जुन्नर बुद्ध लेणी प्रशिक्षण कॅम्प

ABCPR TEAM Programe

जुन्नर मानमोडी बुद्ध लेणी प्रशिक्षण कॅम्प
लेणी म्हणजे बौद्ध इतिहासाचा अनमोल दागिना समजून घेण्याची अभ्यास पद्धती अतिशय सुलभ आणि सोपी आहे फक्त आम्हाला ती समजण्यासाठी आम्ही ती शिकून घेतली पाहिजे
दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी ABCPR लेणी संवर्धक टीम जुन्नर येथील मानमुकुड बुद्ध लेणी वर धम्मलिपी मध्ये शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन लेण्यावर लिहलेले शिलालेख वाचण्यास शिक्षित झाले आहेत याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
हे लोक उद्या अनेक लोकांना आपला इतिहास सहज वाचून दाखवतील नुसते वाचून दाखवणार नाहीत तर ते त्यांना त्यातील अर्थ समजावून सांगतील अपेक्षा आहे येणारा काळ हा कुणा एका व्यक्ती ची वा एका समुदायाची वर्चस्व असलेली ही मक्तेदारी मोडीत काढेल व भारतातील प्रत्येक बौद्ध व्यक्ती हा धम्मलिपी मधील आपला इतिहास वाचेल इथले स्थापत्यशास्त्र वाचेल हे अवाढव्य साहित्य वाचून आपला इतिहास समजून घेईल म्हणजे त्याला इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि यासाठी धम्मसिरी इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून प्रशिक्षित वर्ग तयार केला जाईल
आज सांगायला आनंद वाटतो की धम्मसिरी इन्स्टिट्यूट मधून शेकडो लोक असे प्रशिक्षित झालेले आहेत तर हजारो लोक ही लिपी शिकलेले आहेत
आता पर्यंत हजारो लोक सहज ही लिपी शिकून गेले आहेत
अश्याच पद्धतीने लेणी स्थापत्य अभ्यास प्राकृत पाली अभ्यास इथल्या स्थापत्य शैली चा अभ्यास लवकर च सर्वसामान्य लोकांसाठी शिकवला जाणार आहे
जुन्नर येथील हा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीचा होता अनेक जेष्ठ व तरुण युवा युवती या प्रशिक्षण कॅम्प मध्ये आले होते
आलेल्या सर्वानी समता सैनिक दलामध्ये जॉईन होऊन ABCPR टीम मध्ये काम करण्याची तयारी दर्शवली असून 3 तारखेला अनेकांनी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहून प्रत्यक्ष सुरुवात देखील केलेली आहे
ABCPR हे मिशन आहे ध्येय आहे लेणी संवर्धनातून धम्म संवर्धनाचे
आपण ही त्यात सामील होऊ शकता
Team ABCPR
Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat