नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग असून , पुरातत्वीय अवशेष असलेले महत्वाचे ऐतिहासील स्थळ आहे. नाणेघाट हे पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील सीमेवर असलेले , जुन्नर तालुक्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे. जुन्नर तालुक्याच्या वायव्य भागात समुद्र सपाटीपासून ८६० मीटर उंच तसेच ५ किलोमीटर अंतराचा हा घाट रस्ता आहे. जुन्नर पासून २८ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. प्राचीन काळातील व्यापारी मार्ग म्हणून नाणेघाट सर्वाना परिचित आहे. भारताच्या बाहेरून येणारा व्यापारी माल हा आजचे पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील प्राचीन व्यापारी बंदरावर येत असे. भडोच सोपारा कल्याण चौल अश्या प्रमुख सागरी बंदरातून येणारा व्यापाराचा माल घाट रस्त्याच्या मार्गाने विविध बाजारपेठांपर्यंत घेवून जात असत. कल्याण बंदरातून होणारी व्यापाराची वाहतूक मुख्यत्वेकरून तीन व्यापारी घाट रस्त्यातून जात असे. नाणेघाट , थल घाट आणि बोर घाट अश्या तीन महत्वाच्या मार्गातून होत असे. कल्याण येथून जुन्नर ते नेवासा , नेवासा ते पैठण असा मार्ग होता. सोपारा आणि कल्याण येथून देशावर जाण्यासाठी अगदी जवळचा घाट रस्ता कोणता असेल तर तो नाणेघाट आहे. कोकणातून देशावर जाण्यासाठी हे तीन महत्वाचे व्यापारी राजमार्ग आहेत.

नाणेघाट येथे महाराष्ट्राची प्रथम स्त्री राज्यकर्ती जी इतिहाला ज्ञात झाली आहे अशी सातवाहन सम्राज्ञी नागनिका सातकर्णी आणि तिचा संपूर्ण परिवार यांचे शिल्प नाणेघाट येथील लेणी मध्ये पाहायला मिळते.
सुरुवातीला सिमुक सातवाहन यांचे शिल्प आहे. त्यानंतर नागनिका हिचे शिल्प तिचा नवरा प्रथम सातकर्णी यांचे शिल्प आहे. त्यानंतर तिचा मुलगा कुमार भयला याचे शिल्प आहे एका राजकुमाराचे नाव हे वेदसिरी असावे. पुढे महारठी त्रनकयीर याचे आहे नंतर कुमार हकुसिरी आणि कुमार सातवाहन अशी एकूण आठ जणांचे शिल्प या नाणेघाट इथे पाहायला मिळते.
संशोधन : नाणेघाट येथील शिलालेखांचे प्रथम संशोधन विल्यम्स साईक्स यांनी रॉयल एसियाटिक सोसायटीच्या जर्नल एसियाटिक रीसर्चेस खंड ४१ मध्ये २८८ पेज वर १८३७ साली पहिल्यांदा या शिलालेखाची नोंद घेण्यात आली. यानंतर आपणास जेम्स प्रिन्सेप त्यानंतर स्टीव्हन्सन आणि भगवानलाल इंद्रजी यांनी देखील यावर चर्चा केली आहे खास करून जेम्स ब्युह्लर यांनी Archeological Survey Of Western India Vol. ५ मध्ये पेज ६० वर या लेखाचा उल्लेख केला आहे. या मध्ये त्यांनी शिलालेखाची नकल देखील दिलेली आहे. यानंतर त्यांनी फ्रंके आणि Rapson यांच्याशी चर्चा केली होती.ब्युह्लर यांचे मत होते कि नाणेघाट येथील शिलालेख हा पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन शिलालेख आहे. हा शिलालेख जवळपास भग्न झाल्याने अनेक अभ्यासकांनी भिन्न भिन्न पद्धतीने अर्थ लावले आहेत. ह्या लेखाचे अर्थ लावण्याचे प्रयत्न जेम्स प्रिन्सेप, जॉन स्टीव्हन्सस , भगवानलाल इंद्रजी, ब्युह्लर, वा. मिराशी, अजयमित्र शास्त्री , शोभना घोखले यांनी अर्थ लावण्याचे प्रयत्न केले आहेत. यांच्या नंतर जितके अभ्यासक आहेत त्यांनी ह्याच सर्वांच्या संसोधनाचा वापर केला आहे.
१९७६ साली एका शेतकऱ्याकडून पी जे चिन्हमूळगुंद यांना चांदीचे नाणे मिळाले होते. त्यामध्ये नायनिका आणि सिरि सातकनि हा उल्लेख होता म्हणजे हे नाणे राणी नागनिका आणि सिरी सातकर्णी यांचे होते हे सिद्ध झाले. भगवान लाल इंद्रजी यांनी खालच्या बाजूला असलेले पाण्याच्या ताक्यावरील शिलालेख वाचन करून सातवाहन राजा वाशिष्टीपुत्र स्कंद सातकर्णी यांच्या नावाचा शिलालेख उजेडात आणला परंतु अनेक अभ्यासकांच्या अभ्यासात हा शिलालेख पाहायला मिळत नाही या शिलालेखांचे पुन्हा संशोधन ABCPR लेणी संवर्धक युनिट , समता सैनिक दल आणि धम्मसिरि इन्स्टिट्यूट च्या शिक्षक वर्गाने केले आहे.
इतिहास : नाणेघाट या ऐतिहासिक व्यापारी मार्ग इसवी सन पूर्व तिसरे शतक म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २५० काळापासून व्यापाऱ्याचा मार्ग अस्तित्वात असल्याचे इतिहासात पाहायला मिळते. इसवी सन पूर्व तिसरे शतक हा कालखंड चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा असून महाराष्ट्राच्या अपरांत प्रांत तसेच संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश हा सम्राट अशोक यांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहन यांचा वंश प्रमुख सिरि सातवाहन हा सम्राट अशोक यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्याचा राज्यकारभार करत असल्याचे दिसून येते सिरि सातवाहन याची नाणी सापडली आहेत. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या नंतर स्वतःला स्वतंत्र राजा घोषित करून सातवाहन साम्राज्य उदयास आले असले तरी मूळ पुरुष कोण आहे हे शोधणे आवश्यक आहे. औरंगाबाद अकोला हायद्राबाद या ठिकाणी देखील सातवाहन राजाची नाणी आहेत तर नेवासा आणि कोंडापूर येथे उत्खननात सातवाहन राजाची नाणी सापडली आहे. नाण्याच्या समोरील बाजूस सोंड वर केलेला हत्ती आणि त्याच्या वर सिरि सादवाहनस असे लिहिलेले आणि पाठीमागे उज्जेणी सिम्बॉल आहेत. यावरून हे नाणे सिरी सातवाहन या राजाचे आहे असे स्पष्ट उल्लेख होतो. सिरी सातवाहन यांच्या नंतर चक्रवर्ती छिमुक असा उल्लेख असलेले शिल्प सन्नती येथील स्तुपावर सापडले तसेच त नाणेघाट येथील एका शिल्पाच्या मस्तकी सिमुक सातवाहन हा उल्लेख सापडतो. यावरून सिमुक सातवाहन हा दक्षिणापथपती असल्याचा उल्लेख हि नाणेघाट येथील शिलालेखात उल्लेख सापडतो. यावरून सम्राट अशोक यांच्या काळात च नाणेघाट निर्माण झालेला आहे याची माहिती समोर येते. नाणेघाट येथील लेण्यांचा कालखंड हा इसवी सन पूर्व तिसरे शतकाचा उत्तरार्ध असावा म्हणजेच साधारण इसवी सन पूर्व २३० ते २१० च्या आसपास असावा. नाणेघाट येथील शिलालेखांचा कालखंड सम्राट अशोक यांच्या नंतर ५ ० ते ८० वर्षानंतर असावा. साधारण पणे इसवी सन पूर्व १६० ते १५० च्या आसपास असावा. सिमुक सातवाहन याची सुन आणि सातकर्णी याची पत्नी व वेदसिरी याची आई महारठीनी अंगीयकुळातील नागकुळातील राणी नागनिका हिने केलेल्या कामांचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी हा राजमार्ग निर्माण करण्यात आला. नाणेघाट हा जुन्नर शहराच्या वायव्य भागात असल्याने जुन्नर शहराच्या इतिहासाशी याची मांडणी केली जाते. जुन्नर हे प्राचीन मीन नगर ते पुढे जुन्नर पर्यंत चा प्रवास आहे. मीन व कुकडी नदीच्या खोऱ्यात असलेला हा प्रदेश मीन नगर म्हणून ओळखत असे कालांतराने याचे नामकरण जीर्ण नगर जुनीर जीन्हेह होत ते जुन्नर पर्यंत आले आहे. राणी नागनिका हि सिमुक व कृष्ण यांच्या नंतर तिचा नवरा सातकर्णी यांच्या नंतर राजसत्तेवर आलेली आहे. नागनिकेचा इतिहास पाहता ती नागकुळातील असल्याचे तिचे वर्णन करण्यात आले आहे. तिच्या वृद्ध काळात तिच्या मुलाने म्हणजेच वेदसिरी हा राजा झाल्यावर हा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेखात असंख्य यज्ञांची नावे कोरण्यात आलेली आहेत. शिलालेखात अश्वमेध यज्ञ केल्याचे लिखित आहे. यावरून सातवाहन साम्राज्याला कोणी तरी दुसऱ्या साम्राज्याने आव्हान दिल्याचे स्पष्ट दिसून येते. सिमुक सातवाहन यांचे साम्राज्य बलाढ्य होते हे त्याच्या पुरातत्वीय अवशेष यावरून दिसून येते. या सर्व गोष्टी पाहिल्यावर महाराष्ट्रात सातवाहनांचे अधिराज्य होते परंतु त्यांना हि महाराष्ट्रात दोन वेळा आव्हान देण्यात आलेले आहे हे सिद्ध होते. पुढे क्षत्रप आणि सातवाहन यांचा सत्ता संघर्ष देखील आपणास पाहायला मिळतो. सातवाहनांचे अधिराज्य होतेच परंतु त्यांच्या राजधानीचा मुद्दा समोर येतो जुन्नर कि पैठण तर यावर पैठण हि राजधानी असावी असे निष्कर्ष काढले गेले आहेत. परंतु राजधानी म्हटली कि राज दरबार आणि राजधानी चा महाल दोन्ही आले अजून तरी सातवाहन यांच्या राज महालाचा ठोस पुरावा मिळालेला नाही. इसवी सन दुसऱ्या शतकाच्या शेवटी आणि तिसऱ्या शतकाच्या सुरुवातील गौतमीपुत्र यज्ञ सिरी सातकर्णी याचा राजमहाल मनसर इथे होता व त्याने तो नागार्जुन भन्ते यांना दिला अशी माहिती मिळते परंतु त्यावर हि अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. त्यामुळे राजधानी बाबत मात्र अजून ठोस कोणते हि पुरावे प्राप्त झालेले नाहीत. जुन्नर मध्ये क्षत्रप यांची राजधानी होती त्याचे पुरावे म्हणजे आजचा शिवनेरी किल्ला हा आहे तो किल्ला सिमुक सातवाहन यांच्या काळात निर्माण झाला असावा आणि हि त्याची राजधानी ची जागा असावी नंतर त्यांनी राजधानी बदलली आहे हे सिद्ध होते. इतिहासात अनेक गोष्टींचे संशोधन होणे आवश्यक असते त्यामुळे इथे हि संशोधन आवश्यक आहे.
शिलालेखांचे वाचन
शिलालेखाची भाषा : प्राकृत
शिलालेखाची लिपी: धम्मलिपी
शिलालेखाचा कालखंड : इसवी सन पूर्व दुसरे शतक
प्राकृत भाषांतर : डाव्या बाजूच्या भिंतीवर असलेला शिलालेख
१) सिधं नमो पजपति नो धमस नमो इंदस नमो संकसन वासुदेवानं चंद सुरानं महिमावतानं चतुनं च लोकपालानं यम वरून कुबेर वासवानं नमो कुमारवरस वेदसिरिस रञो
२) ……………..विरस सुरस अ प्रतिहत चंकस दखिनापथपतिनो ……………………………………
३) ……………… मा ….. बाला …. य महारठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवर वलय पथविय पथमविरस वस …….. य महतो मह ….
४) ………………… सिरिस भरिया देवस पुतदस वरदस कामदस धनदस वेदसिरि मातु सतिनो सिरिमितस च मातुय सि म ………………………………….. पथमय
५) वरिय …………………. नागवरदनिय मासोपवसिनिय गहतापसाय चरितब्रम्हचरियाय दुख व्रत यंञ सुंडाय यञा धूपनसुंगधाय निय मेन
६) रायस …………. य ञेहि यिठं वनो अगाधेय यंञो दखिना दिना गावो बारस १० २ असो च १ अनारभनियो यंञो दखिना धेनु
७) ……………………………………………………………………………………………दखिनायो दिना गावो १००० ७०० हथि १० ………………………………………….
८) ……………………………………………………..स ससतरय वासलठि २०० ८० ९ कुभियो रूपामयियो १० ७ मि …..
९) ……………………………………………………..रिको यंञो दखिनायो दिना गावो १०००० १००० असा १०००पस पको …
१०) …………………………………………. १० २ गमवरो १ दखिना काहापना २०००० ४००० ४०० पसपको काहापना ६००० राज सुयो यंञो … सकटं
उजव्या भिंतीवर असलेला शिलालेख
११) धंञगिरि तंस पयुतं सपटो १ असो १ असरथो १ गाविनं १०० असमेधो यंञो बितियो यिठो दखिनायो दिना असो रूपाल कारो १ सुवंन …. नि १० २ दखिना दिना काहापना १०००० ४००० गामो १ हठि ………… दखिना दिना
१२) गावो … सकटं धंञगिरितंस पयुतं ……………………………………………………….वायो यंञो ………………………………. ७ धेनु ……………… वाय … सतरस
१३) …………………………………………………………………………….१० ७ अच … न …. लय …………………….. पसपको दिनो …………….दखिनायो दिना सु …. पिनी …….. १० २ असो रूपालंकारो १ दखिना काहापना १०००० …… २
१४) ………………….. गावो २०००० भगल दसरतो यंञो यिठो दखिना दिना गावो १०००० १ गर्गतिरतो यंञो यिठो दखिना ……. पसपको पटा ३०० १ गवामयनं यंञो यिठो दखिना दिना गावो १००० १०० १ गावो १००० १०० १ पसपको काहापना १०० १ पटा १०० अतुयमो यंञो …
१५) ………………………. गवामयनं यंञो दखिना दिना गावो १००० १०० १ अंगिरस सामयनं यंञो यिठो दखिना गावो १००० १०० १ त .. दखिना दिना गावो १००० १०० १ सतातिरतं यंञो …………………………………… १००० १०० १ यंञो दखिना गावो १००० १००० १ अंगिरसतिरतो यंञो यिठो दखिना गावो \
१६) ………………………………………. गावो १००० २ छंदोपवमानतिरतो दखिना गावो १००० १ अंगिरसतिरतो यंञो यिठो दखिना दिना ………………….. रतो यिठो यंञो दखिना दिना …… तो यंञो यिठो दखिना ……यंञो यिठो दखिना दिना गावो १००० १
१७) …………………………… न स सयं ………… दखिना दिना गावो ……………………….. त ….. अंगिरसामयनं छवस ……. दखिना दिना गावो १००० ……………… दखिना दिना गावो १००० तेरस …. अ
१८) ………………………… तेरसरतो स ……………………. छ …………… अ ग दखिना दिना गावो ………………… दसरतो म …………….. दिना गावो १००० १ …. उ ……………………. दिना गावो १००० १ उ ………………..
१९) ………………………………………………………………………………………………………….. यंञो दखिना दिना ……………………………………………………………………..
२०) ……………………………………………………………………… दखिना दिना ………………………………………..
डाव्या भिंती वरील शिलालेख


उजव्या भिंती वरील शिलालेख


मराठी भाषांतर : धम्माला अनुसरून प्रजापती धर्म इंद्र संकर्षण वासुदेव चंद्र सूर्य महात्मावन असे चार लोकपाल यम वरून कुबेर आणि इंद्र तसेच कुमारवस यांना नमस्कार. वेदसिरी राजाच्या ………. शूर वीर अजिंक्य अश्या दक्षिणापथपतीच्या (सून ) आणि महारठी अंगियकुलोत्पन्न गिरी समुद्र वलयांकित पृथ्वीवरील वीरश्रेष्ठ ……. महान अश्या पुरुषात श्रेष्ठ अश्या श्रीची भार्या म्हणजे पत्नी तसेच लोकोपयोगी कर्मे करणारा इष्ट वर देणारा इच्छा पूर्ण करणारा देन देणारा राजा वेदसिरी याची माता तसेच सिरी शक्ती याची माता नागकुळातील श्रेष्ठ महिला महिने महिने उपसोथ करणारी घरामध्ये तपस्वी प्रमाणे राहणारी ब्रह्म चर्याचे पालन करणारी दीक्षा व्रत यज्ञ यांच्या अनुष्ठानात प्रवीण असलेली नियमित सुगंधित धुपाने यज्ञ केले.
१) अग्नाध्येय यज्ञात बारा गाई आणि एक अश्वाची दक्षिणा दिली.
२) अन्वारंभीय यज्ञात दक्षिणा धेनु ………… दक्षिणा दिली. गायी १७०० हत्ती १० ….. उदकपात्रे २८० चांदीचे घट १७ ……….
३) अंगारिक यज्ञात ११००० गाई १००० अश्व दक्षिणा दिली तसेच यज्ञ कर्मातील सेवकाला दक्षिणा दिली………. १२ उत्तम गाव १ दक्षिणा कार्षापण २४४०० याज्ञासेवकास कार्षापण ६००१ दिले.
४) राजसूय यज्ञात दक्षिणा ………………. शकट धान्य राशीच्या विनायोगासाठी नेमालेल्यास १ उंची वस्त्र १ अश्व १ अश्वरथ १०१ गाई दिल्या.
५) दुसरा अश्वमेध येज्ञ केला त्यात दिलेल्या दक्षिणा रूपालंकार युक्त अश्व सुवर्णअलंकार ………………. १२ , दक्षिणा दिली कार्षापण १४००० गाव १ हत्ती ……….. दक्षिणा दिली गाई ……. सकट १ धान्य राशी विनियोगार्थ प्रयुक्तला ……
६) वाय यज्ञ केला …. १७ गाई ….. सप्त दशाती रात्री …… १७ यज्ञ कर्मचाऱ्यास दक्षिणा दिली. ,…. १२ रुप्यालंकार युक्त अश्व १ तसेच १०००० कार्षापण दक्षिणा दिली…………… गाई २०००० , भगल
७ ) दशरात्र यज्ञ केलात त्यात दक्षिणा दिली १०००१
८) गर्ग त्रिरात्र यज्ञ केला त्यात दक्षिणा दिली …… यज्ञ कर्मचाऱ्यास ३०१ वस्त्रे दिली ,
९) गवा मयन यज्ञ केला गाई १००१ …. गाई १००१ यज्ञ कर्मचाऱ्यास कार्षापण ………….. १०१ वस्त्रे १००
१०) अप्तोर्याम यज्ञ केला …… ११) गवामयन यज्ञ केला दक्षिणा दिली गाई ११०१ , १२) अंगिरसामयन यज्ञ केला दक्षिणा दिली गाई ११०१ …… दक्षिणा गाई ११०१
१३) शतात्रिरात्र यज्ञ केला दक्षिणा दिल्या गाई ११००
१४) अंगिरस तीरात्र यज्ञ केला दक्षिणा गाई………. .. गाई १००२
१५) छंदोपवमानत्रिरात्री यज्ञ केला दक्षिणा दिली १००१
१६) अंगिरसातीरात्री यज्ञ केला दक्षिणा दिली …..
१७ ) तीरात्र यज्ञ केला दक्षिणा दिली गाई १००१ ………… स्वतः ….. दक्षिणा दिली गाई ……………
१८ ) अंगिरसामयन सहा वर्षाचा ………… दक्षिणा दिली ………… गाई १००० ………………. गाई १००१
१९) त्रयोदश रात्र … दक्षिणा दिली गाई ……. दशरात्र ………….. गाई १००१ ……………. गाई १००१ ………… यज्ञ केला …………….. दक्षिणा दिली.
राजकीय महत्व : भारतात मौर्य साम्राज्यानंतर इसवी सन पूर्व २ रे शतक हे सातवाहन साम्राज्याचा उदय म्हणून पाहिले जाते. सातवाहन कुलाचा संस्थापक सिरी सातवाहन याच्या वंशातील एकूण ३० राजांनी राज्य केल्याचा उल्लेख आपणास पाहायला मिळतो. सातवाहन साम्राज्याचा नाणेघाट येथील शिलालेख सातवाहन यांचे राज्य वाढवण्याच्या दिशेने केलेला मोठा पुरावा म्हणजे सातवाहन यांनी केलेले यज्ञ. मौर्य काळात यज्ञात बळी देण्याची परंपरा बंद करण्यात आली होती त्यामुळे सातवाहन काळात देखील त्या आदेशाचे पालन केले जात असल्याचे आपणास या ठिकाणी पाहायला मिळते. सातवाहन राजे देखील सम्राट अशोक यांच्या आदेशानुसार च काम करत असल्याचे आपणास इथे पाहायला मिळते. सातवाहन सम्राज्ञी नागनिका आणि सिरी सातकर्णी यांनी केलेल्या यज्ञात हि कुठे हि कोणता हि बळी दिल्याचे उल्लेख सापडत नाहीत यावरून सम्राट अशोक यांनी बंद केलेली प्राणी हिंसा सातवाहन काळापर्यंत तरी कुठे उल्लघन झालेले पाहायला मिळत नाही. सातवाहन यांच्या कारकिर्दीत झालेले हे यज्ञ पुढील कोणत्याच राजाच्या काळात सापडत नाहीत. याचे प्रमुख कारण सातवाहन राजांचे दक्षिणेत असलेले सार्वभौम राज्य होते हेच सिद्ध होते. सातवाहन नृपती सिरी सातकर्णी याने आणि नागनिका यांनी केलेले हे यज्ञ म्हणजे सातवाहन राजांचे आपले राजकीय अस्तित्व बळकट करण्याच्या हेतूने त्यांनी अनेक यज्ञ केल्याचे दिसून येते या यज्ञाचा धार्मिक परंपरेशी कोणता हि सबंध जोडता येत नाही कारण , यज्ञात कोणत्याही विशेश्द धार्मिक गोष्टीचा उल्लेख आढळून येत नाही केवळ यज्ञ म्हणजेच एका संस्कृती ची मक्तेदारी हा विषय राजकीय सत्तेमध्ये पाहायला मिळत नाही. सम्राट अशोक यांच्या नंतर अनेक राजांनी यज्ञ केले आहेत. सम्राट अशोक यांनी धार्मिक यज्ञात बळी देणाऱ्या गोष्टीवर बंदी घातली होती तसेच विनाकारण प्राण्याची हत्या केवळ लोकांच्या हौस मौज करण्यासाठी होती त्यावर सम्राट अशोक यांनी बंदी घातली होती आणि सुरुवात स्वतःपासून केली होती.
आपले राजकीय ताकद वाढवण्यासाठी सातवाहन यांनी देखील यज्ञ केलेले आपणास पाहायला मिळते. सातवाहन यांनी दोन अश्वमेध यज्ञ केले आहेत, म्हणजे सातवाहन यांना दोन वेळा परकीय शक्तींनी आवाहन दिले आहे हे या शिलालेखातून स्पष्ट होते. तसेच वाजपेय यज्ञ हा विजय मिळवल्यावर केला जातो तो हि इथे केल्याचा उल्लेख आहे. एकूणच सातवाहन यांचे राजकीय शक्ती चे दर्शन करणारा हा पुरावा आहे. सातवाहन यांनी केलेले हे यज्ञ नेमके कुठे केले हा प्रश्न निश्चित च समोर येतो आता यज्ञ करण्यासाठी कोणती जागा उपलब्ध होती त्यावेळी ह्याचे संशोधन करणे आवश्यक आहे. सर्वच यज्ञ जुन्नर मध्ये केले आहेत का ? हा प्रश्न देखील संशोधन करताना समोर येतो. आता महत्वाचे म्हणजे जुन्नर हि त्यावेळी मोठी व्यापारी बाजारपेठ होती शिवाय जुन्नर शहराला पाच नद्यांनी वेढलेले आहे आणि व्यापारी वर्ग मोठा असल्याने इथे व्यापार्यांचे देखील मोठे योगदान असल्याचे दिसून येते.
नाणेघाट येथील शिलालेखातून सातवाहन यांना आपले साम्राज्य उभे करण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे हे यातून सिद्ध होते. या लेखातून आपणास एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे सातवाहन यांच्या राजकीय कारकीर्द मध्ये सातवाहन यांनी कोणत्या हि संप्रदायाचा अनादर केलेला नाही. नाणेघाट येथील सातवाहन यांचा यज्ञाचा उल्लेख सोडता सातवाहन यांच्या सर्वच लेखात बौद्ध लेण्यांचा आणि बौद्ध धर्माचे दान लेख आपणास पाहायला मिळतात.
नाणेघाट येथील हा दगडी रांजण हा सातवाहन काळातील आर्थिक भरभराटीचे दर्शन घडवून आणतो. हा दगडी रांजण म्हणजे जकात देण्यासाठी ठेवण्यात आलेला एक शासकीय वास्तू होय. या दगडी रांजणात आपला कर जमा करून व्यापाऱ्यांनी पुढे जावे असे कदाचित त्यावेळी जकात देण्याची अशी पद्धत असावी. नाणेघाटाला लाकडी बांधकाम देखील असावे कारण जकात नाका म्हणून जर याची नोंद असेल तर तिथे आपणास जकात नका असल्याचे अवशेष हि असणे नाकारता येत नाही. दगडी रांजण साधारण पाच मीटर एवढे आहे. शिवाय हे दोन भागात असून ते एकमेकाला जोडलेले आहेत.

नाणेघाट मध्ये अजून दोन शिलालेखांचे नोंद पाण्याच्या टाक्यावर कोरलेले आपणास पाहायला मिळतात. प्रथम लेणी च्या जवळ च्या पाण्याच्या टाक्यावर असलेला शिलालेख यामध्ये सोपारा येथील गोविंद दास यांनी पाण्याच्या टाक्याचे धम्म दान दिल्याचे उल्लेख तेथील शिलालेखात लिहिलेला आहे.
त्यानंतर अगदी कल्याण हून येणाऱ्या मार्गात सुरुवातीला असलेले एक पाण्याचे टाके बहुताश अभ्यासकांसाठी अनभिज्ञ असलेला हा शिलालेख भगवानलाल इंद्र जी यांनी उल्लेख केला आहे. स्कंद सातकर्णी यांचा शिलालेख पाण्याच्या टाक्यावर असून स्कंद सातकर्णी याची नाणी हि वाटेगाव येथील नानक संचात तसेच तऱ्हाला येथील नानक संचात आढळून आली आहेत. या लेखात स्कंद सातकर्णी याच्या राज्य वर्ष १३ हेमंत पक्ष ५ आणि दिवस १० वा या काळात हे पाण्याचे टाके दान दिलेले आहे. स्कंद सातकर्णी याच्या बद्दल अनेक ठिकाणी फारसी माहिती उपलब्ध नव्हती हा शिलालेख त्याचे राज्य वर्ष आणि कालखंड दाखवून देतात त्यामुळे त्याचे राज्य वर्ष लक्षात येते.

निष्कर्ष : महाराष्ट्राच्या इतिहासातील हे अनमोल आणि महत्वाचे पुरावे आहेत. नाणेघाट येथील शिलालेखाच्या वाचनातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे सातवाहन ह्यांनी केलेले यज्ञ हे राजकीय शक्ती वाढवण्यासाठी होते धार्मिक नव्हते. शोभना गोखले , मिराशी, मोरवंचीकर , जोशी , अश्या अनेक अभ्यासकांनी जे यांना वैदिक धर्माशी जोडले आहे आणि सातवाहन हे वैदिक होते असा जो निष्कर्ष काढला आहे त्यात आपण पूर्णपणे निरीक्षण नोंदवले तर नाणेघाट येथील शिलालेख सोडल्यास सातवाहनांच्या कोणत्याच शिलालेखात ते वैदिक संस्कृती ला पुढे आणण्यासाठी कार्य करत आहेत असा उल्लेख नाही. सातवाहन यांचे अधिक तर सर्वच शिलालेख च हे बौद्ध लेण्यात सापडतात कोणत्या हि वैदिक स्थापत्य मध्ये सापडत नाहीत. सातवाहन यांनी बौद्ध धर्मासाठी अनेक धम्म दान दिल्याचे उल्लेख सापडतात आणि त्यामुळे सातवाहन आणि बौद्ध लेणी हे एक समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळते तर भारतात दक्षिण भारत ते उत्तर भारत दोन्ही भागात बांधलेल्या बुद्ध स्तुपावर सातवाहन यांचे मोठे योगदान आपणास पाहायला मिळते. सातवाहन राजांच्या कोणत्याच राजाने वैदिकांच्या एका हि देवतेची शिल्प कोरलेली नाहीत किंवा त्यांचा इतिहास हि कोरलेला नाही परंतु सातवाहन यांनी बौद्ध स्तुपावर बुद्धाच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास कोरलेला आहे. सांची येथील स्तूप असेल भाहरुत येथील बुद्ध स्तूप असेल अमरावती येथील बुद्ध स्तूप असेल कणगणहल्ली बुद्ध स्तूप येथील शिल्प पाहताना एक गोष्ट लक्षात येते कि सातवाहन जर वैदिक होते तर बुद्ध इतिहास कोरून का ठेवतील हा प्रश्न निर्माण होतो.
नाणेघाट येथील एका शिलालेखाचे अर्थ आपल्या पद्धतीने घेवून सातवाहन यांना वैदिक करून धार्मिक ओळख निर्माण करण्याचा हा या अभ्यासकांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे दिसून येते. नाणेघाट येथील शिलालेखाच्या माध्यामातून एक गोष्ट स्पष्ट होते कि सातवाहन सम्राट सिरी सातकर्णी आणि नागनिका यांच्या शिवाय इतर कोणत्या हि शासकाने यज्ञ केलेले दिसत नाहीत त्यामुळे पुढे इतिहास हाच आहे कि सत्ता मजबूत स्थितीत असल्याने त्यांना कोणते हि आवाहन मिळाले नाही शिवाय गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या काळात त्याने क्षत्रप यांचा पराभव केला आहे पण त्याने कोणते हि यज्ञ केले नव्हते. यावरून स्पष्ट आहे कि सातवाहन हा वैदिक असल्याचे कोणते हि प्रमाण नाहीत. उलटपक्षी सातवाहन ह्यांनी बौद्ध धर्माचा इतिहास शिल्पामधून कोरलेला आपणास पाहायला मिळतो. यातून काय सिद्ध होते सातवाहन यांनी जर वैदिक मंदिरे किंवा एखादे वैदिक स्थापत्य स्वतःच्या काळात का बरे निर्माण केले नाही जर ते वैदिक असते तर निश्चित केले असते जसे राष्ट्रकुट यांनी हिंदू शिल्प कोरली शिलाहार यांनी जैन शिल्प कोरली चालुक्य यांनी हिंदू जैन बौद्ध शिल्प कोरली त्यामुळे सरळ आहे सातवाहन हा बौद्ध संस्कृतीचा एक मोठा राज्यकर्ता म्हणून च त्याच्याकडे पाहिले जाते.
इतिहास आणि पुरावे याच्या आधारावर सातवाहन हे वैदिक नसून बौद्ध असल्याचे सिद्ध होते त्यामुळे त्यांच्या कोणत्याही यज्ञात बळी प्रथा पाहायला मिळत नाही किंवा यज्ञात कोणत्या हि गोष्टीची आहुती दिलेली नाही हे देखील दिसते यज्ञान दान देण्याची पद्धत पाहताना एक गोष्ट सरळ आहे दान देण्याची सुरुवात च मुळात बौद्ध संस्कृतीत पाहायला मिळते अगदी बुद्ध काळात बिम्बिसार याचे वेळूवन दान असेल अनाथपिंडीक याचे जेतवन दान असेल शिवाय विशाखाचे पुब्बाराम विहार असेल अशी अनेक उदाहरणे बुद्ध काळात तर नंतर च्या काळात सम्राट अशोकापासून ते अगदी पाल राजांपर्यंत बौद्ध धम्मासाठी मोठ्या प्रमाणावर दान देण्यात आले आहेत आणि त्याचे लिखित पुरावे आहेत. नाणेघाटाच्या शिलालेखाचे विश्लेषण करताना हा महत्वाचा विषय निकाली निघतो.
संदर्भ :
Indian Palaeography, Calcutta 1959 , G. Buhler.
Archeology Survey Of Western India Vol. 5 , G Buhler.
Asiatic Researches Vol no 41 , Willems Sykes
Satvahan and western Kshatrapas , V. V. Mirashi
The Satavahanas and the western kshatrapas : A historical Framework : Ajaymitra shatri
Maharashtra State Gazetteer : itihas prachin kal khand 1
Purabhilekh Vidya : Shobhana Gokhale

ABCPR TEAM
Naneghat Article Research by Dhammasiri Institute of Dhammasiri Foundation