सुमुद्र घोडा महाभोजांचे राज चिन्ह

प्राचीन कुडा बुद्ध लेणी येथील महत्वाचा इतिहास पाषाणात बंदिस्त केलेला पाहायला मिळतो.
महाभोज हे सातवाहन साम्राज्यातील भुक्ती या प्रदेशाचे अधिकारी. सातवाहन राजांच्या अधिपत्याखाली किंवा महाक्षत्रपांच्या अधिपत्याखाली यांचे अधिकारी पद असलेले आपणास पाहायला मिळते. महाभोज हे नाव सर्रास महाराष्ट्राच्या बंदरांच्या ठिकाणी असणाऱ्या लेणी किंबा बंदराजवळ सापडणाऱ्या ऐतिहासिक ठिकाणी सापडतात.
कुडा येथील शिलालेखात आपणास महाभोज साडकर आणि महाभोज कोछीपुत्र यामध्ये अजून संसोधानात्म्क बाबींचा उल्लेख केल्यास एक गोष्ट लक्षात येईल कि महाभोजांच्या नावाचे अनेक नाणी आपणास या महाराष्ट्रात सापडतात अनेक नाणे तज्ञांनी यावर संशोधन केलेले आहे. महाभोज यांच्या नाण्याची एक झलक पाहू या

महाभोज वाशिष्टीपुत्र सिवम याचे नाणे

या नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला

या नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला hippocampus देखील म्हणतात आणि समुद्र sea horse देखील म्हणतात hippocampus

या नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला hippocampus देखील म्हणतात आणि समुद्र sea horse देखील म्हणतात hippocampus

या नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला hippocampus देखील म्हणतात आणि समुद्र sea horse देखील म्हणतात hippocampus mythology म्हणून एक प्रसिद्ध कथा देखील आहेत तर sea horse हे समुद्रातील एक जीव आहे जो जो जलदगतीने प्रजजन करू शकतो जवळपास १५०० अंडी घालण्याची क्षमता त्याच्याकडे असते असा महत्वाचा जीव देखील आहे. सातवाहन साम्राज्यात महाभोज यांना स्वतःची नाणी निर्माण करण्याचे अधिकार असल्याचे आपणास पाहायला मिळते जसे अशोक काळात सातवाहन यांना नाणी पडण्याचे अधिकार होते सम्राट कनिष्क काळात महाक्षत्रप हे नाणी निर्माण करत होते अश्याच पद्धतीने सातवाहन काळात महाभोज हे नाणी वापरत असत परंतु सम्राट अशोकाने सुरु केलेल्या उज्जैनी सिम्बॉल हा सर्वच भारतात प्रत्येकाच्या नाण्यावर आपणास पाहायला मिळतो.

कुडा बुद्ध लेणी हि महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाची लेणी असून या ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक गोष्टी उलगडण्यास सुरुवात होते. महाराष्ट्राचा ज्ञात राजवंश सातवाहन यांचे अधिकारी वर्गातील महाभोज आणि त्यांच्या अधिकारी लेखक उपजीवीन अश्या उपाध्य राजमंत्री त्याशिवाय या लेणी मध्ये माळी व्यापारी श्रेणी तील लोक लोहार व्यापारी श्रेणी तील लोक अश्या शाक्य वंशीय भिक्खू वर्गाची नावे तसेच अनेक भिखू आणि भिक्खू यांची नावे तसेच सार्थ वाहक व्यापारी श्रेणीच्या लोकांचा महत्वाचा उल्लेख या कुडा लेणी मध्ये सापडतो. अश्या महत्वाच्या लेण्यात व्यापारी बंदरामध्ये अधिकारी असणारा महाभोज हे राजपद सातवाहन राज्य शासनात असल्याचे आपणास पाहायला मिळते. महाभोज हा अधिकारी वर्गावर सर्वप्रथम आपल्याला मातृसत्ताक पद्धत पाहायला मिळते ते महाभोजी साडगेरी विजया या नावाने शिलालेखांची सुरुवात प[पाहायला मिळते शिवाय या लेणी मध्ये दान देण्यासाठी अनेक महिला वर्गाची नावे देखील या लेणी मध्ये पाहायला मिळतात.

सातवाहनांचे अधिकारी महाभोज यांचे राज चिन्ह म्हणून समुद्री घोडा याचे चिन्ह वापरले गेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे समुद्र घोडा मध्ये आपणास शीर हे घोड्याचे आणि बाकी माश्याचे धड अश्या पद्धतीने रचना असते याचा अर्थ स्पष्ट असतो कि समुद्र व भूमी वर आधिपत्य असणे. अनेक राजांच्या राज चिन्ह आपणास पाहायला मिळतात सातवाहन यांच्या नाण्यावर हत्ती सिंह अश्या प्राण्यांची चिन्ह पाहायला मिळतात तर महाभोज यांच्या राजचिन्हाचा पुरावा ऐतिहासिक कुडा लेणी वर पाहायला मिळतो.

कुडा लेणी मधील लेणी क्रमांक ११ मध्ये आडव्या तुटलेल्या भिंती वर हे चिन्हांकित शिलालेल्ख पाहायला मिळतो शिलालेखाच्या सुरुवातीला समुद्र घोडा याचे चिन्ह असून त्यापुढे महाभोज लिहिलेले आहे त्यापुढे आलेला ब या शब्दावरून त्याचा पूर्ण शब्द हा बालिकाय असा असावा अश्या पद्धतीने निष्कर्ष निघतो. त्याच्या खालच्या लाईन मध्ये मंदविय हा शब्द प्रयोग आल्याने लेणी क्रमांक १ व सहा मधील शिलालेखानुसार महाभोज मांडव खंदपालीत याच्याच कुळातील हा महाभोज असून त्यांच्या मुलीने हे धम्म दान दिल्याचा उल्लेख आहे. याच्या पुढच्या लेणी क्रमांक १३ मध्ये असणारा शिलालेख महाभोज साडकर सुदस्सन याची मुलगी विजयनिका हिने धम्म दान दिल्याचा उल्लेख आहे तर लेणी क्रमांक १ व ६ मध्ये महाभोजी साडगेरी विजया हिचा उल्लेख पाहता हा हि एक कुळातील असावी असा निष्कर्ष निघतो. यामध्ये जे मांदाड नावाचे व्यापारी बंदर आहे या बंदरावर आधिपत्य असणारा महाभोज ज्यामध्ये साडकर मांडव आणि कोछिपुत्र वेलीदत्त यांचा उल्लेख प्रामुख्याने येतो या मधील हि लेणी क्रमांक ११ मधील हा शिलालेख महाभोजांच्या इतिहासाचे दाखले आपणास देतात. तर चौल बंदराच्या ठिकाणी वशिष्टीपुत्र शिवम याचे नाणे देखील सापडल्याचे निदर्शनास येते.
यावरून एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे महाभोजांच्या शासनाचा एक भाग इथे आपल्या दृष्टीस पडतो.

समुद्र घोड्याचे कोणते हि शिल्प कुडा लेणी मध्ये आपणास सपडत नाही परंतु शिलालेखात समुद्र घोड्याचे राजचिन्ह मात्र पाहायला मिळते. हे महाभोज यांचे अधिकृत असल्याचे स्पष्ट शिलालेखात पाहायला मिळते अश्या पद्धतीचे चिन्ह इतर कोणत्या ठिकाणी आपणास [पाहायला मिळत नाही.
या दृष्टीकोनातून कुडा लेणी चे ऐतिहासिक वैभव निर्माण का झाले याचे उत्तम उदाहरण म्हणजे इथला अधिकारी महाभोज महाभोज हे व्यापारी बंदरावरील अधिपती असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न निर्माण होत होते आणि बौद्ध धम्माच्या शिकवणी नुसार गरजेपेक्षा जास्त संपत्ती दान पारमिता पूर्ण करण्यासाठी दानाच्या स्वरुपात भिक्खू संघाला दिली जात असे. ज्यामुळे हे सुमुद्री घोड्याचे चिन्ह स्पष्ट कल्पना देते कि महाभोज हे जमीन तथा समुद्रात हि आधिपत्य असणारे प्रशासकीय अधिकारी असल्याचे निदर्शनास येते

या महत्वाच्या संशोधन कामामध्ये कुडा बुद्ध लेणी या अप्रकाशित पुस्तकाचे सहाय्य मिळाले लवकर च पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे एक निदर्शनास आले कि कुडा लेणी मध्ये समुद्र घोडा हे शिल्प आहे असे अभ्यासकांनी मांडून जो गोंधळ निर्माण केला होता ते शिल्प नसून चिन्ह आहे हे संशोधनात्मक दृष्टीने आपल्या समोर ठेवत आहे.

लेणी संवर्धक : प्रशांत माळी

Team ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

This Post Has One Comment

 1. Shamrao Haridwar Somkuwar

  Great evolution in the field of satwahan dynasty

Leave a Reply