
लोहगडवाडी बौद्ध लेणी
पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतात लोणावळा मध्ये ऐतिहासिक भाजे बुद्ध लेणी च्या जवळ असलेला ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर असलेल्या प्राचीन बुद्ध लेण्यांचा समूह आपणास पाहायला मिळतो. साधारण पणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या लेण्यांची निर्मिती केली असावी. इथे सापडलेल्या शिलालेखावरून व लेणी च्या बांधकामावरून या लेण्यांचा कालखंड सांगता येतो. लोहगडवाडी लेणी चा इतिहास : प्राचीन काळात महाराष्ट्रात सातवाहन सम्राटांचे आधिपत्य आपणास पाहायला मिळते. जवळ च असलेल्या विसापूर किल्ल्यावर वाशिष्टीपुत्र पुळूमावी यांच्या राज्यवर्षात कोसिकीपुत्र वेन्हूदत्त याने पाण्याचे टाके दान दिल्याचा उल्लेख सापडतो. हा कोसिकी पुत्र वेन्हुदत्त वाशिष्टीपुत्र पुळूमावी याचा महारठी म्हणून काम करत असल्याचे समजून येते. तसेच भाजे लेणी मध्ये देखील त्याचा उल्लेख सापडतो त्याच बरोबर कार्ला बुद्ध लेणी मध्ये हि वाशिष्टीपुत्र पुळूमावी याचा शिलालेख आढळून येतो तर गौतमीपुत्र सातकर्णी याचा शिलालेख देखील कार्ला बुद्ध लेणी मध्ये सापडतो एकूण च मावळ प्रांताचे प्राचीन नावाचा उल्लेख हि याच ठिकाणी आपणास पाहायला मिळतो प्राचीन काळातील मामाडे आहार म्हणजे आजचे मावळ आणि याचा अधिकारी अमात्य असतो प्राचीन काळी जनपद हे राजा राहत असलेले ठिकाण असे तर राष्ट हा नंतर चा विभाग आहे ज्यामध्ये अधिकारी हा राष्ट्रीक असे हा प्रदेश मोठा असल्याने भौगोलिकदृष्ट्या या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जात असत यामध्ये राष्ट्रीक हा अधिकारी असे अशी रचना हि सातवाहन कालीन विभागीय प्रशासन मध्ये पाहायला मिळते( सातवाहन कालीन महाराष्ट्र, मोरवंचीकर ) सातवाहन यांचा कालखंड इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० असा एकूण ४६० वर्षाचा कालखंड आहे. यामध्ये सातवाहनांचे ३० सम्राट होवून गेले आहेत. सातवाहन यांच्या प्रशासनातून महाराष्ट्राचा एक नवा इतिहास शिलालेखांच्या माध्यमातून उजेडात येतो. मावळ प्रांतात सातवाहन काळात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट दिसून येते मावळ प्रांतात असलेल्या लेण्या आणि अनेक प्राचीन अवशेष आपणास सहज माहिती होवून जातील असे आहेत. मावळ चे आज तीन भाग आहेत आंदर मावळ नाणे मावळ आणि पवन मावळ यामध्ये आपणास जवळपास ३० पेक्षा जास्त लेणीचे समूह सापडतात काही समूह मोठे आहेत तर काही अगदीच छोटे समूह आहेत परंतु मावळातील या खोऱ्यात बौद्ध धम्माचा प्रभाव किती मोठा होता याचे हे उत्तम उदाहरणे आहेत. भाजे लेणी च्या जवळ असलेला हा लोहगड या किल्ल्यावर लेणी व पाण्याची टाकी निर्माण केल्याचे सर्वप्रथम आपणास पाहायला मिळते. लोहगड वाडी येथील हि लेणी बौद्ध काळात निर्माण झाल्याचे उदाहरण आहे. सातवाहन सम्राटांनी या महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्खुणा एक सुविधा निर्माण करून दिल्या वर्षावासाठी बौद्ध भिक्खुंच्या राहण्याची व्यवस्था म्हणजे या लेण्या आहेत. पुढे लेण्यांचा वापर व्यापारी मार्गावर असल्याने व्यापारी लोकांच्या निवासासाठी देखील केला जावू लागला व बौद्ध अध्ययनाचे केद्र देखील तयार झाले. लोहगड येथील लेणी हि याच काळातील लेणी आहेत. लोहगड येथे एकूण सात ते आठ लेणी समूह आहेत यामध्ये लोहगड तिकीट विंडो च्या अगदी वरच्या भागात महत्वाचा लेणी समूह आहे. जिथे आपणास शिलालेख पाहायला मिळतो . सुरुवाती ला असलेले लेणे हे पूर्णपणे भग्न झालेले आहे इसवी सन १७ व्या शतकात याचा वापर करण्यात आलेला आहे दगडाचे बांधकाम करून ह्या लेण्या चा वापर केलेला आपणास पाहायला मिळतो. इथल्या पाण्याच्या टाक्या किल्ल्यातील लोकांना पाणी पुरवण्याचे काम करत असलेल्याचे स्पष्ट दिसून येते.
एकूण च लोहगड किल्ल्याचा इतिहास हा बौध्द इतिहासातील महत्वाचा इतिहास म्हणून त्याच्याकडे पाहता येते. लोहगड किल्ल्यावर अगदी वरच्या भागात काही लेण्यांचे अवशेष व पाण्याच्या टाक्याचे अवशेष आपणास पाहायला मिळतात. त्यामध्ये सर्वात मोठी लेणी म्हणून किल्ल्या वर असलेले लक्ष्मी कोठी जिला हे नाव नंतर च्या काळात दिलेले आहे वास्तविक हे एक भव्य लेणे आहे हि या लेणी समूहातील सर्वात मोठी लेणी आहे या लेणी कडे येणाऱ्या मार्गात आपणास काही ठिकाणी लेणी चे अवशेष पाहायला मिळतात तसेच आज काही लेण्या पाण्याच्या टाक्याप्रमाणे आहेत पाणी साठवून ठेवल्याने आज त्यामध्ये पाणी पाहायला मिळते.
गडाच्या पायथ्याला असलेला लेणी मध्ये विहार व भिक्खू निवास हि पाहायला मिळते.या लेणी मध्ये बांधकाम करून त्याचा वापर केल्याचे पुरावे आपणास या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भव्य विहार आलेली हिलेणी आज मात्र मातीने भरलेली आहे अतिशय भग्न अवस्थेत हि लेणी आपणास पाहायला मिळते. यामध्ये एका लेणी ला दोन विभागात विभागून मध्यभागी भिंत बांधलेली आपणास पाहायला मिळते. यामुळे लेणी दोन भागात विभागलेली आपणास पाहायला मिळते त्यांच्या पुढच्या बाजुस पाण्याचे एक भव्य टाके देखील पाहायला मिळते तसेच या लेणी च्या वरच्या बाजूस एक लेणे व पाण्याचे टाके कोरलेले आपणास पाहायला मिळते.
लेण्यामध्ये दगडाची झीज होवून कणाकणाने हि लेणी भग्न होवू लागली आहे यामुळे एक इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे आपणास पाहायला मिळते. पुढे पाण्याचे टाके पाहून झाल्यावर थोडे पुढे गेल्यावर उंचावर एक लेणे आहे अर्थात ते पाण्याचे टाके असावे पण त्याला पेशव्यांच्या काळात दगडांनी झाकण्याचा प्रयत्न केलेला आपणास पाहायला मिळतो. या ठिकाणी आपणास शिलालेख पाहायला मिळतो जो सर्वात महत्वाची भूमिका बजावतो या शिलालेखामध्ये उल्लेख हा पाल बुद्ध लेणी मधील असलेल्या शिलालेखाप्रमाणे च आहे शिलालेख तपशील पाहू या

शिलालेखांचे लिप्यांतर
प्राकृत पाली भाषा :
नमो अरहंतानं भयं
त इदरखितेन पोढि
पेठिका पथो दो आसना
नि वेयिका च कारापिता
सातकेहि सहा गोसाले
.. म का नि कतोनि
मराठी भाषांतर : अर्हताना नमन करून भदंत इंद्ररक्षित यांनी गोसाले यांच्या सोबत पाण्याचे टाके रस्ता व दोन आसान पेडिका यांचे निर्माण करण्याचे काम केलेले आहे.


वरील शिलालेखांचे शब्द पाहता नमो अरहंताना म्हणजे थेट जैन तीर्थकर यांच्यासाठी च याचा उल्लेख आहे असा अर्थ काढला जातो. यासाठी पाले लेणी मधील Sankalia आणि शोभना गोखले यांनी २९ .९ . १९६९ मध्ये सदर केलेल्या The Brahmi Inscription from pale यामध्ये त्यांनी पाले लेणी मधील शिलालेख हा जैन शिलालेख म्हणून नमूद केलेला आहे. केवळ सुरुवातीचा शब्द हा नमोअरहंताण आहे म्हणून यापलीकडे शिलालेखाची कोणती बाजू तपासून पाहिलेली त्या भागात पाहायला मिळत नाही याची माहिती त्यांनी एफिग्रफिका व्हल्युम ३८ मध्ये पेज नं १६७ /६८ वर केलेलं आहे हे सांगताना त्यांनी नमो हा शब्द केवळ जैन धर्मामध्ये वापरला जातो असे म्हटलेले आहे परंतु भारुत च्या स्तुपावर देखील नमो हा शब्द प्रयोग आलेला आहे. जैन लोकांनी स्वीकारलेले नमो अरिहंताण असायला हवे नमो अरहंताण असे नको परंतु अनेक ठिकाणी नमो अरहंताण हा शब्द प्रयोग जैनांच्या काळात झालेला आहे. मुळात अर्हंत हि एक बौद्ध धम्मातील ज्ञानाची अवस्था आहे कान्हेरी येथील निर्वाणभूमी मध्ये सापडलेल्या बौद्ध भिक्खुंच्या अस्थी स्तुपावर जे शिलालेख सापडले त्यात अनेक अरहंताण शब्दांचा उल्लेख आलेला आहे हे शोभना गोखले यांनी त्यांच्या Kanheri Inscription या पुस्तकात त्यांनी च लिहिलेले आहे. इथे मात्र एका शब्दामुळे थेट जैन शिलालेख याचा उल्लेख केला गेलाय जैन शिलालेखात भदंत हा शब्दाचा उल्लेख येत नाही कारण जैनांमध्ये भन्ते नसतात. इथे उल्लेख आलेला शब्द हा भयंत असा आहे भयंत चा अर्थ भदंत असा होतो आणि हे बौद्ध भिक्खू साठी वापरण्यात आलेला शब्द आहे असे अनेक शब्द बौद्ध लेण्यातील शिलालेखात स्पष्ट पणे वाचायला मिळतात कान्हेरी येथील अनेक शिलाकेहात त्याचा उल्लेख आहे लेणी क्रमांक ३ मधील स्तंभावर असलेल्या शिलालेखात भदंत गहला भदंत अचल भदंत विजयमित्र भदंत धम्मपाला असे अनेक उल्लेख आलेले आपणास पाहायला मिळतात. अश्यावेळी वरील शिलालेखात उल्लेख झालेला शिलालेख हा जैन शिलालेख कसा काय होवू शकता हा प्रश्न निर्माण करणारा आहे. प्राचीन काळात या ठिकाणी जैनांचे कोणते हि अस्तित्व पाहायला मिळत नाही अश्यावेळी जैन शिलालेख निर्माण होण्याचे कारण च नव्हते. अभ्यासकांनी यामध्ये जो संभ्रम केला आहे तो स्पष्ट आहे कि स्पष्ट शब्दात या ठिकाणी आलेले उल्लेख हे बौद्ध भिक्खू ने दान दिल्याचा असताना जैन शिलालेख म्हणून केलेला इतिहासातील खोडसाळ पणा आहे असे आम्ही मानतो



त्याच प्रमाणे Indian Archaeology 1984-85 A Review यामध्ये विसापूर किल्ल्यावर सापडलेल्या शिलालेखांचा उल्लेख या पुस्तकात पाहायला मिळतो पेज नं १३४ वर विसापूर किल्ल्यावरील शिलालेखाची नोंद आहे. एकूण इथल्या परिसरात कुठे हि जैन शिल्पकला नाही जैन स्थापत्यकला नाही जैन धर्माचा ऐतिहासिक पुरावा नाही अश्यावेळी ओढून ताणून एका शब्दाने शिलालेख जैन धर्माशी निगडीत करून हा इतिहास लपवला जात आहे असे कोणते कारण आहे जो बौद्ध लेण्यात जैन शिलालेख लिहिला जाईल हे हि पाहणे आवश्यक आहे.
तशेच शिलालेखात नमो हा शब्द नाणेघाट येथील लेण्यातील शिलालेखात हि उल्लेख झालेला आहे आणि शब्द रचना त्याच काळातील आहे आणि हा काळ म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचे प्रगतीचा कालखंड आहे इथे कुठे हि जैन प्रभाव पाहायला मिळत नाही सातवाहन हे जैन मताचे नव्हते सातवाहन यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसाराची काम केलेली आपणास पाहायला मिळतात याचे उदाहरण द्यायचे झाले तर कार्ला लेणी मधील शिलालेख जो गौतमीपुत्र सातकर्णी याचा राज आदेश आहे भिक्खुणा दिलेल्या दानाच्या जमिनीत अर्थात त्या भिक्खूहलामध्ये कोणत्या हि अधिकाऱ्याने पाय ठेवू नये शिवाय कोणता हि कर बसूल करू नये कारण ती जागा बौद्ध भिक्खुंच्या उदरनिर्वाहासाठी दिलेली आहे एवढी मोठी घोषणा बौद्ध धम्माचे अनुयायी असल्याशिवाय देणे शक्य नाही त्यामुळे अनेक पुरावे हे बौद्ध धम्माचे असताना इतिहास शब्दांचा छळ करून बदल करण्याचे कसब इथल्या अभ्यासकांनी जोपासलेले पाहायला मिळते.पाले लेण्या प्रमाणे लोहगड येथील हा शिलालेलेख आहे. पाले लेणी मध्ये ज्या व्यक्ती ने दान दिले आहे त्यांनीच इथे हि दान दिल्याचा उल्लेख आहे. लोहगड वाडी लेणी हि ऐतिहासिक प्राचीन ठेवा आहे. आणि त्याचे जतन करणे तेवढेच महत्वाचे आहे.