प्राचीन काळी भारत हा संपन्न असा प्रदेश होता. जगाच्या तुलनेत भारताचा आर्थिक स्तर हा सर्वात मोठा होता हे आपणास पाहायला मिळते. प्राचीन काळात बौद्ध इतिहास किती प्रगत होता हे पाहण्यासाठी प्राचीन काळातील समकालीन साधनांचा विचार करून प्राचीन काळाचा इतिहास मांडता येतो. प्राचीन काळात बुद्ध स्तूप लेणी विहार या ठिकाणी सापडलेले शिलालेख आणि त्या शिलालेखामध्ये नमूद केलेले आर्थिक व्यवहार हे बुद्ध कालीन इतिहासाचे सर्वोत्तम असे साक्षीदार आहेत. शिलालेख हे भारताच्या इतिहासाचे प्रमुख साक्षीदार आहेत. ज्यांच्यामुळे इथल्या भूमीत असलेला बुद्ध इतिहास जगासमोर आला. बौद्धकालीन आर्थिक इतिहास या विषयाकडे वळताना प्राचीन बुद्ध लेण्या आपल्याला खुणावतात. या बुद्ध लेण्यातील शिलालेख प्रामुख्याने दान शिलालेख असतात ,परंतु या दान शिलालेखातून प्राचीन काळातील व्यापारी उद्योग समूहाचे चांगले ज्ञान आपणास होते. अनके उद्योग समूह एकत्रितपणे बौद्ध धम्माला सहकार्य करत होते हे आपणास शिलालेखातून पाहायला मिळतात. प्राचीन काळातील हे शिलालेख अभ्यासात असताना आपणास पाहायला मिळते कि, या लेखात स्त्रियांचे मोठे योगदान आहे. शिलालेख अभ्यासात असताना दान कर्त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन काय होते याचे ज्ञान होते. प्राचीन काळात मोठे व्यापारी उद्योग समूह होते.

व्यापाऱ्यांच्या श्रेणी
वस्सकार ,कास्सकार ,मनिकार, सुवर्णकार,हेरनिक ,मालाकार, लोहवानिज ,सार्थवाहक ,श्रेष्टी, गहपती, वढीक, कोणाचीक ,तिलपिषक , गन्धिक, धंञीक , दासक, कोलीकनिकय, हालाकिय उदयांत्रिक, अश्या अनेक व्यापारी श्रेण्या आपणास शिलालेखांच्या माध्यमातून अभ्यासायला मिळतात. आज या व्यापारी श्रेणीचे रुपांतर जातीमध्ये झालेले आपणास पाहायला मिळतात.
जसे दासक हे मश्चीमार होते म्हणजेच त्यांचा माश्यांच्या शेतीचा व्यवसाय होता. मोठे माश्यांचे व्यापारी होते ज्यांना आज कोळी या जातीमध्ये गणले जाते. लोहवानिज यांना लोहार , मालाकार यांना माळी, धंञीक यांना वाणी सुवर्णकार यांना सोनार मनिकार यांना सराफअश्या अनेक जातीमध्ये लोकांना विभागले गेले आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वजांचा इतिहास च माहिती नाही. नेमके बौद्ध कालखंडात यांचा इतिहास काय होता हे ज्या दिवशी माहिती होईल त्या दिवशी त्यांनी मार्ग बदलला तर नक्कीच भविष्यात त्यांच्या पिढीला एक चांगला मार्ग मिळेल. व्यापारी श्रेणी मुळे शिलालेखातून आलेले प्रःचीन चलन आणि त्याचा इतिहास जगासमोर आला. प्राचीन काळात कोणते व्यापारी चलन होते हे पाहण्यासाठी आपल्याला शिलालेख आणि नाणी यांच्या शिवाय इतिहास मिळत नाही.

प्राचीन काळातील शिलालेखातून आलेले पुरावे पाहताना कार्षापण नावाचे नाणे प्राचीन काळात चलन होते. यामध्ये सुवर्ण आणि चांदी अश्या दोन पद्धतीचे विनिमयाचे दर आपणास पाहायला मिळतात. किती कार्षापण म्हणजे एक सुवर्ण नाणे असू शकेल याची माहिती मिळवण्यासाठी देखील आपल्याला शिलालेखांचे प्रमाण अभ्यासावे लागते. यासाठी नाशिक येथील लेणी क्रमांक दहा येथील शिलालेखात कार्षापण आणि सुवर्णनाणी यांचा विनिमय दर दिलेला आहे तो आपणास अभ्यासायला मिळतो. ७०००० कार्षापण म्हणजे २००० सुवर्ण नाणी असा विनिमय दर नाशिक लेण्यात सापडतो. यामुळे एक सुवर्ण नाणे म्हणजे किती कार्षापण याचे गणित आपल्याला लगेच करता येईल. ७० हजार कार्षापण म्हणजे २ हजार सुर्वण नाणी असतील तर एक सुर्वण नाणे म्हणजे ३५ कार्षापण असे विनिमय दर समोर येतो. यानंतर महत्वाचे म्हणजे व्याजदर किती असेल याचा विचार करत असताना नाशिक मधील लेणी क्रमांक १२ मध्ये भिक्खू संघाकडे १०० कार्षापणे कायमस्वरूपी ठेव ठेवण्यात आली होती आणि त्यावर वर्षाचे १२ कार्षापण व्याज असा उल्लेख आहे. यावरून महिन्याला एक पदिक म्हणजे एक कार्षापण व्याजदर आपणास पाहायला मिळतो. यावरून मग ज्या ज्या नागरिकांनी बौध्द धम्माच्या प्रचार आणि प्रसार यासाठी दिलेले कायम सस्वरूपी दान आणि त्यावर असलेला व्याजदर आपणास काढता येतो. यामुळे इतर शिलालेखात आलेले आर्थिक व्यवहार आपणास समजण्यास सोपे जातात. नाशिक येथील लेणी क्रमांक १० मध्ये अनेक व्यापारी श्रेण्यामध्ये आर्थिक ठेवी ठेवण्यात आल्या होत्या तर त्यांचे व्याजदर हि त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार २००० कार्षापनावर एक वर्षासाठी किती व्याजदर येईल तर सरळ पद्धतीने अभ्यासले तर १०० कार्षापनाला वर्षाचे १२ कार्षापण तर १ हजार साठी १२० कार्षापणे होतील आणि २ हजार साठी २४० कार्षापणे व्याजदर असेल. अश्यापद्धतीने आपण आर्थिक व्यवहार अभ्यासू शकतो. प्राचीन काळात कश्या पद्धतीने आर्थिक व्यवहार होते होते यांची माहिती आपणास मिळते.
कान्हेरी बुद्ध लेणी मधील काही शिलालेख पाहू या व त्यातील आर्थिक व्यवहार समजून घेवू या .
कान्हेरी लेणी क्रमांक ७३, हि लेणी क्रमांक ३ च्या अगदी वरच्या बाजूलाला आहेत त्या लेणीत असणारा शिलालेख पाहू या


शिलालेख सविस्तर पणे
म ट पे प वा डे च प डि अ गि त व

सिध कलिअन … स य न सिव मितस पुतस नेगमस
धम … बुधकेन सह च सेवणा परिवारेण बव ….धम लेण पाणीय पोढि आसन पेढिका यो पिधो अ ….. च कमो च देय धम चातूदिसे भिखु सघ पतिठापित माता पितरो उडीस सवसतू हित सुघथ एथ च अखयनिवि च दाता
एतो च वासारते वसतस भिखुणो चिवरिक काहापणा सोलस पातेलेस उपाहणाण च काहापणो उतूकाले च पडीको मासे वसतस डातवो
सेसेण लेण पडी अगितव कलियणे च विहारे गंधारिका भमियं बगभं भोजन चातूसाल च देयधम एतेसिपि अखयनिवि दता मुकुडसिवयिवयं निवेसनं एतो बे भाका बिगभ स भाका चातूसालस विहार दसकाणी चातूसालस भाका


मराठी भाषांतर : कल्याण येथील रहिवासी व्यापारी सिवमित्र यांचे पुत्र धर्म आणि बुधक यांनी त्यांच्या परिवारासोबत चारी दिशेला चारिका करणाऱ्या भिक्षु संघाला लेण्यांचे , पाण्याच्या टाक्याचे , आसन व्यवस्था आणि रस्त्याचे धम्म दान आपल्या मातापित्याच्या स्मरणार्थ सर्व लोकांच्या हितासुखासाठी अक्षयनिधी ची देणगी दिली आहे
भिक्षु च्या चीवरासाठी १६ कार्षापणे लेण्यात वर्षावासात राहणाऱ्या भिक्षु ना पायातील चप्पले साठी १ कार्षापण दान तसेच भिक्षापात्रासाठी तसेच उरलेली रक्कम हि लेणीचा दुरुस्थी साठी वापरावी तसेच कल्याण येथील गांधारभूमीत असणाऱ्या विहारासाठी मुकुडवासीय मध्ये दोन खोल्या व भोजनशाळा
दोन खोल्या व भोजन चातुशाला हि अक्षयनिधी च्या स्वरुपात दान दिलेले आहे . या घरातून येणाऱ्या निधीचा विनियोग दोन भाग विहाराच्या दुरुस्थी साठी तीन भाग विहारातील भोजनगृहासाठी व १० वा भाग विहारातील भिक्षु च्या चीवरासाठी आणि एक भाग भोजनकोठीतील भिक्षुसाठी देण्यात यावा
इथे महत्वाचे म्हणजे लेण्यात दिलेला निधी कसा वापरायचा याचा हि विचार केलेला आहे केवळ दान दिलेले नाही तर त्या दानाचा विनियोग करण्यासाठी आवश्यक ती माहिती देखील पुरवलेली आहे
या एकूण दोन शिलालेखांचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतेली पाहिजे कि भिक्षु लोकांच्या निर्वाहासाठी उपासकांनी दिलेल धम्म दान किती काळापर्यंत असावे याचा विचार केला असता ते निरंतर म्हणजे पिढ्यान पिढ्या आहे असा अर्थ आहे इथे आज फिक्स ठेवी साठी कालावधी असतो इथे धम्मासाठी निरंतर म्हणजे भिक्षु संघ किती निस्वार्थी होता याचे हे एक उदाहरण आपणस पाहायला मिळते
शिवाय ठेवी मध्ये केवळ पैसाच नाही तर स्थावर मालमत्ता देखील ठेवली जात असे लेण्यांसाठी एवढे धम्मं दान देणारे उपासक किती उच्च दर्जाचे बौद्ध उपासक होते याची माहिती मिळते
तसेच यामाध्यमातून आपल्याला चलन व्यवस्थेचा अभ्यास करायला मिळतो त्याकाळात कार्षापण वापरले जात होते याचा भक्कम पुरावा हा लेण्यात सापडतो म्हणजे राजांची नाणी आहेत च शिवाय कार्षापण हे चलन व्यवस्थेत चलन आहे हे देखील समोर येते त्या काळी सुवर्ण नाणी चांदीची नाणी देखिल वापरत होती
महत्वाचे त्यावेळी वापरत असलेल चलन म्हणजे कार्षापण शिवाय कर्षण आणि पदीक हे चलन वापरत असे त्याचे पुरावे आपणस शिलालेखात पाहायला मिळतात शिलालेखात महत्वाचे आलेलें हा शब्द म्हणजे अक्षय निधी म्हणजे कधी हिक्षय न होणारी ठेव आज आपण ठेवत असणाऱ्या फिक्स ठेवीचे प्राचीन स्वरूप अक्षय निधी हे नाव आपणास पाहायला मिळते
कान्हेरी मध्ये असणारा शिलालेख लेणी क्रमांक २१ मध्ये आहे

रा ञो गो त मि पु त स सा मि सि रि य ञ सा त क णि स स व छ रे १६ गि म्ह ण व ख २ दि व से ५ क लि या ण वा थ व स ने ग म स अ ण द पु त स उ पा स क स अ व रे णु स प रि वा र स स ह कु डू बि नि य आ न द मा तू जु वा रि नि का य स ह बा ल के न अ ण दे ण स ह च सु न्ह हि अ ण …. ल … सि प च धा म दे वि य स ह च … वे ण अ ह वि अ प ण आ मा पि त रो उ दि स प व ते क ण्ह से ले ले नं को ढी च दे य ध म चा तू दि से भि खु स घे प डि था पी त स व स ता ण हि त सु घ थ ए त स च अ ख य नि वि द ता का हा प णा न स ता नि बे २०० स घ स ये व ह थे प लि के स ते ए थ च अ धा प न खे ति य स खे त गा मे म ग ल ठा ने भो ज क प ति ए तो सं घे न दा न व चि व रि क सो ल स क प लि को च मा से उ तू का ले
मराठी भाषांतर : राजा गौतमी पुत्र सामी सिरी यज्ञ सातकर्णी याचे राज्यावर्ष सोळा मध्ये ग्रीष्म ऋतूतील पहिल्या पक्षातील पाचवा दिवशी कल्याण येथील रहिवासी व्यापारी आनंद यांचा मुलगा उपासक अपरेनु याने आपल्या परिवारासह तसेच आनंदाची आई कुणबीन जुवारीनिकाय सोबत तिची सून आनंदाची पत्नी धर्मादेवी यांनी आपल्या मातापित्या च्या स्मरणार्थ व सर्व लोकांच्या हितासुखासाठी चारी दिशेला चारिका करणाऱ्या भिक्षु संघासाठी कान्हेरी येथे लेण्यांचे आणि मंडपाचे धम्म दान दिले आहे तसेच २०० कार्षापनाची अक्षयनिधी भिक्षु संघाकडे ठेवलेली आहे व मागठाणे येथील शेती मधील अर्धा हिसा शेतीच्या उत्पन्नातील १६ हिस्सा भिक्षु च्या चीवरासाठी वापरावा अशी नोंद शिलालेखात आहे
या लेखात अपरेनु याने या धम्म उपासकाने बौद्ध भिक्खू ना दिलेले धम्म दान दिलेले आहे ते २०० कार्षापण यामध्ये हे धम्म दान हे अक्षयनिधी म्हणून दिलेले आहे यामध्ये हि ठेव भिक्खू संघाकडे ठेवण्यात आलेली आहे आता याचा विनियोग कसा करायचा याचे नोंद देखील या लेखात आपणास पाहायला मिळते एकूण च बौद्ध धम्माची हि अनेक महत्वाची गोष्ट आहे जी आजवर सांगितली जात नाही
ठेवी मध्ये केवळ चलन च नाही तर शेतजमीन घरे देखील अक्षयनिधी म्हणून ठेवण्यात आलेली आहेत आजवर अश्या पद्धतीने कोणत्याच संस्कृतीला दान आलेले नाही जे बौद्ध धम्मासाठी आलेले आहे यावरून हा लोक धर्म कसा होता हे आपणास समजते

लेणी क्रमांक १० इथे असणारा शिलालेख खूप महत्वाचा ठरतो अगदी इसवी सन ९ व्या शतकात नगरी लिपीत राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्मा याने आपल्या अमात्याला विष्णू गुप्ताला कान्हेरी येथील लेण्यात बुद्धाच्या पूजेसाठी वीस द्रम्म विहाराच्या दुरुस्थी साठी तीन द्रम्म भिक्खुंच्या चीवरासाठी पाच द्रम्म आणि पुस्तकांसाठी एक द्रम्म मिळावा यासाठी ४० द्रम्माच्या दोन आणि १२० द्रम्माची एक अशी रक्कम कान्हेरी मध्ये भिक्खू संघाकडे अक्षयनिधी म्हणजे कायमस्वरूपी ठेव ठेवलेली आहे
यातून एक गोष्ट प्रामुख्याने समजते ती म्हणजे आजच्या काळात आपण वापरत असणारी बँकेची व्यवस्था हि दोन हजार वर्षापूर्वी बौध्द काळात वापरात आणलेले आहे
शिलालेखांचे अध्ययन करताना नेहमीच एक गोष्ट जाणवते ती म्हणजे बौद्ध काळातील आर्थिक व्यवहार कसे होते यावर का अभ्यास होत नाही भारताच्या जडणघडणीत बौद्ध कालखंड हा सर्वोत्तम आहे हे नाकारता येत नाही अनेक लेण्यात ते आपणास पाहायला मिळते
बौद्ध लेण्यातील आर्थिक बाबींचा विचार करताना प्रगत कालखंड म्हणून त्याची गणना हि काही काल्पनिक कथांचा बाजार नसून एक ऐतिहासिक घटनांचा इतिहास आहे हे सिद्ध होते
आज भारताचा आर्थिक बाब कमकुवत कशी आहे हे सांगण्याची गरज नाही जवळपास लोकसंखेच्या अर्धे अधिक लोक हे आर्थिक कमकुवत आहेत मात्र बौद्ध कालखंडात जनता आर्थिक प्रगत आहेत याचे उदाहरणे लेण्यातील हे शिलालेख आहेत ते सांगतात कि इथे प्रत्येक व्यक्ती हा धनवान आहे शिवाय दानशूर आहे याची काय कारणे असतील तर ती म्हणजे बुद्धाची सम्यक शिकवण आहे
बुद्धाने लोकांना धन संचय करू नका असा संदेश दिलाय पण त्याच बरोबर दान परिमिता हि असायला हवी सांगितले आहे शिवाय दान कोणाला केले पाहिजे हे हि सांगितले आहे त्यामुळे साहजिक च जनतेच्या आचरणात असणारा बौद्ध धम्म हा साक्ष देत आहेत एवढे नक्की लोकांनी भरभरून धम्म दान दिलेले आहे आणि त्यात लोकांच्या आर्थिक समानतेचा विचार हि केला आहे म्हणून बौद्ध कालखंड प्रगत होता कारण आर्थिक समानता सामाजिक समानता धार्मिक समानता हि लोकांना स्वतंत्र बंधुता न्याय प्रदान करणारी यंत्रणा होती म्हणून अधिक तर दान हे बौद्ध उपासकांनी दिलेले आहे बौद्ध सम्राटांचे योगदान हि अमुल्य आहे जनतेच्या हितासाठी बौद्ध धम्माला शरण जाणारे सम्राट या मातीत होवून गेले हि महाराष्ट्राची माती तिने अनेक वर्षे या मातीत बुद्धाची शिकवण अनुभवली आहे आणि आज हि डोंगर माथे त्याची अस्ठीत्वाचे दाखले देत आहेत आज हि बौद्ध लेण्यात शिलालेख दाखले देत आहेत हि बौद्ध लेण्या नुसत्या बौद्ध लेण्या नाहीत तर आधुनिक बँक होत्या त्या आधुनिक व्यापाराची केंद्र होत्या त्या आधुनिक धम्माची केंद्र होती यात भारत देशाचा आर्थिक सामाजिक धार्मिक इतिहास कोरून ठेवलेला आहे चला तर आपला इतिहास आपण जपू या
या बौद्ध लेण्या आपली ओळख हि प्रगतशील मानवाचा वंशज म्हणून करतात तेव्हा बौद्ध नावाची ओळख निर्माण करू या चला बौद्ध लेणी संवर्धन करू या