आपली भाषा ,लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार…..

प्रत्येक देशाची ओळख हि त्याच्या इतिहासावर अवलंबून असते हे सत्य आम्ही हि ओळखले पाहिजे. त्यानुसार भारताचा इतिहास हा त्याच्या प्राचीन अवशेष यांच्यावर निर्भर असतो आणि भारताला दैदिप्यमान असा बौद्ध वारसा लाभलेला आहे. संविधान निर्माते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना. विशेष महत्व या प्राचीन स्मारकांना हि दिलेले आपणास पाहायला मिळते. अनुच्छेद ४९ नुसार राष्ट्रीय महत्वाची स्थान स्मारक आणि वस्तू यांचे संरक्षण करणे जे संसदेच्या द्वारे विधी द्वारे तसेच त्याच्या आधीन असणारे आणि घोषित केलेले राष्ट्रीय स्मारक कलात्मक आणि ऐतिहासिक वस्तूंचे रक्षण करण्याचे कायदेशीर तहविज आपणास पाहायला मिळते. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकाला अनुच्छेद २९ नुसार आपली भाषा आपली लिपी आणि आपली संस्कृती जतन करण्याचा जपण्याचा कायदेशीर अधिकार भारतीय संविधानाने देवू केलाय. ह्याच आधारावर भारताच्या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी हि आमची आहे हे आम्ही प्रत्येक बौद्ध बांधवाने समजून घेणे आवश्यक आहे. स्मारकांच्या बाबतीत कायदेशीर तरतुदी आम्ही समजून घेणे आवश्यक आहे तर च आम्हाला ते स्मारक जतन करण्यासाठी काय लागते याची कल्पना येईल. याच संविधांनाच्या तरतुदी नुसार २८ ऑगस्ट १९५८ रोजी प्राचीन संस्मारक, पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष अधिनियम अंमलात आणला गेला या अधिनियमात राष्ट्रीय महत्वाचे प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक व पुरातन स्थळ व अवशेषांचे संरक्षण व संवर्धन करणे, पुरातन उत्खननांचे जतन करणे आणि मूर्ती, नकाशे आणि इतर अशा प्रकारच्या वस्तूंचे संरक्षण व संवर्धना करण्याची तरतूद कलेली आहे त्याच प्रमाणे प्राचीन सस्मारक व पुरातन स्थळ व अवशेष नियम, १९५९ साली तयार करण्यात आले. यामध्ये १९५८ च्या कायद्यामध्ये २०१० साली नवीन बदल करण्यात आले आणि त्यानुसार The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains (Amendment and Validation) Act, २०१० हा कायदा पारित करण्यात आला. ह्या कायद्याच्या नुसार स्मारकाच्या चारी बाजुला १०० मीटर चे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले या परिसरात कोणत्या हि प्रकारचे शासकीय तसेच व्यक्तिगत बांधकाम करता येत नाही किंवा कोणते हि खोदकाम करता येत नाही तसेच १०० मीटर च्या पुढे २०० मीटर चा परिसर हा नियमन परिसर म्हणून घोषित असतो इथे कोणते हि बांधकाम व्यक्तिगत अथवा शासकीय तसेच कोणते हि खोदकाम करण्यासाठी परवानगी ची आवश्यकता असते. या एकूण ३०० मीटर मध्ये कोणते बांधकाम तसेच खोदकाम केल्यास अथवा स्मारकाची हानी केल्यास AMASR (Amendment and Validation) Act, २०१० कलम ३० या कायद्यानुसार दोन वर्षाची जेल आणि एक लाख रुपायचा दंड भरावा लागतो. भारताच्या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या कोणत्या हि स्मारकाचे जर AMASR (Amendment and Validation) Act, २०१० कलम २९ ब नुसार उत्खनन पूर्ण झाले नसेल तर ३०० मीटर चा प्रदेश पूर्णपणे संरक्षित केला जातो. यामध्ये कोणते हि बांधकाम करता येत नाही. भारताच्या संविधानाने दिलेल्या ह्या ऐतिहासिक स्मारकाचे जतन करण्याचे महत्वपूर्ण काम आम्हा भारतीय बौद्ध जनतेने तरी समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४९ नुसार भारतीय स्मारकाचे जतन करण्याचे काम राज्य शासनाचे असते प्रत्येक स्मारकांचा सातबारा तयार करण्याचे काम करणे तसेच प्रतिबंधक क्षेत्र आणि नियमन क्षेत्र घोषित करून स्मारकाचे संवर्धन करण्याचे काम केले जावे. AMASR (Amendment and Validation) Act, २०१० मध्ये २०१७ मध्ये पुन्हा संशोधन करण्यात आले आणि त्यामध्ये १०० मीटर या प्रतिबंधित क्षेत्रात हि शासकीय कामांसाठी बांधकाम करण्याची परवानगी देण्याचे संशोधन करण्यात आले आहे. भारतीय संविधान अनुच्छेद २९ नुसार आणि AMASR (Amendment and Validation) Act, २०१० नुसार भारतीय स्मारकाचे जतन करण्याचे काम प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे अधिकार हे भारतीय नागरिकांना आहे. AMASR (Amendment and Validation) Act, २०१० कलम १६ (२) नुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जेथे भारत सरकारने प्राचीन स्मारक संरक्षित केले आहे किंवा कलम 13 अंतर्गत स्मारक किंवा महासंचालक, भारतीय पुरातात्विक सर्वेक्षण, भारत सरकार यानी खरेदी केली आहे त्याचा कोणताही भाग कोणत्याही समुदाया द्वारे धार्मिक पूजे साठी वापरला जात असेल, तेव्हा ह्या कलमा अंतर्गत जिल्हाधिकारी “त्या धार्मिक समुदायाची समिति” बनवून प्रदूषण किंवा विद्रुपन होण्या पासून स्मारकाचे संरक्षण करेल. अश्या प्रकारची तरतूद हि या कायद्यात केलेली आहे.

भारताच्या संविधानाने घालून दिलेल्या कायद्यानुसार हे पुरात्तव कायदे भारताचा वारसा जतन करण्यासाठी महत्वाचे आहेत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील स्मारकांचा इतिहास ओळखून बौद्ध स्मारकांची भेट देखील घेतेलेली आहे महत्वाच्या ऐतिहासिक बुद्ध लेण्या पाहून घेतल्या आहेत. बुद्ध स्तूप देखील पाहिले आहेत भेट दिलेल्या आहेत. महामानवाला हा दैदिप्यमान वारसा खूप च भावलेला आपणास पाहायला मिळतो. २५ डिसेंबर १९५४ साली देहूरोड येथील भाषणात बाबासाहेब हा बौद्ध संस्कृतीचा वारसा जतन झाला पाहिजे म्हणून सांगतात भारताच्या बौद्ध वारसा जतन करण्यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवाने पुढे आले पाहिजे आपली भाषा आणि आपली लिपी जतन करण्याचा आपला अधिकार आपण समजून घेणे आवश्यक आहे. धम्मलिपी सिक्खन रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात धम्मसिरी च्या माध्यमातून आपली भाषा आणि आपली लिपी आणि आपली संस्कृती जतन करण्यासाठी ABCPR टीम कटिबद्ध आहे त्याच बरोबर आपल्या समाज बांधवाना आपला इतिहास सांगताना आपल्या पिढीचे भविष्य कसे घडवता येईल हे सांगण्याचे काम हि केले जात आहे. बौद्ध बांधवांमध्ये धम्म रुजला पाहिजे आचरणात आला पाहिजे म्हणून धम्म अध्ययन तसेच रिसर्च सेंटर निर्माण करून कृतीशील पणे एक पिढी घडवण्याचे काम करत आहोत आज भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने बौद्ध वारसा जतन करण्यासाठी काय तरतुदी आहेत आणि आपले कोणते अधिकार आहेत हे समजून घेण्याचे काम करू या चला तर एक पाउल पुढे टाकू या

ABCPR TEAM

धम्मसिरि एक पाउल धाडसाचे बौद्ध वारसा जपण्याचे

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply