
ABCPR आणि एकजूट लेणी संवर्धक टीम नाणेघाट येथील धम्म सहलीला एकत्र येत लेणी संवर्धन चळवळीला गतिमान करण्यासाठी प्रयत्न करता आहोत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता सैनिक दलाचे लेणी संवर्धक युनिट हे भारताच्या बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक वारसा असलेली बौद्ध स्मारकांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काम करत आहे.
ABCPR लेणी संवर्धक टीम ने एकजूट लेणी संवर्धक टीम यांना देखील समता सैनिक दलामध्ये सामील होवून आपला धम्म वारसा जपण्यासाठी एकत्रित काम करावे म्हणून आवाहन करण्यात आले.
नाणेघाट धम्म सहल ABCPR आणि एकजूट लेणी संवर्धक यांनी एकत्रित येवून यशस्वी केली.
रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी ABCPR लेणी संवर्धक टीम ने नाणेघाट या ठिकाणी धम्म सहलीचे आयोजन केले होते. ABCPR लेणी संवर्धक युनिट मुंबई आणि पुणे या दोन्ही विभागातील समता सैनिक दलाचे सैनिक आणि ABCPR लेणी संवर्धक टीम चे लेणी संवर्धक या नाणेघाट येथील धम्म सहलीला उपस्थित होते. एकजूट लेणी अभ्यास प्रसारक आणि लेणी संवर्धक टीम देखील या नाणेघाट येथील धम्म सहलीला उपस्थित होते. प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन टीम (ABCPR Team) च्या माध्यमातून आज नाणेघाट बौद्ध लेणी या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये अनेक लेणी संवर्धक आणि लेणी अभ्यासक उपस्थित होते. समता सैनिक दल लेणी संवर्धक युनिट चे प्रमुख व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय चे अधिकृत गाईड रविंद्र सावंत यांनी नाणेघाट बौद्ध लेणी विषयी मार्गदर्शन केले. व त्या मध्ये अनेक महत्वाचे विषय देखील मांडण्यात आले.त्याच बरोबर टीमचे संपर्क प्रमुख प्रशांत माळी सर यांनी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या संघटनेची ओळख करून दिली आणि सर्व तरुणांना आव्हान केले की १८ वर्षावरील सर्व तरुण व तरुणी भारतीय बौद्ध महासभेचा सदस्य आणि समता सैनिक दाल या मध्ये सैनिक असलाच पाहीजे जे ने करून बंधू भगिनी आपल्याला योग्य उपासक आणि उपसिका या समाज्या मध्ये घडवता येतील. या लेणी संवर्धन चळवळीच्या माध्यमातून लेणी संवर्धनातून आपल्याला धम्मसंवर्धन योग्य रित्या करता येईल असे रवींद्र सर यांनी सांगितले. एकजूट लेणी संवर्धन टीमचे चे प्रमुख डोळस सर यांनी देखील योग्य रित्या मार्गदर्शन केले आणि लेणी संवर्धन कार्यात ABCPR लेणी संवर्धक युनिट सोबत लेणी संवर्धन कार्यात कायम आहोत असे त्यांनी आश्वासन दिले. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपसिका यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि पुढे देखील लेणी संवर्धन चळवळी साठी धम्मदान अथवा श्रमदान करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे सांगण्यात आले.
ABCPR लेणी संवर्धक टीम नेहमी प्रमाणे प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणी वेगळ्या नजरेतून हा ऐतिहासक वारसा पाहत असते. लेणी च्या खालच्या बाजुस असलेल्या प्रथम पाणीच्या टाक्यावर असलेला हा शिलालेख अनेक अभ्यासकांच्या नजरेतून सुटलेला आपणास पाहायला मिळतो. ABCPR लेणी संवर्धक टीम ने या शिलालेखाचे संशोधन करण्यात यश मिळवले असून या शिलालेखाचे वाचन आणि संपूर्ण माहिती DHAMMASIRI INSTITUTE च्या रिसर्च पेपर मध्ये लवकर च वाचायला मिळेल.
प्रत्येक ठिकाणी नवीन संशोधन होवू शकते जर आपण त्या ठिकाणी आपली संशोधक नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला तर शक्य आहे हे आपणास ABCPR लेणी संवर्धक टीम च्या सदस्यांकडे पाहून कळते.

नाणेघाट येथील धम्म सहलीला आलेल्या सर्व धम्म बांधव आणि धम्म भगिनींचे ABCPR लेणी संवर्धक युनिट च्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत आणि असेच ह्या धम्म कार्याला सहकार्य करावे.





