्य व्यवस्थपन हि पाहण्या जोगे आहे. ६ लाखाचे पायदळ आहे. हत्ती दल ,अश्वसेना अश्या प्रकारे सर्वच प्रकारची युद्ध यंत्रणा आहेच पण त्याच बरोबर अशोक जगातील पहिला राजा आहे ज्याने समुद्रावर हुकूमत  गाजवली आहे. परदेशात भारतीय वस्तूंचा व्यापार करणारा अशोक  भारताचा पहिला उद्योजक आहे. नुसते राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहणे देखील चुकीचे ठरते कि काय असे वाटू लागते. कारण अशोक भारतात असणाऱ्या सर्ववस्तूचे जगाच्या बाजारपेठत आपले  अस्तित्व सिद्ध करून दाखवतो आणि हे एक यशस्वी उद्योजक च करू शकतो ते अशोकाने या जगाला करून दाखवले आहे .  अशोकाने सामान्य जनतेसाठी सर्व सुखसोयी निर्माण करून दिल्या आहेत जगातील एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून सम्राट अशोक  यांच्याकडे पाहावे लागते. आज भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली कारण मुख्य पायाच ढासळला म्हणून शेतीच्या व्यवसायावर जगात आर्थिक महासत्ता होता येते हे अशोकाने जगाला दाखवून दिले आहे.  अशोकाने आपल्या राज्यात प्राण्यांची शिकार बंद केली.  त्यावेळी राजे महाराजे आपल्या छंद जोपासण्यासाठी वन्य जीवांची शिकार करायचे. अशोकाने त्यावर बंदी घातली त्याचा फायदा असा झाला कि वन्य प्राणी वाढले जंगले वाढली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला  जाऊ लागला. जेव्हा समतोल असतो तेव्हा निसर्ग हि कधी  उत्पाद माजवत नाही तो शांत च असतो. अशोकाच्या राज्यात झाडांची लागवड करणे जनतेला सक्ती चे होते. शिवाय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून राज व्यवस्थे कडूनच च शेतमालाला  हमीभाव दिला  जायचा. त्यामुळे शेतकरी अधिकाधिक शेती पिकवू लागला होता आणि बघता बघता शेतकरी सधन झाला. हि अशोकाची रणनीती आज शासन स्वीकारेल तर भारताचा शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही. या देशातील जनतेला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू ह्या बहुतांश शेती विषयकच आहेत. शेतकऱ्याला अधिकाधिक धान्य  पिकवून सरकार ने शेतकर्या कडून खरेदी केले व तेच धान्य परत जनतेमध्ये रास्त दरामध्ये दिल्यास शेतकरी सधन होऊ शकतात हे सम्राट अशोकाने इसवी सनापूर्वी करून दाखवले आहे. आज त्याचे इम्प्लिमेंट होणे आवश्यक आहे . सरकार कसे असावे यासाठी सम्राट अशोक अवश्य समजून घेणे आवश्यक आहे. शेतकरी व व्यापारी यांना  कर प्रणाली मध्ये काही कर म्हणजे टॅक्स लावले होते. ते सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच होते. आणि कोणाला ते देण्यास कधी कमी पडत नव्हती कारण त्यांच्या शेतमालाला डायरेक्ट अशोकाचा  शासन यंत्रणेतूनच हमीभाव मिळत होता. त्यामुळे कराच्या रूपात  राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात येत असे. शिवाय अशोक केवळ याच एका उत्पन्नावर राज्य चालवत नसे तर शेतकर्या कडून  घेतलेला शेतीचा माल  दुसऱ्या राज्यात व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जाई. त्यामुळे  शासनाच्या तिजोरीत उत्पन्न वाढलेलं असे. अशोकाने शेतकऱ्यांकडून मिळालेला महसूल असेल किंवा व्यापाऱ्यांकडून मिळालेला महसूल हा लगेच वापरात आणला नाही त्याची साठवण  केली आहे. अर्थात आज आपण शेयर मार्केट वापरतो अशोकाने ते त्याकाळी वापरले आहे.   व्यापारासाठी आलेल्या वस्तूंचे जास्त किंमतीत  विक्री करणे व कमी  किमतीत वस्तू खरेदी करणे हे अशोकाचे वापरलेले दोन हजार वर्षापूर्वीचे तंत्र आहे. आज आम्ही शेयर बाजारात वापरतो  यापेक्षा नुकसान भरपाई शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यापाराला नुकसान झाले असेल तर शासन व्यवस्थेतून त्याला नुकसान भरपाई दिली जायची. आज आम्ही त्यालाच विमा म्हणतो.  अशोकाने दोन हजार वर्षांपूर्वी ह्या साऱ्या सोयी आपल्या जनतेसाठी अमलात आणल्या आहेत. लोकांना त्यांच्या जीवनाची हमी देणारा जगातला पहिला सम्राट अशोक आहे. आज आम्ही  जीवनविमा काढतो पण     पण तो हि वेळेवर मिळत नाही अशोकाच्या राज्यात जनतेच्या जीवनाची हि काळजी  घेतली जात होती. सम्राट अशोकाचे राज्य परिपूर्ण यासाठीच आहे कारण त्याने निर्माण केलेलं प्रशासन जे आजच्या घडीला आपल्या भारतात नाही. आजच्या युगात सम्राट अशोकाच्या राज्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणूनच बाबासाहेब यांनी घटनेत दिलेले अधिकार आज आम्हाला समजणे महत्वाचे आहे. सम्राट अशोक आपल्या जनतेला  त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कधी हि तत्पर असायचा. त्याच्या राजमहालाबाहेर असणाऱ्या घंटेचा नाद होताच अशोक बाहेर येत असे आपल्या जनतेची तक्रार ऐकत असे व काही क्षणात त्यावर निर्णय घेऊन त्या व्यक्तीची तक्रार निवारण करत असे. आणि महत्वाचे अशोकाकडे कधी अशी तक्रार आल्याची नोंदणी च नाही कि पाणी नाही  रस्ते नाहीत दिवाबत्ती ची सोया नाही अश्या मूलभूत   गोष्टी अशोकाने वेळीच पूर्ण केलेल्या असत त्यामुळे जनतेला कधी त्यासाठी राजाकडे तक्रार करावीच लागत नसे. अजून एक महत्वाचे गोष्ट आज आपण कंप्लेंट बॉक्स ची यंत्रणा पाहतो म्हणजे सरकार मध्ये तक्रार विभाग असतो अशोकाच्या राज्यात तो थेट अशोकाच्या नेतृत्वाखाली होती अखिल भारताच्या राज्याचे तक्रार निवारण अशोक स्वतः करीत असे . विचार करा काय नियोजन असेल त्याचे  यालाच मॅनेजमेंट म्हणतात. सम्राट अशोकाला आम्ही  बरेच संकुचित करून ठेवले आहे. खऱ्या अर्थाने अशोकाचा राज्यकारभार जगासमोर आला पाहिजे. पण बऱ्याच लोकांनी त्यावर प्रकाश टाकला नाही असे खेदाने म्हणावे लागते आहे. अशोकाने शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली आहे. तक्षशिला विद्यापीठाला विश्वविद्या पीठचा दर्जा प्राप्त करून दिला. तो याच काळात असे अनेक छोटी  मोठी विद्यालये निर्माण केली गेली होती. पण पुढे आलेल्या लोकांनी त्या विद्यापीठांची पुनरावृत्ती केली नाही. संन्याश आश्रम सारखे विद्यापीठे चालू केली व शिक्षणाचा पाया या लोकांनी ढासळून टाकला. 
सम्राट अशोकाचे धम्म बाबत चे कार्य पाहू या. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी जगात आपले धम्म दूत पाठवले. सोबत प्रत्येक राजाला आपला मैत्रीचा संदेश पाठवला. व ज्या ज्या राजांनी अशोकाचा संदेश वाचला ते ते लोक  बौद्ध धम्माकडे वळले जगात बुद्ध धम्म पहिला विश्वधर्म म्हणून गणला गेला. सम्राट अशोकाने बुद्धांच्या अस्थी एकत्र करून त्यावर ८४ हजार स्तूप बांधले. जगातला  असा सम्राट आहे ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये ८४ हजार स्तूपांची निर्मिती ती हि अवघ्या ४० वर्षाच्या कालखंडात बांधून घेतले काही स्तूपांची डागडुजी हि  केली आहे.  याचा एक महत्वाचा भाग म्हणजे अशोकाने बांधकाम करवून घेतलेलं स्तूप हजारो वर्षांनंतर हि बऱ्या पैकी आज उभे आहेत. हे त्याच्या  बांधकाम कौशल्यांचे प्रतीक आ.हे परदेशी शासकांनी जर का नासधूस केली नसती  तर आज जगाला भारताचा तो ऐतिहासिक ठेवा पाहता आला असता. तरी देखील आज आपण पाहतोच आहे. अशोकाकडून अनेक राजांनी प्रेरणा घेऊन नंतर लेण्यांची निर्मिती होऊ लागली आहे .   महाराष्ट्र तर अशोकाची प्रांतिक राजधानी होती. व सातवाहन राजे अशोकाचे मांडलिक  राजे होते. त्यामुळे महाराष्ट्र बौद्धमय होता आणि त्याचाच प्रभाव हा कायम प्रत्येक राजवटीवर आपणास पाहायला मिळतो. प्रत्येक राजाने  नेहमीच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काम केला आहे. अगदी वैदिक राजांच्या काळात देखील लेण्यांचे काम थांबले नाही. कारण जनता बौद्ध धम्मीय होती आणि  त्यांनी आपल्या दानातून लेणी उभारली. हा अशोकाचा सर्वात मोठा विजय आहे. भले अशोकाच्या काळात महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती नसली तरी  पुढे निर्माण झालेल्या लेण्या ह्या अशोकाच्या बौद्ध धम्माच्या प्रसारामुळेच  तयार झाल्या आहेत. अशोकाने जगाला  सर्वात अमूल्य ठेवा देऊन गेला आहे .
जगाला बुद्ध देऊन अशोकाने अलौकिक क्रांती केली आहे. 
सुज्ञ वाचकांनो सम्राट अशोकाचे कार्य पाहता शेतकऱ्यांचा राजा सामान्य जनतेचा राजा हा अशोक च पाहायला मिळतो. जे बळीला मोठे करून अशोकाला छोटे करण्याचा प्रयत्न केला गेलाय तो याच पद्धतीने. कारण लोंकाना अशोक सांगायचं नव्हता त्यामुळे त्यांनी अशोक  लपवण्यासाठी बळीला आणले. समाजामध्ये लोकांमध्ये चिकित्सा करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज निर्माण होतो. पुराणातील कथा व भौगोलिक भारताचा इतिहास हा तपासून सत्य स्वीकारायला हवे. सम्राट अशोकाचे विशाल साम्राज्य त्याची राज्यकारभाराची पद्धत त्याचे अधिकारी वर्ग याचा इतिहास लपवण्यासाठी ब्राह्मण साहित्यिकांनी बळीला पुराणातून वरती काढलेलं आहे. कारण बळीबाबत इसवी सणाच्या आधी कोणत्याच कालखंडात संदर्भ येत नाही. बळीबाबत  जर जनतेमध्ये इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो हि भूमिका असती तर ती इसवी सनापूर्वी का सापडत नाही. जर इसवी सनापूर्वी नाही म्हणजे ती इसवी  सना नंतर ची असावी आणि इसवी सनानंतर झालेल्या प्रत्येक राजाची माहिती इतिहासात आहे. मग बळीची का नाही याचा सरळ उत्तर आहे बळी होऊन गेलेला नाही. हा बळी म्हणजे दुसरातिसरा कोणी नाही तो सम्राट अशोकाच्या विरोधात निर्माण केलेला काल्पनिक पात्र आहे . 
एवढे विस्तारित सांगायचे प्रमुख कारण बळीला बाजूला ठेवून सम्राट अशोक सांगणे आवश्यक आहे म्हणून सर्वानी सम्राट अशोक सांगावा त्याच्या कारभाराचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावो तेव्हा लोक म्हणतील इडा पीडा जातो आणि सम्राट अशोकाचे राज्य येवो.

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply