• Post author:

घारापुरी बौध्दस्तूप बुध्द लेणी

ABCPR TEAM आणि समता सैनिक दल च्या माध्यमातुन घारापुरी स्थीत गाव येथे ऐलिफंटा बुध्दस्तुप आणि  बुध्दलेणी आहेत. घारापुरी लेणी वर जाण्याचा मार्ग म्हणजे गेटवे इंडीया मुंबई ते ऐलिफंटा घारापुरी बोटनी तासभराच जलमार्ग प्रवास आहे. धम्म वारसा पाहण्यास व जतन करण्यास नक्कीच भेट द्या. काल दि. २० फेब्रु, २०२२ रोजी. Abcpr team, SSD समता सैनिक दल टीम आणि  अनेक बौध्द बांधव, बहीणी, तसेच महत्वाची लक्षकेंद्रित करावी असी बाब म्हणजे आवडीणी ने आपला प्राचीनकाळीन, राजा सम्राट अशोक यांने कलिंग युध्द विजयानंतर राजाने बुध्दधम्म आचरणात घेऊन बुध्द धम्माचा बुध्दस्तूप बुध्दलेणी, वास्तूकला, शिल्पकला, व धम्म लिपी मधुन लिहून प्रसार प्रचार यांच्या कार्यकार्दीत करुन ठेवला आहे. आपला बुध्द धम्म वारसा बघण्यातून आपल्या आचणात घेऊन भावी पीढीला जतन करण्यात उपयुक्त ठरेल म्हणून एकुण १००च्या वरती धम्म बांधव, बहीणी, व वर्ष ५० वयाच्या माता आजोबा असे या संशोधन आणि संवर्धन मधी जुडले होते. त्यांचे सर्वांचे मनापासून मंगलमैत्रीपुर्ण

अभिनंदन
 

. आम्ही सर्व सकाळी ९. वा. गेटवे येथून घारापुरी ऐलिफंटा पोहचास सज्ज झालो, पुढे सकाळी १० वा. बोटीने प्रवास रवाना. ११.३० वा. घारापुरी ला पोहचलो, तिथे पोहचल्यानंतर धम्मबांधव बहीणी, माता आजोबांची संख्या १००+ असल्याने घारापुरी स्तूपावर जाण्यास जमाव करुन शीस्तबध्द दोन लाईन करुन जो धम्माचा वारसा म्हटले जातो ऐलिफंटा विरुध्द दिशेला पलिकडील डोंगर भागात बुध्दस्तूप हा दुर्लक्षित आहे, व तो पुर्ण भग्न स्थित आहे, हा विशाल असा बौध्दस्तूप आहे, परंतु हा बुध्दस्तूप जंगल डोंगर भागात असल्याने मनुवाद्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात व काही नैसर्गिक मार्गाने या स्तूपाचा लोप झाला आहे. या स्तूपावर आम्ही सर्व ऐलिफंटा लेणी पायरी मार्गाने न जाता, त्या भग्न अवस्थेत असलेल्या डोगराल चढउतार मागच्या पायी मार्गाने वरती चढलो, त्यात कौतुकस्पद सांगण्याची बाब अशी की सगले युवा तरुण पीढी होती ती आपल्या ध्येयानी डोंगर चढला परंतु जे आमच्यात पन्नाशी साठ वयाची वयस्कर माता, आजोबा होते त्यांनी ही पवित्र धम्म वारसा संशोधन करण्यास आपला दिवस वेळ अाणि शारीरीक बळ क्षमता पणाला लावली, या मातांचे खरोखरच कालचा दिवसाचा त्याग वंदनीय आहे. असो या स्तूपावर संशोधन करताना भग्न अवस्थेत झालेल्या स्तूपाच्या वीटा, पायर्या, स्तंभ, पाण्याचे टाके, आणि शेवट ला डोंगरातील कोरलेली विहार करण्याची लेणी आहे, तिथेच आम्ही बुध्द वंदना घेतील. खूप छान आणि समाधान वाटले. तसेच ABCPR आणि SSD चे सैनिक धम्मबांधव. आयु. रविंद्र सावंत, मुकेश जाधव, आणि प्रशांत माळी सर, आदी नी बुध्द धम्म इतिहासाची माहीती दिली. असच ABCPR TEAM/ SSD, च्या माध्यमातुन प्रेरणा मीळणारी कार्य घडले असेच पुढे ही आपला धम्म वारसा जतन करण्याचे कार्य चालू राहील. अशी अपेक्षा करतो, आणि जेवढ्या या महाराष्ट्रात धम्म चळवळीच्या संघटना असतील यांच्याकडुन भावी पीढीला प्रेरक जागृकता करण्याचे कार्य करुन येणारी पीढी ही धम्माचा वारसा जतन करण्यासाठी सज्ज होतील. काल दिवस भरात बुध्दस्तूपाच संशोधन करण्याच्या मार्गाने भग्न अवस्थेत सापडेली अवशेष त्यांचे आपल्या समोर फोटो दर्शवितो.

चला बौध्दधम्माचा वारसा जतन करु या!
जयभीम

Leave a Reply