• Post author:

भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या सैनिकांची कान्हेरी बुद्ध लेणी ला माघी अमावस्या दिनी सैनिकी मानवंदना 

हजारो वर्षापूर्वी बौद्ध सम्राटांच्या सैनिकांची  बुद्ध लेणी आणि भिक्खू संघाला मान वंदना दिली जात असे. हा क्षण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा जिवंत करण्यात आला. 

समता सैनिक दलाच्या सैनिकांची मान वंदना

दिनांक १ मार्च २०२२ हा दिवस इतिहास नमूद करण्यासारखा दिवस आहे. सन १९५२ साली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः कान्हेरी बुद्ध लेणी वर संपूर्ण लेणी फिरून लेणी ची माहिती घेतली होती. आणि आज डॉ बाबासाहेब यांचे नातू आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी स्वतः या लेणी मध्ये येवून बुद्ध वंदना घेत संपूर्ण लेणी फिरून माहिती घेतली. त्यामुळे हा दिवस इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखा आहे. 
१ मार्च २०२२ रोजी समता सैनिक दलाच्या मुंबई  बटालियन मधील सर्व सैनिक तसेच ठाणे पालघर नवी मुंबई मधील सैनिक व अधिकारी हे मोठ्या संख्येने कान्हेरी बुद्ध लेणी वर हजर होते. माघी अमावस्या दिनी आलेल्या सैनिकांची मानवंदना आणि जनरल सलामी यामुळे कान्हेरी मधील सैनिकांच्या इतिहासाला पुन्हा एकदा  जिवंतपणा आला आहे. कान्हेरी येथील या महा धम्मोत्सव  च्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व सैनिक व उपासकांना मार्ग दर्शन करताना आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी सर्व बौद्ध समाजाने बुद्ध लेणी वर गेले पाहिजे म्हणून आवाहन केले. 
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक बौद्धाने दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे म्हणून आदेश दिला होता आज पुन्हा एकदा भीमराव साहेब आंबेडकर यांनी बौद्ध समाजाला दर रविवारी अमावस्या पौर्णिमा दिनी प्रत्येक बौद्ध व्यक्ती ने बुद्ध लेणी वर गेले पाहिजे असा आदेश दिला आहे. या ऐतिहासिक घटना नक्कीच बौद्ध समाजाला आपला इतिहास पुन्हा लिहून ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. 

समता सैनिक दलाच्या मुंबई बटालियन  चे असि. लेफ्टनंट जनरल आणि भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश सरंक्षण विभाग उपाध्यक्ष आयु. प्रदिप कांबळे सर यांनी १ मार्च २०२२ आदरणीय भीमराव साहेब हे स्वतः कान्हेरी लेणी वर येणार असल्याने  विशेष  नियोजन करून उत्तम प्रकारे कार्यक्रम नियोजित केला. 
समता सैनिक दलाचे  स्टाफ ऑफिसर आद,एस. के भंडारे सर यांनी उपस्थित सैनिक व उपासिक उपासक यांना आवाहन केले व दर वर्षी माघी अमावस्या दिनी समता सैनिक दलाच्या वतीने  संपूर्ण भारतातील बुद्ध लेण्या व स्तूप विहारे या ठिकाणी महा धम्मोत्सव चे आयोजन केले जाईल व येणाऱ्या काळात संपूर्ण बुद्ध लेण्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी समता सैनिक दल त्याची संपूर्ण जबाबदारी घेवून काम करेल. अश्या प्रकारे बुद्ध लेणी संवर्धन कामाला राष्ट्रीय नेतृत्व मिळाल्याने  लेणी संवर्धन हि चळवळ हि यशस्वी होण्याकडे वाटचाल करत आहे. 
कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबई प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी आणि सर्व शाखांचे  सदस्य व पदाधिकारी यांनी कान्हेरी बुद्ध लेणी वर जय भीम च्या घोषणा देवून हि बुद्ध लेणी आहेत हे प्रशासनाला आपल्या कृती मधून दाखवून दिले. 

समता सैनिक दलाची परेड व मानवंदना हा कार्यक्रम झाल्यावर महा बुद्ध वंदना घेण्यात आली. बुद्ध वंदनेच्या सुराने पुन्हा एकदा कान्हेरी बुद्ध लेणी हि प्राचीन काळातील तिच्या भूतकाळात गेल्याचे भासले. हजारो वर्षाची हि परंपरा पुन्हा एकदा सुरु झाल्याचे चित्र पाहून या लेणी निर्माण करण्यासाठी ज्या अनामिक हातांनी कष्ट घेतले आहे ज्या उपसाक वर्गाने आपली दान पारमिता तिथे दिली त्या सर्व लोकांच्या कुशल कर्माने पुन्हा एकदा या लेणी मध्ये बुद्धं सरण गच्छामि चे स्वर निनादले.  
कान्हेरी लेणी वरील बुद्ध वंदना व आदरणीय भीमराव साहेब यांचे मार्गदर्शन झाल्यावर लेणी संवर्धक टीम च्या माध्यमातून या लेणी ची माहिती देण्याचे काम करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर रविंद्र  सावंत यांनी प्रत्येक लेणी मधील शिल्प , शिलालेख व इतिहास यांचे सविस्तर माहिती  दिली. प्राचीन काळापासून चालत आलेल्या अनेक गोष्टींचे दाखले या लेणी मधून दाखवण्यात आले. त्याची प्रत्यक्ष माहिती स्वतः आदरणीय भीमराव साहेब तसेच सोबत असलेले सर्व अधिकारी आणि सैनिक यांनी  घेतली. 
कान्हेरी  बुद्ध लेणी मध्ये असलेले अतिक्रमण नेमके आज कोणत्या अवस्थेत आहे हे पाहण्यासाठी स्वतः भीमराव साहेब आंबेडकर हे त्या अर्धवट तोडलेल्या मंदिराची पाहणी करण्यासाठी स्वतः तिथे गेले. तेथील बांधकाम लवकरात लवकर  कसे तोडले जाईल यासाठी आवश्यक तो  पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले. 
कान्हेरी लेणी वर उपस्थित असलेले समता सैनिक दलाचे असि. स्टाफ ऑफिसर आदरणीय अशोक कदम सर यांनी समता सैनिक दलाची परेड घेवून समता सैनिक दल म्हणजे नेमके काय असते. बाबासाहेब यांनी निर्माण  केलेले समता सैनिक दल हे कश्या पद्धतीने कार्यरत आहे ह्याची ओळख आज कान्हेरी लेणी वर देण्यात आली आदरणीय कदम सरांच्या सोबत समता सैनिक दलाचे  Rank Holder अधिकारी  डी एम आचार्य सर ,  मोहन सावंत  ,उमेश बागुल  , चंदाताई कासले , रविंद्र इंगळे, वासुदेव हिवराळे,  संतोष जाधव असे अनेक अधिकारी कान्हेरी बुद्ध लेणी वर उपस्थित होते. 

कान्हेरी बुद्ध लेणी वरील पाहणी करून आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी सोपारा बुद्ध स्तूपाच्या पाहणीकरिता कान्हेरी बुद्ध लेणी वरून रवाना झाले. नालासोपारा या ठिकाणी  समता सैनिक दलाचे पालघर बटालियन व पालघर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा च्या शाखेतील २०० उपासक सोपारा बुद्ध स्तुपावर आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. सोपारा बुद्ध  स्तुपाला बौद्ध सम्राटांच्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मान वंदना दिली होती  १९५५ मधील वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा जिथे बुद्धांच्या भिक्षापात्रांचे अवशेष सापडले अश्या ठिकाणी बाबासाहेबांचे मार्गदर्शन केले होते. त्यानंतर आज भीमराव साहेब आंबेडकर हे  बुद्ध भूमी सोपारा बुद्ध स्तूप या ठिकाणी येवून उपस्थित उपासक व सैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी  उपस्थित असलेल्या सैनिकांच्या वतीने बुद्ध  स्तुपाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलाचे सैनिक व लेणी संवर्धक आयु विनय जाधव सर यांनी सोपारा बुद्ध स्तुपामध्ये सापडलेल्या भिक्षापात्रांच्या अवशेष असलेल्या  करंडक  यांचे प्रतिमा आपल्या मुलांच्या हस्ते देवून  साहेबांचे  बुद्ध भूमीत  स्वागत केले. त्याच प्रमाणे सम्राट अशोक यांनी हा भव्य स्तूप बांधला आहे म्हणून समता सैनिक दलाचे सैनिक व लेणी संवर्धक आयु  मुकेश जाधव सरांचे सुपुत्र आयु राहुल जाधव यांनी स्वतःच्या हाताने काढलेले सम्राट अशोकाचे स्केच आदरणीय भीमराव साहेबाना भेट दिली. हे ऐतिहासिक क्षण सोपारा बुद्ध भूमी मध्ये सर्वाना पाहायला मिळाले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यांचे नातू आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी प्राचीन बौद्ध वारसा जपण्यासाठी स्वतः पाठपुरावा करत आहेत. आणि आज महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पुरातत्व विभागाच्या अधिकारी वर्गाशी पाठपुरावा करून हि स्मारके वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व समता सैनिक दलाच्या वतीने दर वर्षी हा महा धम्मोत्सव प्रत्येक बुद्ध लेण्यावर साजरा करण्यात येणार असून तश्या पद्धतीचा आदेश आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. त्यामुळे  आता बुद्ध लेणी संवर्धनाची चळवळ प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या अधिपत्याखाली राबवण्यात येईल. ABCPR लेणी संवर्धक टीम ने सामुहिक निर्णय घेवून समता सैनिक दलामध्ये सामील होवून आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काम करण्याचे निश्चित केल्यामुळे ABCPR लेणी संवर्धक टीम मधील प्रत्येक सदस्य हा समता सैनिक दलामध्ये सामील होत आहे व येणाऱ्या काळात लेणी चळवळ हि समता सैनिक दलाच्या अधिपत्याखाली च या भारतात राबवली जाईल. कान्हेरी बुद्ध लेणी या ठिकाणी समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाधम्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वी केल्याबद्दल सर्व पदाधिकारी सैनिक व उपासक उपासिका यांचे मनपूर्वक आभार. 
ज्या बौद्ध सम्राटांनी या  बौद्ध धम्माला राजाश्रय देवून हे वैभव निर्माण केले, ज्या  बौद्ध उपासक उपासिका यांनी आपली दान पारमिता या स्मारकाच्या निर्मिती साठी दिली  आणि ज्या  अनामिक शिल्पकार आणि कारागिरांनी हे वैभव उभे केले त्यांच्या कुशल कर्माने आपले सर्वांचे मंगल हो कल्याण हो 
साधू  !  साधू  !  साधू  ! 

 
 

Leave a Reply