Our Mission

१} प्राचीन बौद्ध लेणी संवर्धन & संशोधन समूह हि देशातील बौद्ध लेण्यांचा शोध घेणे , त्याअनुषंगाने विचारविनिमय करणे, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे व सदस्यांना आपआपसात संवाद साधण्याची सुविधा पुरवणे.

२} जनमानसात बौद्ध लेण्या हा आपला ऐतिहासिक वारसा आहे व तो जतन केला पाहिजे हि भावना रुजण्यास मदत करणे.

३} ह्या देशातील बौद्ध लेणी हि आपल्या देशाची ऐतिहासिक वास्तू असून हा देश बौद्धमय असल्याचे सक्षम पुरावे आहेत व या बौद्ध लेण्यांचे रक्षण करणे व त्यांचे जतन करणे ; सर्व बौद्ध बांधवांना भारतीय लेण्याबाबत जागृत करणे

४}भारतात असणारी बौद्ध लेणी हि जागतिक दर्जाची स्मारक असून हजारो वर्षाची बौध्दांची प्रार्थनास्थळ आहेत हजारो वर्षांपूर्वी ची परंपरा पुन्हा जिवंत करावे हि भावना रुजवण्याचे काम करणे.

५}संविधानाचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे

६} भारतातील बुद्ध लेण्यांचे अस्तित्व टिकवणे व त्यांचे संरक्षण करणे .

७}आपसात मैत्रीभावना जोपासणे व बौद्ध बांधवांचे हित जोपासण्यास सहकार्य करणे

८}वने , सरोवरे , नद्या व अन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गीक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणिमात्रांबाबत दयाबुद्धी बाळगणे.

९}विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन , मानवतावाद , आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे .

१०} सर्व लहान थोर लोकांना महिन्यातून एकदा बौद्ध लेण्यांवर घेऊन येणे व त्यांच्यामध्ये बौद्ध लेण्यांबाबत ची अस्मिता जागृत करणे

११} बौद्ध लेण्यांवर बौद्ध धम्म परिषद आयोजित करणे

१२} बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी सरकार कडे पाठपुरावा करणे \

१३} अपरिचित दुर्लक्षित लेण्या आपल्या ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करणे व प्रकाशित करून त्याची नोंद सरकार कडे करणे

१४}बौद्ध धम्माचे सण उत्सव लेण्यांवर साजरे करावेत व हजारो वर्षाची परंपंरा जिवंत करणे

१५}बौद्ध लेण्यांची ऐतिहासिक माहिती जमा करणे ,असुरक्षित लेण्या सुरक्षित करणे, बौद्ध लेणी म्हणून फलक लावणे ,शिलालेखांचे बोलीभाषेत फलक लावणे, इतिहासाचे बोर्ड लावणे व लेण्यांवर दर पौर्णिमा अमावास्येला बुद्ध वंदना घेण्यासाठी लोंकाना प्रवृत्त करणे .

ह्या उद्देशपुर्तीसाठी हा बौद्ध लेणी संवर्धन & संशोधन समितीचा मंच निर्माण केला गेला आहे त्याची कार्यपध्दती, वापर व वावर या संबधातील धोरणे व नियमावली अशी ;

धोरणे :

१}बौद्ध लेण्यांचे परिचित दुर्लक्षित व अतिक्रमण केलेल्या लेण्या अश्या पद्धतीचे लेण्यांचे वर्गीकरण करणे .

२} परिचित लेण्यांना योग्य सुविधा आहेत कि नाही याची माहिती घेऊन चुकीच्या गोष्टीवर सरकार ला जाब विचारणे

३} परिचित लेण्यांवर गैरकृत्य व चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई साठी

४} परिचित लेण्यांवर उद्धिष्टानुसार धम्म परिषद सहलीचे आयोजन करणे

५] दुर्लक्षित लेण्याची ऐतिहासिक माहिती जमा करणे व पुरातत्व विभागाकडे अर्ज दाखल करणे

६} दुर्लक्षित लेण्या वर उद्धिष्टानुसार बौद्ध लेण्यांचे फलक लावणे दिशा दर्शक खुणा करणे इत्यादी .

७} लेण्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण भागातील बांधवांची भेट घेऊन त्यांना त्याविषयी जागृत करणे .

८} अतिक्रमण झालेल्या लेण्यांची माहिती घेऊन त्याचा ऐतिहासिक माहिती जमा करून त्यांची पुरातत्व विभागाकडे तक्रार करणे

९} अतिक्रमण केलेल्या लेण्यांबाबत कोर्टात जनहित याचिका दाखल करणे , अतिक्रमण झालेल्या लेण्यांवर सरकार चे दुर्लक्ष का यावर जाब विचारणे

१० } जबाबदार अधिकाऱ्यांच्या काळात झालेल्या अतिक्रमणाबाबत त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणे

११} अतिक्रमण झालेल्या लेण्यांची बौद्ध लेण्या म्हणून माहितीपट सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे.

१२} सदर अतिक्रमण केलेल्या लेण्या बौद्ध लेण्या म्हणून घोषित करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे मागणी करणे

१३} अतिक्रमण झालेल्या लेण्यांवर हजारो बांधवांची धम्म परिषद आयोजित करणे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Open chat