• Post author:

दुर्लक्षित बुद्ध स्तुपावर प्रथम शेकडोच्या संख्येने लोकांनी मानवंदना दिली.. 

प्राचीन बुद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन अर्थात ABCPR लेणी संवर्धक टीम आणि समता सैनिक दल यांच्या माध्यमातून घारापुरी बुद्ध स्तुपावर धम्म अज्झायन चारिका आयोजित करण्यात आली होती. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, पनवेल, पालघर नवी मुंबई, अश्या विविध ठिकाणाहून अनेक धम्म उपासक या कार्यक्रमात सामील झाले होते. रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडे आठ वाजता सर्वजण मुंबई गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी जमा झाले. यावेळी लेणी संवर्धक टीम चे सदस्य व समता सैनिक दलाचे सैनिक मुकेश जाधव , प्रशांत ,माळी, विनय जाधव, संदिप पाटील,  सुनील बेटकर , राज रामटेके, सुरेश टोणगे, शामराव सोमकुवर , वैभव सोमकुवर , सुरेश महाडिक , विलास मोहिते, प्रवीण पाटील, अक्षता जाधव, अक्षता सावंत, विशाखा सोमकुवर, संदिप मोहिते, खंडू वासरे , अमर ननावरे, आनंद वाघमारे, निलेश पाटील, अश्या अनेक  टीम सदस्यांनी  धम्म अज्झायन चारीकेची तयारी केली. आलेल्या उपासकांची नोंदणी करण्याचे काम सुनील बेटकर , मुकेश जाधव , प्रशांत माळी  आणि सुरेश टोणगे सर यांनी केले. आलेल्या उपासकांना लाईन मध्ये घारापुरी बेटाकडे घेवून जाण्यासाठी समता सैनिक दलाच्या सैनिकांच्या सुरक्षेखाली बोटीने घारापुरी बेटाकडे नेण्यात आले. बेटावर  गेल्यावर बुद्ध स्तुपाकडे जाण्यासाठी  मार्गक्रम करण्यात आले. 

बुद्ध स्तूपाच्या पायथ्याला असलेल्या एका  बुद्ध स्तुपाबद्द्ल माहिती देण्यात आली. आलेल्या उपासकांना सध्या बुद्ध स्तुपाचे अवशेष काय आहेत  हे दाखवण्यात आले. अवशेष पाहून अनेकांनी त्याबद्दल दुखद प्रतिक्रिया दिल्या , कि आपल्या ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणी कोणत्या अवस्थेत आहेत याबद्दल. येथून पुढचा प्रवास दुसऱ्या व मुख्य स्तुपाकडे जाण्यासाठी होता. प्रसंगी सोबत आलेल्या जेष्ठ वर्गातील पुरुष आणि महिला उपासकांचे कौतुक करावे तितके कमी आहे. कारण या स्तुपाकडे कोणी हि जात नसल्याने ह्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. अश्या ठिकाणी अगदी 60 वर्षे पूर्ण केलेले ७० वर्ष्गे पूर्ण केलेले बौद्ध उपासक ज्या भावनाने त्या स्तुपाकडे जात होते , टी भावना शब्दात मोजता येत नाही. स्तुपाचा डोंगर चढताना झालेला त्रास  न दाखवता  आलेल्या प्रत्येक जेष्ठ व्यक्तीने या स्तुपाकडे जाण्यासाठी प्रयत्न क्जेले आणि सर्वजण त्या  स्तुपावर जाण्यासाठी निघाले. अर्ध्या डोंगरावर गेल्यावर समजले कि, पुढे रस्ता सापडणे कठीण आहे. अश्यावेळी लेणी संवर्धक टीम चे  जेष्ठ आणि वरिष्ठ लेणी संवर्धक आयु,  विनय जाधव सर आणि संदिप पाटील सर यांनी समता सैनिक सैनिक आयु विलास मोहिते यांना सोबत घेवून रस्त्याचा शोध घेवून आलेल्या उपासकांना योग्य  ठिकाणी नेण्यासाठी मार्ग शोधला. रस्त्याचा शोध घेत असताना आलेल्या उपासकांना लेणी संवर्धक माळी सर यांनी लेणी संवर्धन चळवळ कधी पासून सुरु झाली आणि कशी कशी वाढली हे सांगितले विशेष म्हणजे जुन्या लेणी संवर्धक लोकांचे पुन्हा लेणी संवर्धन टीम मध्ये सामील झालेले शैलेश पवार व इतर साथीदार हि यावेळी घारापुरी बुद्ध स्तुपावर हजर होते. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आला. आलेल्या उपासकांना व लेणी संवर्धकाना लेणी ची चळवळ  प्रशांत माळी सर यांनी सांगितली, तो पर्यंत आधी जेवण झालेले होते. अनेक उपासकांनी जेवण स्वतःचे स्वतः आणले होते. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात आणि बुद्ध स्तूपाच्या आवारात भोजन झाले होते. प्रशांत माळी सरांच्या नंतर  जेष्ठ लेणी संवर्धक आयु सोमकुवर सर यांनी स्तुपाबद्द्ल माहिती सांगितली. त्यानंतर सर्वजण मुख्य स्तुपाकडे निघाले. अतिशय दुर्गम पायवाट होती, अश्या अवस्थेत सर्वजण जंगलातील काटेरी झाडे झुडपे बाजूला करत विशेष म्हणजे आलेल्या कोणत्या हि उपासकाने निसर्गाला हानी होईल असे कोणते हि कृत्य केले नाही, हि  शिस्त आणि नियम सर्वांनी अगदी तंतोतंत पाळला. 

मुख्य स्तुपावर आल्यावर खऱ्या अर्थाने सर्वांनाच समोर स्तुपाची अवस्था पाहुण वाईट  वाटले पण पर्याय नव्हता. मातीच्या विटांचा भव्य स्तूप आणि चारी दिशेला दिसणारा समुद्र हा शांती देणारा ठरतो. निसर्गाची किमया खूप निराळी असते. या निर्जन बेटावर या स्तुपाला झाडा झुडपांनी संरक्षण दिले आहे. स्तुपाचा प्रदक्षिणा पथ आणि स्तुपाची रचना यावर मार्गदर्शन करण्यासाठी समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर आणि लेणी संवर्धक आयु, रविंद्र मिनाक्षी मनोहर यांनी आलेल्या उपासकांना माहिती  पुरवली घारापुरी हे बेट किती महत्वाचे आहे याबद्दल माहिती देण्यात आली. बुद्ध स्तुपाची निर्मिती कधी झाली असेल  त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या  स्तुपाकडे जाण्यासाठी प्रत्येक उपासकांनी घेतलेली मेहनत येणाऱ्या काळात या स्तूपाचे गतवैभव प्राप्त करून देण्यास महत्वाचे ठरणार आहेत एवढे नक्की. दिवसभर संपूर्ण डोंगरात बुद्ध स्तुपासाठी फिरणाऱ्या  उपासकांमुळे इतिहासात प्रथम इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी या बुद्ध स्तुपावर भेट दिली आहे. आजवर अश्या दुर्गम ठिकाणी कोणी येण्याचे धाडस करत नाही पण ABCPR टीम णे आयोजित केलेल्या या चारीके मध्ये समता सैनिक दलाचे संरक्षण होते.  प्रथम च इथे इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी येवून हा धम्म वारसा पाहिला. जिथे पाहण्यासाठी काहीच नाही शिल्प , शिलालेख स्तंभ मूर्ती सुंदर कलाकृती असे काहीच नसताना अनेकांनी  बुद्ध स्तूप पाहून दुर्लक्षित स्मारकाबाबत खंत व्यक्त केली. हा दिवस इतिहास नक्कीच आपले नाव नोंदवून जाईल कि, तथागतांच्या बुद्ध स्तूप जो  शेकडो वर्षे दुर्लक्षित होवून  पडला आहे, अश्या बुद्ध स्तुपावर शेकडोच्या संख्येने येवून त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व उपासकांचे या ऐतिहासिक घटनेमध्ये  नाव नोंदवले जाईल. समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर आयु रविंद्र सावंत सरांनी  आलेल्या तरुणांना समता सैनिक दलामध्ये  सामील होण्यासाठी आवाहन केले. व स्तूपाच्या जवळ असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे बौद्ध कालीन जलव्यवस्थापन सांगितले. त्यानंतर घारापुरी बुद्ध लेणी जी स्तूपाच्या बाजूला आहे. तिथे सर्वजण आल्यावर बुद्ध पुजेची तयारी करण्यात आली कारण बुद्ध स्तुपाजवळ बुद्ध पूजा करण्यासारखी जागा नसल्याने येणाऱ्या काळात ती जागा निर्माण करून घेण्याचा प्रयत्न टीम कडून केला जाणार आहे. म्हणून बुद्ध लेणी मध्ये येवून पूजा स्थान तयार करून सोबत आणलेली बुद्ध मूर्ती चे पूजन करण्यासाठी तयारी करण्यात आली. बुद्ध  पूजेसाठी लाकडात निर्माण केलेल्या बुद्ध स्तुपाची प्रतिकृती आयु अनिल ननावरे यांनी सोबत घेवून आले होते. अतिशय सुंदर पद्धतीने लाकडात त्यांनी स्तूप तयार केला होता शिवाय त्यांनी लाकडात बुद्ध लेणी चे निर्माण केलेले आहे. बुद्ध लेणीत सर्वांनी सामुहिक वंदना घेतली. आणि मिसेस ननावरे आणि मिस्टर ननावरे यांनी हा स्तूप लेणी संवर्धक प्रशांत माळी सरांना भेट म्हणून दिला. तसेच आलेल्या सर्वांचा सामुहिक फोटो घेवून परतीच्या प्रवासाकडे निघालो. यामध्ये राकेश यादव नावाचे धम्म बंधू यांनी पुस्तके सोबत घेवून शिवाय काही धम्म विषयी वस्तू घेवून आले होते. संपूर्ण डोंगरावरून त्यांनी ते वस्तूंचे ओझे फिरवत घेवून आले हे खरेच कौतुकास्पद आहे. धम्माचे ज्याला वेड आहे ति माणसे काय करू शकतात हे पाहण्यासाठी  धम्म अध्ययन चारीकेला आलेल्या सर्वाकडून पाहायला मिळाले. 
शेवटी निघताना बोटीने प्रवास असल्याने सर्वजण प्रवासाला निघाले. संध्याकाळ ची वेळ सर्वाना दिवसभर  फिरल्याने थकवा जरुर आला होता पण धम्म कार्यासाठी एक दिवसाचे दान दिल्याचे समाधान निश्चित होते. 
शेवटी सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले रात्र होता आली होती सर्वजण निघाल्यावर टीम चे सदस्य शेवटी निघाले. या महत्वाच्या कार्यात सामील झालेल्या त्या सर्व लहान मुलांपासून अगदी जेष्ठ लोकांपर्यंत सर्वांचे कौतुक करण्यासारखे होते. लहान मुलांनी देखील ण थकता या दिवशी संपूर्ण डोंगरावर फिरून हा धम्म वारसा पाहिला. 
या धम्म अध्ययन चारीकेसाठी समता सैनिक दलाचे संरक्षण  मिळाले.  समता सैनिक दलाचे राष्ट्रिय अध्यक्ष आणि कमांडर इन चीफ आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने लेणी संवर्धक टीम कार्यरत आहे. 

या संपूर्ण कार्यक्रमाला मिडिया कव्हरेज देण्यासाठी आम्ही भारतीय न्यूज  च्या  पत्रकार संघमित्रा बरसागडे  उपस्थित होत्या. त्यांनी संपूर्ण प्रवासाचे चित्रण केले असून आम्ही भारतीय न्यूज या channel वर त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे.
धम्म अज्झायण चारिका घारापुरी बुद्ध स्तुपावर आलेल्या सर्वांचे विशेष आभार. घाटकोपर वरून जुने सहकारी लेणी संवर्धक आयु. शैलेश पवार  यांनी घेवून आलेल्या सर्व उपासकांचे देखील आभार, समता सैनिक दलाचे सैनिक आणि लेणी संवर्धक टीम चे पुणे टीम चे प्रमुख  अमर ननावरे  आनंद वाघमारे निलेश पाटील तुफान कांबळे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व उपासक आणि टीम मेम्बर  यांचे देखील आभार. लेणी संवर्धनासाठी सहकार्य करणारे मिलिन मून आणि त्यांचा परिवार यांचे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य केले  त्यांचे देखील आभार. 

ABCPR लेणी संवर्धक टीम च्या सर्व संवर्धक आणि समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांचे आभार . ह्या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व टीम चे आणि आलेल्या उपासकांचे आभार. 

ABCPR लेणी संवर्धक टीम, समता सैनिक दल 
एक पाऊल धाडसाचे बौद्ध वारसा जपण्याचे.

Leave a Reply