22 प्रतिज्ञा मध्ये बुद्धांनी दिलेल्या चार आर्य सत्याची मांडणी

जयभीम नमो बुद्धाय १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब यांनी आपल्याला विषमतेच्या खाईतून काढून समतेच्या महासागरात आणून सोडले. विशाल महासागराचे पात्र खूप च अवाढव्य आहे. अश्या विशाल बौद्ध महासागरात बुद्ध धम्म आणि संघ रुपी त्रिरत्न आपल्याला लाभली. विषमता वादी खाई तून बाहेर काढताना बाबासाहेब यांनी २२ प्रतीज्ञांचे एक महत्वाचे असे आर्य सत्य सांगितले या २२ प्रतिज्ञा हि चार आर्य सत्यात बांधून देणारे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक दृष्टी ने आपले आज हित साधले आहे पण हे आर्य सत्य आम्हाला समजले नाही हे खेदपूर्वक सांगावे वाटते तथागत बुद्धांनी या विश्वाला दिलेले चार आर्य सत्य काय आहेत समजून घेवू प्रथम
बुद्धाने पहिले आर्यसत्य हे दुःख आहे असे सांगितले या जगांत दु:ख आहे हे सर्व मानवाने स्वीकारले पाहिजे असा कोणी व्यक्ती नाही कि असा कोणता जीव नाही ज्याला दुख नाही जन्मताच दुःख सोबत घेवून च आपण जन्म घेतो. व्याधी अर्थात आजारपण हे हि दुःखद असते म्हातारपण हि दुःखद असते आणि मरण हि दुखद च असते आयुष्यात अनेक दुखद प्रसंग येत असतात प्रिय व्यक्तीचे दूर जाणे दुखद असते तसेच अप्रिय व्यक्तीचे जवळ येणे हि दुखद असते प्रिय वस्तू हरवणे जितके दुखद असते तितकेच अप्रिय वस्तू भेटल्याचे हि दुःख असते. रूप अर्थात शरीर , विज्ञान , संज्ञा , वेदना आणि संस्कार हे पाच उपादान स्कंद दुःख देणारे आहेत. स्वतःचे संशोधन करण्यास बुद्ध सांगतात. अगदी त्याच प्रमाणे बाबासाहेब हि इथल्या शोषित लोकांच्या दुःख काय आहे सांगताना २२ प्रतिज्ञा मधील काही प्रतिज्ञा पाहू या
ABCPR
१) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.इथल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जनतेचे दुःख हे या तीन प्रतिज्ञात आहे हे बाबासाहेब यांना सांगायचे आहे. ब्रह्मा विष्णू महेश तसेच राम कृष्ण आणि गौरी गणपती ह्याना देव न मानण्याची वचन घेत आहेत बाबासाहेब थोडक्यात आपल्याशी केलेला करार आहे कि जे धर्मातर करत आहेत त्यांनी या तीन प्रतिज्ञांचा करार करायचा आहे कि पुन्हा कधी या देवी देवतांची पूजा करायची नाही आणि यांना देव हि मानायचे नाही हे तुमच्या जीवनातील खरे दुःख आहे. बाबासाहेब यांनी २२ प्रतिज्ञा मध्ये दिलेले पहिले आर्य सत्य समजण्या साठी पूर्वाश्रमीच्या धर्माची चिकित्सा करावी लागेल जी बाबासाहेब यांनी करून दिलेली आहे. रिडल्स इन हिंदुझम मध्ये बाबासाहेब यांनी या साऱ्या प्रश्नांची उत्तरे दिलेलि आहेत आणि त्यामुळे अस्पृश्य समजला जाणारा वर्ग या देवीदेवतांच्या उपासनेत अखंड बुडाला होता त्याला त्यातून बाहेर काढले तरच त्याची प्रगती आहे म्हणून हे दुख आहे हे पटवून देणाऱ्या या प्रतिज्ञा आहेत.
दुसरे आर्य सत्य हे दुःख समुदय आहे अर्थात दुःखाचे कारण आहे. य्मध्ये माणसाला दुःख का निर्माण होते. प्रत्येक जन लहान पणापासून एक गोष्ट ऐकत असतो कि नशिबात होते म्हणून आयुष्यात दुःख आहे मागच्या जन्माचे पाप आहे देवाचे देणे आहे अश्या विविध बाबी माणसाच्या डोक्यात रुजवल्या जातात आणि याच विचारांमुळे माणूस दुःख भोगत असतो पण जर विचार केलात तर हे कधीच विधिलिखित असे काही नसते पूर्वी च्या जन्माचा सबंध हि नसतो कारण तो जन्म कधीच नसतो दुःख हे कारणांमुळे निर्माण होते ज्या कारणामुळे दुःख निर्माण झाले ते कारण ओळखा कारण नसेल तर दुःख नसेल असे सांगणारे बुद्ध हे जगातील पहिले प्रवर्तक आहेत. बुद्धाने प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताद्वारे लोकांना कार्य कारण भाव समजावून सांगितला आहे. पुन्हा पुन्हा माणसामध्ये उत्पन्न होणारे लोभ विकार युक्त असलेले विविध विषयामध्ये रममाण होणारी तृष्णा हि या दुःखांचे मूळ कारण आहे. जसे लोभामुळे एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटणे द्वेषाने एखाद्या बद्दल क्रोध निर्माण होणे आणि या दोन्ही साठी व्यक्ती तडफडत असतो याच हव्यासाला तृष्णा म्हणतात. माणसाच्या मनातील द्वेष लोभ क्रोध मोह वासना या विकारांना तृष्णा म्हटली जाते जे दुखाचे कारण आहे . तृष्णा नसेल तर दुःख नाही. हि तृष्णा हि तीन प्रकारची असते काम तृष्णा भव तृष्णा आणि विभवतृष्णा यामध्ये काम तृष्णा हि सुख कारक गोष्टींच्या उपभोग घेण्यासाठी निर्माण झालेली लालसा आहे काम तृष्णा व्यक्ती गत सुखासाठी फायद्यासाठी व्यक्ती व्यक्ती मध्ये भांडणे लावते तसेच त्या व्यक्तीची सुखाची पूर्तता कधीच होत नसते. ज्याप्रमाणे अग्नीला वारा भेटला आणि सोबत जळण्याचे इंधन भेटले तर अग्नी जलद होतो प्रखर होतो तसेच काम तृष्णेचे आहे एक सुख पूर्ण करण्यासाठी अनेक दुःख निर्माण करण्याचे काम करत असतो. भव तृष्णा भव म्हणजे जन्म हे साधे गणित आहे हि तृष्णा प्रत्येक माणसाच्या मनात असते म्हणून बुद्धाने त्याचे वर्गीकरण केले आहे प्रत्येक माणसाच्या मनात पुढील नव्या जन्माचा लोभ मोह असतो आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी असणे म्हणजेच भवतृष्णा होय आणि याच लालसे पोटी त्याच्या जीवनात दुःख निर्माण होत असते शंभर वर्षे आयुष्य जगून हि व्यक्ती असंतुष्ट असतो मरणाला माणूस भीत असतो हि त्याची लालसा आहे जास्त जीवन जगण्याची आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण आहे. म्हणून कि काय बाबासाहेब हि म्हणतात कि शंभर दिवस शेली होवून जगण्यापेक्षा एक दिवसा वाघासारखे जगा हा बाबासाहेबांचा संदेश आज हि अंगात चेतना जागृत करतो.विभव तृष्णा याला आपण असे म्हणू शकतो कि उद्या आपण मरणार च आहोत तर खा प्या आणि मजा करा या मध्ये व्यक्ती ला कोणते हि नैतिक बंधन नसते आणि यामध्ये ते स्वतःवर दुख ओढवून घेत असतात. बाबासाहेब यांनि दिलेल्या २२ प्रतिज्ञा मधील पहिल्या तीन प्रतिज्ञा ह्या दुख आहेत हे सांगताना नंतर च्या प्रतिज्ञा मध्ये त्याचे कारण काय आहे हे सांगितले आहे. पहा प्रतिज्ञा ४)देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५)गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
६)मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
८)मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.या मध्ये बाबासाहेब अगदी स्पष्ट म्हणतात देवाने अवतार घेतला यावर आम्ही विश्वाश ठेवणे म्हणजेच पहिल्या तीन प्रतिज्ञा हे दुख आहे श्राद्ध पक्ष करणे पिंडदान करणे हे दुःखाचे कारण आहे तसेच ब्राह्मणांच्या हातून क्रिया कार्यं करून घेणे हे देखील वरील दुखांचे कारण आहे. पहिल्या तीन प्रतिज्ञा हे अस्पृश्य वर्गाचे दुख आहे तर पुढील चार प्रतिज्ञा ह्या त्या दुःखाचे कारण आहे . बाबासाहेबांनी दिलेला हा महान सत्य आपण समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे म्हणून बाबासाहेब यांच्या या बावीस प्रतिज्ञा म्हणजे नुसते पाठ करून बोलण्याच्या नाहीत तर कृतीत दिसायला हव्यात.
तिसरे आर्य सत्य दुःख निरोध आहे. म्हणजे काय तर निर्वाण म्हणजे तृष्णे पासून मुक्ती तृष्णा नष्ट करणे यामध्ये व्यक्तीला कोणता हि लोभ राहत नाही मोह द्वेष राहत नाही प्रत्येक गोष्टीचे अनित्य बोध अनित्य रुप समजून येते. गोष्टीचे अनित्य स्वरूप न समजल्यामुळे व्यक्ती ला लोभ मोह द्वेष क्रोध निर्माण होवून स्वतःवर दुख ओढवून घेतो म्हणून दुख निरोध काय आहे हे सांगताना बाबासाहेब यांनी सातवी प्रतिज्ञा दिली आहे
७)मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
स्पष्ट शब्दात बाबासाहेब सांगतात कि वरील दुख आणि दुखाची कारणे यांचा निरोध करायचा आहे तर बौद्ध धम्माच्या विसंगत कोणते हि आचरण करू नका एवढ्या स्पष्ट शब्दात आजवर बुद्धांच्या नंतर कुणी हि सांगितलेले नाही म्हणून बाबासाहेब यांना आधुनिक बुद्ध म्हणून मी पाहतो.
पुढील आर्यसत्य हे दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे काय दुख नष्ट करण्याचा मार्ग यासाठी बुद्धाने अष्टांग मार्ग दिला सोबत दहा पारमिता आणि शिलाचार दिलेला आहे. अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा समावेश होतो तर याचे तीन भाग पडतात प्रज्ञा शील व समाधीसम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.त्यानंतर बुद्धाने दिलेल्यादहा पारमिता यामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो. या पारमिता पूर्ण करणारा व्यक्ती दुःख मुक्त होतो आणि बाबासाहेब यांनी पहिल्या या आठ प्रतिज्ञात तीन आर्यसत्य सांगितली आहेत कि अस्पृश्य शोषित लोकांचे दुख काय आहे त्यांची कारणे काय आहे आणि त्याचा निरोध करण्यासाठी काय केले पाहिजे आणि शेवटी बाबासाहेब निरोध करण्यासाठी बौद्ध धम्माच्या विसंगत कोणते हि आचरण करायचे नाही मग कोणते आचरण करायचे तर त्यासाठी पुढील प्रतिज्ञा आहेत
९)सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
१०)मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११)मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२)तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३)मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४)मी चोरी करणार नाही.
१५)मी व्याभिचार करणार नाही.
१६)मी खोटे बोलणार नाही.
१७)मी दारू पिणार नाही.
१८)ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
१९)माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
२०)तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१)आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.२२)इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो
बाबासाहेब यांनी दिलेल्या या प्रतीज्ञामध्ये स्पष्ट शिलाचार आहे अष्टांग मार्ग आहे दहा पारमिता चा अंतर्भाव आहे आणि शेवटी बाबासाहेब २२ व्या प्रतिज्ञेत म्हणतात कि इत:पर मी बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. आता प्रश्न पडतो कि आम्ही यावर किती चालतो जाणून घेतेले आहे का आम्ही हे सत्य बाबासाहेब यांनी दिलेल्या प्रतिज्ञांचा लोकांनी अक्षरक्ष: खिल्ली उडवलीय ती हि त्यांच्याच अनुयायी वर्गाकडून यातले एक हि सत्य जाणून न घेतल्याने हा समाज केवळ दुःख आणि दुःखच जगत आहे आज आंबेडकरी जनता म्हणून घेणाऱ्या लोकामध्ये दुखाशिवाय काहीच नाही केवळ दुख आणि दुख च आहे बुद्ध संस्कृती हि एक मोठे महासागर आहे तरण्याचे गरज आहे तरच आमचा इतिहास जगापुढे जाईल आज बाबासाहेब यांनी बुद्धांचा धम्म दिला म्हणजे तो काय असाच उचलून दिलेला नाही सखोल अध्ययन करून दिलेला आहे म्हणून बुद्धांच्या शिकवणीला आधुनिक पद्धतीने मांडणारे बाबासाहेब आमच्यासाठी आधुनिक बुद्ध ठरतात.
(टीप : बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञांचे चार आर्य सत्य या संकल्पनेत मांडण्याचे काम ABCPR लेणी संवर्धक उपासक आयु. दिनेश धबाले सर यांनी मांडले असून मी फक्त विस्ताराने संकलन केले आहे. हे आर्य सत्य समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या चष्म्यातून पाहणे आवश्यक आहे असे आदरणीय दिनेश धबाले सर यांचे म्हणणे आहे अपेक्षा करू आपण त्याच बाबासाहेबांच्या चष्म्यातून बौद्ध धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही विद्वान मंडळी इथे म्हणू शकतात डोळस बुद्ध बाबासाहेब यांनी दिला आहे तर त्यावर हि सविस्तर लिखाण केले जाईल डोळस बुद्ध म्हणजे सोयीस्कर बुद्ध नव्हे यावर हि सविस्तर लिहिण्याची गरज आहे म्हणून ते लिहिण्याचे काम धम्मलिपी रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात धम्मसिरि च्या माध्यमातून केले जाईल )साधू साधू साधू ABCPR लेणी संवर्धक : मुकेश जाधव

Team ABCPR , DHAMMASIRI

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply