धम्मसिरी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन धम्मलिपी मध्ये मोठे यश..

धम्मसिरि इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून घेण्यात येणारी धम्मलिपी ची परीक्षा हि दर तीन महिन्यांनी डिप्लोमा इन धम्मलिपी हा कोर्स पूर्ण करण्यात येतो. यामध्ये बसलेले अनेक विद्यार्थी हि परीक्षा देतात व उत्तीर्ण होतात. सप्टेंबर २०२१ महिन्यात घेण्यात आलेली डिप्लोमा इन धम्मलिपी ह्या कोर्स ची मास्टर ऑफ धम्मलिपी हि फायनल परीक्षा झाली आणि या परीक्षेत बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.

धम्मलिपी शिकवण्याचा प्रवास सुरु झाला तेव्हा डिजिटल मध्यम उपलब्ध नव्हते आज धम्मलिपी च्या परीक्षेचे निकाल डिजिटल पणे लावण्यात आले. अनेक लोकांना शाळेतून शिक्षण पूर्ण झाल्यावर हि काही तरी नवीन शिकता यावे व विद्यार्थी जीवन जगता यावे म्हणून धम्मसिरी इन्स्टिट्यूट हे प्रत्येक वयातील लोकांना विद्यार्थी होता येवू शकते याचे आश्वासन धम्मसिरी इन्स्टिट्यूट देते. आणि धम्मलिपी असेल पाली भाषा असेल हे शिकण्यासाठी कोणते हि शिक्षणाचे बंधन नाही आणि वयाचे हि बंधन नाही प्रत्येक नागरिकाला आपला इतिहास समजला पाहिजे यासाठी धम्मसिरी इन्स्टिट्यूट काम करतेय आणि त्याचाच आज हा रिझल्ट आहे.

धम्मसिरी मध्ये डिप्लोमा इन धम्मलिपी या कोर्स मध्ये शेवटची फायनल परीक्षा देत हा कोर्स पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यापैकी पहिले दहा क्रमांक यांचे गुणपत्रक त्यांच्या नावानुसार पुढील प्रमाणे


Asha Mane

ASHA-MANE


Sushama Wankhade

Sushama-Wankhade


Varsha Bansod

varsha-bansod


Ashwini Gaikwad

ashwini-Gaikwad


Karuna Sable

KARUNA-SABLE


Gajanan Turukamane

GAJANAN-TURUKAMANE


Seema Bansod

SEEMA-BANSOD


Aruna Waghmare

ARUNA-WAGHMARE


Ashok Ingole

ASHOK-INGOLE


Vandana Sadke

VANDANA-SADKE

धम्मलिपी च्या या प्रवासात गेली अनेक दिवस धम्मलिपी चे प्रशिक्षण घेत आपले शिक्षण पूर्ण करून धम्मलिपी शिकून आपला इतिहास आता स्वतः वाचण्यास तयार झाले आहेत. हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे कि धम्मलिपी मध्ये अनेक लोक चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत याचा.
लवकर च पुढील वर्ग सुरु होत आहे त्यासाठी देखील आपण आपले नाव नोंदवू शकता.

Diploma In Dhammalipi

तीन महिन्यांचा धम्मलिपी चा एकमेव कोर्स जिथे आपणास धम्मलिपी चे संपूर्ण माहिती दिली जाते. सम्राट अशोक काळापासून अगदी सातवाहन यांच्या काळातील सर्व शिलालेख सोडवून घेतले जातात व शिकवले जातात. आपल्या बोलीभाषेत धम्मलिपी शिकण्याचे व सोप्या पद्धतीने समजून घेण्याची पद्धत .
धम्मसिरी इन्स्टिट्यूट केंद्र शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थे तर्फे आपणास हे सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून देत आहोत.
कोर्स साठी रजिस्टर कोर्स वर जावून तीन महिन्यासाठी १५०० रुपये परीक्षा शुल्क भरून आपण आपले नाव आजच नोंद करू शकता १ ऑक्टोबर २०२१ पासुन नवीन वर्ग सुरु होणार आहे.
धन्यवाद
संचालक मंडळ
धम्मसिरी इन्स्टिट्यूट

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

9 thoughts on “धम्मसिरी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन धम्मलिपी मध्ये मोठे यश..”

 1. Kedarnath H. Patil

  धम्मसीरी इन्स्टिट्यूट द्वारा घेतल्या गेलेल्या “मास्टर ऑफ धम्मलिपी ” परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विदयार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन 🌹
  तसेच ABCPR टीम यांनी दैनंदिन जीवनात वेळातवेळ काढून धम्मलिपी शिकविण्याचा जो वसा घेतला आहे to नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.
  धम्मलिपी चे गुरुजी आयु. रवींद्र जाधव सर यांच्या अभ्यासपूर्ण माहितीने, त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीने विषयात गोडी निर्माण झाली व त्याची प्रचिती निकालातून दिसतेय.या ठिकाणी विशेष उल्लेख करावा असे महादासा सर , गमरे सर यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी घावघवीत यश सम्पदान केले.
  ABCPR टीमचे अज्ञात असलेले सर्वाना मनपूर्वक धन्यवाद!

 2. Varsha Hemant Bansod

  धम्मसिरी इन्स्टिटयूट टीमचे सर्व संचालक मंडळ, आयु रवींद्र सावंत सर, आयु जाधव सर या सर्वांनी मास्टर ऑफ धम्मलिपी चे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏सरांनी वेळोवेळी धम्मलिपी चे बारकावे सांगितले धमलिपी कशा पद्धतीने लिहावी तिचे भाषांतर करते वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, प्रत्येकवेळी समजण्यासाठी प्रत्येक लेण्याचे व्हिडीओ पाठवत राहिले त्यामुळे अजून चांगल्या प्रकारे धम्मलिपी समजून येत होती, इतक्या सहजतेने सोप्या भाषेत आम्हांला शिकविले. त्यामुळे च धम्मलिपी चा चांगल्या प्रकारे सराव होऊन आम्ही ही परीक्षा चांगल्या पद्धतीने सोडवू शकलो. प्रत्येकवेळी सराव करतेवेळी माझी 6 वर्षांची मुलगी तिला पण या लिपी बद्दल खूप नवल वाटले आणि म्हणायची मला पण तुझ्या सारखे लिहायचे आहे आणि ती खरंच एका पानावर धम्मलिपी लिहून काढायची, तिला पण धम्मलिपी चे इतक्या लहान वयात आवड पाहून मला कवतुक वाटले.खरंच धम्मलिपी खूप महान आहे त्यामुळेच सम्राट अशोक यांनी बुद्धानचे उपदेश या धम्मलिपी मध्ये लिहून ठेवले. प्रत्येकाने ही लिपी शिकून घ्यावी आणि आपला बुद्धानं चा वारसा पुढे चालत राहील.या मास्टर ऑफ धम्मलीप 2021या परीक्षे मध्ये पास झालेले सर्वांचे मनापासून अभिनंदन तसेच परत एकदा धम्मसिरी टीमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  आपली विद्यार्थीनि
  वर्षा बनसोड

 3. Amarpali sainaji khillare (turukamane)

  नमो बुद्धाय…. सर्वांना सप्रेम जयभीम….. मला हे जे यश मिळाले त्यात सर्वात महत्त्वाचे योगदान ABCPR टीम चे आहे….. तसेच आम्हाला शिकवणारे रवींद्र सावंत सर,मुकेश जाधव सर तसेच भांबरे सर याचे आहे त्यांना शिलालेख पाठवल्यावर जेथे चुका मी केल्या तिथे त्यांनी दुरुस्त केल्या।
  Plus पॉईंट ऑफ ABCPER टीम IS… मला माझ्या गतीनुसर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे…. मी स्वतः 2017 मध्ये घेतलेल्या mpsc मर्यादित शिक्षणाधिकारी यांच्या Oral ची तयारी करत होते….. याचा योग्य ताळमेळ घालून मी ही परीक्षा दिली,मला हा कोर्स complete करण्याची संधी सर्व शिक्षकांमुळे मिळाली आहे.माझे पती गजानन तुरूकमाने सर टॉप टेन मध्ये आल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.💐💐💐
  सर्व परीक्षार्थीचे हार्दिक अभिनंदन….. 🙏🏻🙏🏻🙏🏻
  I am proud to be I am master in dhammalipi…..
  Thank you ABCPR team💐💐💐

 4. Sushama Ramdas Wankhade

  आदरणीय गूरूवर्य,
  सर्वप्रथ मी सर्व गुरुजनांचे आभार व्यक्त करते .त्याचबरोबर आम्हाला बुद्ध धम्माच्या इतिहासातील प्राचीन अनमोल ठेवा धम्म लिपीच्या च्या माध्यमातून तुम्ही आम्हाला शिकवलात
  त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर. त्या निमित्ताने आम्हाला अशोक कालीन लिपीचा, त्यावेळच्या इतिहासाचा ,बुद्धकालीन इतिहासाचा भरपूर अभ्यास करायला मिळाला. तीन वर्ष आधी जेव्हा मी दिल्लीला नॅशनल म्युझियम मध्ये गेले होते. तेव्हा मला एक फार मोठी शिळा दिसली त्यावर लिहिले होते सम्राट अशोक कालीन शीला लेख मला तेव्हा आकर्षणाचा केंद्रबिंदू वाटले त्यावरील अक्षर मी वाचायसाठी अधीर झाले होते पण मला ते काही समजतच नव्हते अर्धा तास मी त्या शिलालेखात जवळ उभे होते पण मला काही समजत नव्हते मी पाली विषयाचा बराच अभ्यास केला होता पण अक्षर मात्र मला उमजत नव्हती. ही लिपी मला काही करून शिकायची होती आणि तशी संधी मल ABCPR टिम धम्मलिपि सिक्खन रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत मिळाली. आणि या संधीचा फायदा घेत माझ्याकडून जेवढे ही प्रमाणिक प्रयत्न होतील एवढे मी माझ्या बिझी शेड्युलमधून वेळातला वेळ काढून मी ही धम्म लिपी अतिशय प्रामाणिकपणे आणि मन लावून भरपूर अध्ययन केले. आणि या ही पुढे सतत करतच राहणार आहे . तरी सर्व विद्यार्थ्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चितच यश आपल्याला मिळते. विषय अगदी आपल्या जिव्हाळ्याचा आहे कधीही न संपणारा आहे. आपण धम्मलिपी शिकून इतरांनाही प्रेरित करावे. त्याचबरोबर पाली भाषा देखील शिकावी जेणेकरून आपण आपला प्राचीन वारसा निश्चितच जतन करून ठेवू. खरंच खूप आनंद होत आहे कि या मास्टर ऑफ धम्म लिपी च्या परीक्षेमध्ये मी चांगल्या गुणांनी पास झाले आहे. ते यश केवळ माझे एकटीच नाही तर त्यामागे मेहनत घेणारे ABCPR टीमचे सर्व गुरुवर्य आहेत. आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय जाधव सर आदरणीय रवींद्र सर तसेच या ग्रुपची जुळलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. तसेच 2021 च्या मास्टर ऑफ धम्म लिपी या परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.
  सुषमा वानखडे (पायस)
  अमरावती ….

 5. सर्वांना सप्रेम जय भीम … सर्व धम्म बांधवांचे यश मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐
  माझ्या यशामध्ये सन्माननिय धम्मसिरी इन्स्टिट्यूट चे सर्व शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन करून आम्हा सर्वांना मास्टर ऑफ धम्मलिपीचे ज्ञान दिले तसेच माझ्या यशामध्ये आयु. मुकेश जाधव सर व रविंद्र सावंत सर यांचा मोलाचा वाटा आहे.
  सर मी आपणांस सांगू इच्छितो की मी कायम ABCPR TEAM शी connect राहील .माझ्याकडून शक्य तेवढ्या बांधवाना मी धम्मसिरीच्या कार्याचा प्रचार व प्रसार करीन.🙏🙏🙏

 6. मास्टर ऑफ धम्मलिपी या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे अभिनंदन. एके दिवशी व्हाट्सअप
  वर धम्मा लिपी मूलभूत अभ्यासक्रम शिकण्या बद्दल मेसेज मिळाला आणि मी त्याला प्रतिसाद दिला मला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आणि धम्मलिपी
  शिकण्याचा प्रवास सुरू झाला सुरुवातीला एकेक शब्द शिकवून नंतर बाराखडी व जोडाक्षरे अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकविल्या ने ती आम्हाला पाठ झाली त्यानंतर सातवाहन कालीन लिपी शिकायला मिळाली व वेगवेगळ्या राजाच्या कारकिर्दीत लिपीचे बदलत गेलेले रूप अभ्यासायला मिळाले त्यानंतर अंतर खरा प्रवास सुरु झाला तो लिप्यंतर आणि भाषांतराचा नुसतेच बाराखडी शिकणे म्हणजे धम्म लिपी शिकणे नसून या लिपीचे लिप्यंतर व भाषांतर यायला हवे हे शिकायला मिळालेआयु. रवींद्र सर व आयु.मुकेश सर यांची शिकविण्याची पद्धती वरून त्यांचा या विषयात किती अभ्यास आहे याची प्रचिती आली. झालेल्या चुका मध्ये सुधारणा करण्यास सरांनी मदत केली तसेच लिप्यंतर व भाषांतर यांचे फोटो व्हाट्सअप वर आपला सराव खूप सुंदर अक्षरांमध्ये पाठवून माझ्या सहकारी मित्रांनी सुद्धा अजाणतेपणी का होईना आम्हाला मदत केली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणखी एक सर्वात मोठी मदत म्हणजे माझ्याकडे परीक्षा फीस भरण्यासाठी पैसे नसताना सुद्धा सरांनी मला दोन्ही परीक्षेस बसण्यास परवानगी दिल्याने मला आणखी प्रोत्साहन मिळाले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील व मी सदैव धम्मसिरी संस्थेशी जोडलेला राहील
  तुमचा ही धम्म लिपी शिकण्याचा उद्देश काय? प्रवेश घेताना विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर खरंतर मला आता मिळाले आहे ते म्हणजे लोप पावत चाललेली आपली धम्मालीपी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला शिकवायची आहे व आपला वारसा म्हणजेच लेण्या , स्तूप, चैत्य , विहार याचे आपल्याला संवर्धन करायचे आहे लेण्यांचे होत असलेले विकृतीकरण आपल्याला थांबवायचे आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सांगायचा आहे मिळालेल्या धम्म लिपीच्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला तिचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. मास्टर ऑफ धम्म लिपी हा कोर्स पूर्ण झाल्यानंतरही आम्हाला आठवड्याला का होईना एखादा नवीन शिलालेख अभ्यासण्यासाठी द्यावाअशी मी धम्मासिरी संचालक मंडळाला विनंती करतो. ज्यामुळेआमचे धम्म लिपी सरावाचे कार्य सतत चालू राहील.
  सर्व धम्म बांधवांना पुढील कार्यासाठी मंगलमय मंगल कामना!

 7. आशा तातोबा माने

  🌹🌹🌹🌹🌹जयभिम नमोबुद्धाय🌹🌹🌹🌹🌹
  “धम्मलिपी सिक्खन इन्स्टिट्यूट” चा माझा परिचय देहूरोड येथील पवित्र दिक्षाभूभीत २५ डिसेंबर २०१८ रोजी आयु. प्रवीण जामनिक ,प्रबुद्ध टी वी चॅनेलचे संचालक यांनी दिलेल्या माहीतीमुळे झाला ,त्यांच्यामुळेच धम्मलिपी शिकण्याची संधी मिळाली ,प्रथमत: आयु. जामनिक सरांचे मनापासून आभार👏👏👏
  आता पर्यंत फक्त पाठातील पुस्तकातच लेणी म्हणजे डोंगरात केलेले खोदकाम एवढेच माहीत होते, क्लास सुरू झाल्यानंतर आ.मुकेश जाधव सरांचे लेक्चर ऐकले आणि या लेणी म्हणजे आपल्या बौद्ध संस्कृतीचा खरा वारसा जो काळाच्या, अज्ञानाच्या ओघात आपल्या पर्यंत कधी पोहचलाच नाही , विलुप्त होत चाललेली ही प्राचीन प्राकृत -पाली भाषेची धम्मलिपी , विविध प्राकृतिक डोगंर ,कड्याकपारीत शिलालेखांवर ,स्तंभांवर कोरून ठेवलेली माहीती ,कोणी व का लिहली , अशी उत्सुकता पूर्ण माहीती सरांनी दिली व आमच्या धम्मलिपीच्या अक्षर ओळख व लेखनास सुरूवात झाली .आ. मुकेश जाधव सरांनी अक्षरश: लहान विद्यार्थांना समजावून सांगतात तसे सर्व वयोगटातील , विविध स्तरातील, विविध ठिकाणी राहणारे ,पण धम्मलिपी शिकण्याचे ध्येय असलेल्या आम्हां विद्यार्थांना स्वरांतील अ….अ: ,व्यंजन. क….ज्ञ. पर्यत सर्व व्यजंने व. बाराखडी ,अंकलेखन धम्मलिपीतील अशोककालीन व सातवाहनकालीन अशा दोन्ही पद्धतीत अतिशय सोप्या पद्धतीने. शिकवले व आमचा धम्मलिपीचा. अक्षर लेखनाचा पाया पक्का केला, सरांच्या अमुल्य मार्गदर्शनामुळेच बेसिक परीक्षेत २०० पैकी२०० मार्क मिळवून प्रथम आले .. मा. मुकेश सर आपले मनापासून आभार व खूप खूप धन्यवाद👏🌹👏🌹👏🌹👏
  बेसिक धम्मलिपी पूर्ण करून “मास्टर ऑफ धम्मलिपी” मध्ये शिकण्याची उत्सुकता लागली आणि इथूनच धम्मलपीची खरी ओळख झाली ,कारण नुसती अक्षरे माहीत असून उपयोग नव्हता ,त्यांचा अर्थही माहीती असायला हवा , आ.रविंद्र सावंत सरांनी पहिल्याच लेक्चरला भारत व भारताबाहेर संपूर्ण जंम्बुद्वीपात बौद्ध धम्म व बौद्ध संस्कृती सगळ्या राष्ट्रात कशी समाविष्ट होती व जनमानसाची बोलीभाषा प्राकृत -पाली व तिची लिपी ही सम्राट अशोककालीन धम्मलिपी होती याची. माहीती दिली, सातवाहन राजांपासून ते राष्ट्रकुटांच्या राजापर्यंतचा इतिहास ,त्यात बौद्ध संस्कृती. व धम्ममलिपीची झालेलेली भरभराट अभ्यासायला मिळाली ,लेखांचे विविध प्रकार ,शिला ,स्तंभ. लेणी यावर लिहिलेल्या अक्षर व त्यांचा अर्थ कसा समजून घ्यायचा ,लिप्यांतर ,शब्दार्थ. भाषांतर कसे करायचे अतिशय योग्य सुलभ रीतीने शिकवले .अशोककालीन व सातवाहन कालीन लघु व. दीर्घ शिलालेखांचा सातत्याने. आमच्याकडून सराव करून घेतला , वेळोवेळी आमच्या लेखनअभ्यासातील चुका. दुरूस्त करून मार्गदर्शन केले , कोणतीही शंका, प्रश्न यांचे योग्य निरसन केले , त्यांच्यामुळेच लेख ओळखून त्याचे भाषांतर करण्यास ,वाचण्यास येवू लागले , व आज मी लेख अभ्यासक तज्ञ मा. रविंद्र सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच ” मास्टर ऑफ धम्मलिपी ” परीक्षेत ५०० पैकी ४९७ गुण मिळवून प्रथम आले .
  मा रविंद्र सावंत सर ,आपले मनापासून आभार व खूप खूप धन्यवाद👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏🌹👏
  एबीसीपीआर टीमच्या माध्यमातून शिकवत असताना या शिक्षकांनी आपले व्यवसाय , कामकाज सांभांळून धम्मलिपी शिकवण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला , कधी आर्थिक अडचणी आल्या तर कधी नैसर्गिक , अपुर्ण साधन सामग्री असतानाही शिकवण्यात व्यत्यय येवू दिला नाही ,प्रत्यक्ष लेण्यांवर जावून खडतर प्रवास करून माहीती संकलन करून आमच्या पर्यंत लेख पोहचवले ,परीक्षा विभाग ,ऑनलाईन लेक्चर व्यवस्था ,वेळापत्रक ,प्रश्नपत्र ,उत्तरपत्र अशा सर्व व्यवस्था वेळेवर करून टीमच्या एकजूटीचे उत्तम उदाहरण दिले ,संपूर्ण एबीसीपीआर टीमचे मनापासून आभार 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
  आमच्या परीक्षेच्या पेपर तपासणी साठी. लाभलेले आयटी विभाग प्रमुख असलेले तज्ञ परीक्षक सरांचे मनापासून आभार 👏👏👏🌹👏👏👏
  “मास्टर ऑफ धम्मलिपी ” च्या परीक्षेत माझ्यासहित टॉपटेन मध्ये आलेल्या सर्व धम्मबंधु -भगिनींचे व उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व धम्मबंधु भगिनींचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
  🌹👏🌹सर्वांना नम्र. विनंती आहे 🌹👏🌹
  आपल्याला जशी धम्मलिपीची ओळख झाली व खरा इतिहास समजला. तसेच आपल्या परिचयातील , नातेवाईक, मित्र मंडळी ,शेजारी मग ते इतर धर्मीय का असेना ,त्यांच्यापर्यंत लुप्त झालेली बौद्ध संस्कृती महामानव करूणामयी विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्दांची शिकवण , हजारोवर्षां पासून कोरून ठेवलेला प्रत्यक्ष पुराव्यारूपी लिखित वारसा सर्वांना कळावा ,लिहिता ,वाचता यावा , व या मौल्यवान नष्ट होत असलेल्या वारस्याचे जतन , संवर्धन व्हावे यासाठी , सर्वांना प्रोत्साहीत करावे , सर्वांनी एकत्रित येवून
  आपली मूळ धम्मलिपी व पाली भाषा शिकण्यासाठी धम्मसिरी इन्स्टिट्यूट मध्ये सहभागी व्हावे , जेणे करून बौद्धधम्म वाढीस लागेल व परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील अखंड भारताचे स्वप्न साकार होईल
  धम्मलिपीचा अभ्यास इथेच न थांबवता भविष्यातही निरंतर असाच चालू राहावा व धम्मसिरिच्या तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आम्हांस मिळत राहो ही सदिच्छा
  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  🌹 भवतु सब्ब मंगलम🌹

 8. Baban Sudam Khobragade

  सर्व उत्तीर्ण परीक्षार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन. अध्यापक, परिक्षक गणांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या हाताळत असल्या बद्दल अनेक धन्यवाद. ABCPR घ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

 9. Baban Sudam Khobragade

  सर्व उत्तीर्ण परीक्षार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन. अध्यापक, परिक्षक गणांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या हाताळत असल्या बद्दल अनेक धन्यवाद. ABCPR च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat