महाराजा घटोत्कच

महाराजा घटोत्कच गुप्त

अजय पवार , जळगाव
घटोत्कच ऐतिहासिक नाव जगाला फारसे परिचित नाही. याबद्दल फारशी माहिती जगाला नाही. याच बद्दल ऐतिहासिक माहिती अशी आहे.
गुप्त राजवंशाचा संस्थापक श्रीगुप्त २४० ते २८० यांचे मोठ्या मुलाचे नाव महाराजा घटोत्कच होते. महाराजा घटोत्कच २८० ते ३१९ नंतर त्यांचा मुलगा चंद्रगुप्त पहिला ३१९ ते ३३५ व घटोत्कोचा नातू चंद्रगुप्त दुसरा इसवी. ३३५ ते ३५६ याने नाग घराण्यातील कन्या कुबेरनागाशी विवाह केला. नाग हे शक्तिशाली सत्ताधारी कुळ होते. या वैवाहिक युतीमुळे चंद्रगुप्त दुसरा याला आपले साम्राज्य वाढवण्यात मदत मिळाली.
प्रभावतीगुप्त हि वाकटक राजा रूद्रसेन दुसरा ३५६ ते ३७८ याची मुख्य राणी होती. प्रभावतीगुप्त हि चंद्रगुप्त दुसरा व कुबेरनागा पासून झालेली मुलगी होती. पती राजा रूद्रसेन दुसरा याच्या निधनानंतर प्रभावतीगुप्त पतीचे राज्य सांभाळले. या संदर्भातील पुरावा पुणे ताम्रपटात आहे.
यांच्या संबंधातील विशेष बाब म्हणजे नाग, वाकटक व गुप्त राजवंश बुध्द, धम्म व संघाचे उपासक होते.
अलाहाबाद अशोक स्तंभावरील शिलालेखात महाराज घटोत्कच विषयी माहिती कोरण्यात आली आहे.
प्रभावतीगुप्त याच्या ताम्रपटात महाराज घटोत्कच याचा नावाचा उल्लेख आहे. याशिवाय सेंट पीटरबर्ग या वास्तू संग्रहालयात महाराज घटोत्कच यांचे सोन्याचे एक नाणे संग्रहित आहे. या नाण्यावर #श्री_घटोगुप्त असे लिहले आहे.
चित्र क्रमांक एक महाराजा घटोत्कच यांचे सोन्याचे नाणे.
चित्र क्रमांक दोन महाराजा श्री घटोत्कच असा उल्लेख असलेला अलाहाबाद स्तंभावरील ओळ.
चित्र तीन व चार प्रभावतीगुप्त यांचे पुणे व रिध्दापूर ताम्रपटात महाराजा घटोत्कच वर्णन गुप्त घराण्यातील पहिला राजा म्हणून करण्यात आले आहे.
अजय पवार

अजय पवार

बौद्ध धम्म अभ्यासक, प्राचीन इतिहास अभ्यासक , लेणी अभ्यासक

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on telegram
Telegram
Share on whatsapp
WhatsApp

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat