लेणी दर्शन व लेणी अध्ययन चारिका


Ancient Buddhist Caves Preservation & Research
Samata Sainik Dal Unit

Buddhist Heritage Division
The Buddhist Society Of India

ABCPR TEAM
Dhammasiri Foundation
दिनांक 22/01/23 रोजी. ABCPR हेरीटेज संवर्धक टीम व समता सैनिक दल लेणी संवर्धक युनिट यांच्या वतीने कोंडीवटे बौद्ध लेणी या ठिकाणी लेणी संवर्धन आणि लेणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली या बुद्ध लेणी धम्म चारिका आणि लेणी कार्यशाळा चे नियोजन अगदीच थोडक्याच कमी दिवसामधी जबाबदारी स्वीकारलेल्या ABCPR च्या सर्वच टीम मेहनीतीने यशस्वीपूर्ण आजचा सहभागी झालेल्या चा प्रतिसाद बघता आज कोंडीविटे बुद्ध लेणीवर संपूर्ण नवी मुंबई, उपनगर, हरबर, पश्चिम,आणि सेंट्रलमुंबई, स्थित कुलाबा, आणि पुणे टीम या भागातून आलेल्या धम्म बांधव आणि भगिनींचा उत्तम मोठया संख्येनी उपस्थितीत बुद्ध लेणी धम्म चारिकेची सुरुवात स्तूप विहार लेणी मधी बुद्धमूर्ती ठेऊन समता सैनिक दलाच्या युनिट द्वारे लेणीला जनरल सलामी देण्यात आली. सर्व उपस्थिती समूहीत त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन पुढील कार्यशाळे च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षता सावंत मॅडमनी केले, आणि लेणीबद्दल अडीच हजार वर्षापूर्वी चा धम्म वारसा कसा, का लयास गेला व आता पुढे कार्यरत कशापद्धतीने करायचे यांचा उलगडा लेणीसंवर्धक टीमचे आदरणीय प्रशांत माळी सहज सोप्या भाषेच्या शैलीत मांडली. कोडीवटे लेणी विषयी माहिती आदरणीय अमर ननावरे सर यांनी सोप्या सहज शब्दातून धम्म चा रिकेला सहभागी झालेल्या सदस्यांच्या ज्ञानात आणून दिले. तेच सर्वात मोठे सहकार्य असे सकाळी अल्पोहाराची व्यवस्था लेणी संवर्धन चे आदरणीय, गणेश गायकवाड सर आणि त्यांच्या सहपरिवार कडून करण्यात आली. आशा या प्रवासातून धम्म चारिका लेणी अध्ययन आणि कार्यशाळेचा राबविलेला उपक्रम सर्वाच्या बहुमूल्य सहकार्य मधून उस्ताहीत पणे यशस्वी झाला. सर्व आलेल्या धम्म बांधव भगिनींचे पुढच्या ही धम्म चारिकेला सहभाग राहील अस उचित पकडून आपके खूप खूप आभार.
















अभिप्राय
काल दिनांक 22 जानेवारी रोजी एबीसीपिआर हेरिटेज लेणी संवर्धक टीम तसेच समता सैनिक दल मुंबई व इतर ठिकाणावरून आलेले सैनिक यांच्यावतीने कालची जी कार्यशाळा आयोजित केली होती ती कार्यशाळा अत्यंत उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणात व माहितीपूर्ण आणि उद्देश पूर्ण अशी सफल झाली.
आम्ही पुणे टीम कडून 50 व्यक्ती कालच्या कार्यशाळेला स्वयंस्फूर्तीने हजर होतो.( पुणे टीमला कार्यक्रम स्थळी पोहोचायला काही अपरिहार्य कारणामुळे थोडासा उशीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो).
मी स्वतः गेली चार ते पाच वर्षापासून समता सैनिक दलाचा सभासद आहे. समता सैनिक दलाच्या अशाच एका कार्यक्रमामध्ये आमचे मित्र सचिन व निलेश यांच्याशी चर्चा करत असताना सहज लेणी संवर्धन चा विषय निघाला….. आणि त्याचवेळी लेण्यांचे संवर्धन करणारी एक टीम कार्यरत असल्याचे मला त्यांच्याकडून समजले. आणि मी त्याचवेळी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन या टीमचा सभासद होण्याचे ठरवले आणि त्याच ध्येयाने मी आज कोंडीवटे लेणी कार्यशाळेमध्ये दाखल झालो. इथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम मी एबीसीपीआर चा मेंबर फॉर्म भरून टाकला आणि येथे येण्याचा जो काय मनसुबा होता तो पूर्ण केला.
कार्यक्रम सुरू असताना बऱ्याच लोकांच्या खूप खूप छान छान प्रतिक्रिया आणि मनोगते ऐकायला मिळाली. लहानां पासून अगदी 85 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना सुद्धा लेणींचे माहिती घेणे, लेण्यांचे जतन करणे, लेण्यांचे संवर्धन करणे, आपल्या पूर्वजांनी जो काही वारसा मागे ठेवला आहे तो जतन करणे अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे असे समजले. हे सर्व ऐकून, पाहून मन भारावून गेले…
यावेळी प्रशांत माळी सर तसेच अमर ननवरे सर यांचे माहितीपूर्ण मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले….
आम्ही अजंठा वेरूळ कारले भाजे इत्यादी ठिकाणी लेण्यांना भेटी दिल्या परंतु अमर सरांनी सांगितलेली यथायोग्य माहिती लेण्यांच्या कानाकोपऱ्यातील खानाखुणा,वेगवेगळी चिन्हे आकृत्या जसे की आवळा, नाग, चौकोनी खांब म्हणजे चार आर्य सत्य वगैरे वगैरे याबद्दल यथायोग्य आणि ऐतिहासिक माहिती मिळाली. त्यासाठी अमर सर आणि माळी सरांचे खूप खूप धन्यवाद.
यापुढे अशा प्रकारच्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमास मी किमान दोन व्यक्ती तरी आणण्याचा प्रयत्न करेल अशी मी सरांना ग्वाही देतो.
येथील पुढे होणाऱ्या प्रत्येक लेणी संवर्धन कार्यक्रमांमध्ये मी आवर्जुन आणि उत्साहवर्धक मनाने भाग घेणार आहे अशी ग्वाही मी त्या दोघांना या मनोगताच्या रूपाने देत आहे.
त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिका यांनी अशीच प्रचंड उपस्थिती पुढील ही कार्यक्रमांमध्ये दाखवावी अशी मी सर्वांना विनंती करतो.
त्याचप्रमाणे आमच्या देहूरोड, पुणे येथील समता सैनिक दल पर्यटन टीमने सुद्धा अथक परिश्रम करून 50 लोकांना कोंडीवटे लेणी कार्यशाळेसाठी तयार केले व त्यांना हे लेण्यांचे दर्शन घडवून आणले त्याबद्दल देहूरोड पर्यटन टीमचे सुद्धा मनापासून आभार.
…… जय भीम
राजु सोनावणे
जय भीम नमो बुद्धाय सर्व टीम सभासदांना, आणि या कोंडीविटे बुद्ध लेणी संवर्धनामध्ये आणि संवर्धन कार्यशाळेमध्ये पूर्ण जोशाने जसं सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन, यापुढेही आपण प्रत्येकाने फक्त दोन लोकांना सोबत घेऊन यायचे आहे, या संवर्धन कार्यशाळेमध्ये प्रत्येकाने यायला पाहिजे, हा आपला वारसा आहे, तो वारसा आपण जपला पाहिजे, असे पोट तिळकिने सर्व संवर्धक आणि अमर ननावरे साहेब, यांनी अथक प्रयत्न करून आणि जो ग्रुप बनवून सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं, त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक खूप खूप कमीच आहेत, तसेच गणेश गायकवाड, यांच्याकडून सर्वांना अल्पोपहार सर्व परिवाराने मिळवून दिला, त्यांचेही आभार, आणि प्रशांत माळी सर, यांनी जो फायर जो बारूद आमच्या रक्तात भरलाय त्यांच्याबद्दल काय बोलावे ते सुचत नाहीये, रक्त उसळून उठतंय, ती आग प्रत्येक जण घरी घेऊन गेला असेल असे मी गृहीत धरतो, 18 फेब्रुवारी चा कन्हेरी लेणी वरती ते आपण सर्व दाखवून द्याल याची खात्री आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना घेऊन याल याची खात्री आहे, ,थोडीशी दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते, ती अशी की अमर ननावरे साहेब लेणी बद्दल सर्व माहिती खूप पोट तिडकीनेच कळवळून घसा ओरडून सांगत होते पण, पण माझे काही बांधव इकडे फोटो काढण्यात इकडे फोटो सेशन करण्यात इकडे तिकडे फिरण्यात व्यस्त दिसत होते, तिकडे थोडा बेसिस्त पना जाणवला, यापुढे अशी चूक आपल्या संवर्धन सभासदाकडून होणार नाही याची काळजी घ्यावी असे मला वाटते, आज वर्णन करावे तितके थोडे आहे, खूप खूप लोकांनी खूप खूप एन्जॉय केला, कार्यशाळेचा आनंद घेतला, आणि बरीच माहिती पदरात टाकून घेतली ज्ञानात भर पडली…अमर ननावरे साहेबांचा पुन्हा एकदा अभिनंदन, आणि धन्यवाद
सोपान कोले
ABCPR TEAM
लेणी दर्शन व लेणी अध्ययन चारिका
लेणी संवर्धनातून धम्म संवर्धन
Contact
Prashant Mali : 8976475043, Amar Nanavare : 7378361589